पोस्ट्स

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.             राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने, या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन ; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इमेज
मुंबई दि.२३, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मानले जाणारे मनोहर जोशी  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर

इमेज
पुणे दि.२१, (प्रतिनिधी - दयानंद गौडगांव) भा रतीय  जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहराची  जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी  संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पाडला. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहर चिटणीस नामदेव ढागे, संजय मंगोडिकर, राजू दुर्गे, शीतल शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व संयोजक तुषार हिंगे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शाकिर शेख, कामगार प्रकोष्ठ नामदेव पवार, सांस्कृतिक प्रकोष्ठ विजय भिसे, किसान मोर्चाचे गुलाब बनकर, वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. प्रताप सोमवंशी, दिव्यांग सेलचे शिवदास हांडे, बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रिती कामतीकर, वाहतुक सेलचे दीपक मोढवे पाटील, जैन प्रकोष्ठ संदेश गादिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.  भाजपा युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे! उमेश सांडभोर, भूषण गायके, अक्षय कामठे, मनीष यादव, रवी भ

आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांचा आकस्मिक निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ३१, आटपाडी विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते निमोनिया या आजाराशी झुंज देत होते. मात्र आज त्यांना मृत्यू झाला.  दरम्यान आ. बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.  अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.   खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये आ. बाबर यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी  अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्था

प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी --हरि बोंबले प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाला. या स्पर्धेत व्यायाम शाळेतील सर्व पुरुष व महिला एकूण दोनशे सभासंदानी सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांला रेंजर सायकल बक्षीस ठेवण्यात आले होते . पुरुष गटात प्रथम क्रंमाक प्रकाश दत्तात्रय बोंबले यांनी पटकावलातर महिला गटात सोनाली संदिप गाडे यांनी मिळविला तर सहभागी सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिह्न देण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन बाळासाहेब सांडभोर यांनी केले तर स्पर्धा आयोजन वक्रतुड फिटनेसचे सर्वेसर्वा विकासशेठ वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसचलन कैलास दुधाळे यांनी केले तर आभार संपत गारगोटे यांनी केले.

पुण्यातील वेळअमावस्या स्नेह भोजनास आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुनिभाऊ कांबळे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्तिथी ; बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांचा सलग 17 वर्षाचा विक्रम

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे (प्रतिनिधी) - बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. गेल्या १७ वर्षापासून पुण्यातील अक्कलकोट चे रहिवासी साठी वेळ अमावस्याचा  कार्यक्रम नित्य नियमाने दर वर्षी केला जात आहे विद्यमान आमदार सचिन  कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे  आणि पुणे कॅन्टोमेंट चे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र येवून आपली उपस्थिती दर्शवली व एकत्र च या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी हजोरो च्या संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला मंडळीनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळ जवळ ४००० लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.  हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजनबद्द केल्याबद्दल मा. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्याकडून आयोजकवरती कौतुकाचा वर्षाव झाला.कार्यक्रम दरम्यान साप्ताहिक गावगाथा अंकाचे प्रकाशन झाल

शिवरायांच्या मावळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवला पाहिजे - संपत गारगोटे* प्रतिनिधी--लतिफ शेख राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन येथिल प्रत्येक तरुणाने यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा तसेच इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले . येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निरव्यसनी व्हावं, छत्रपती शिवाजी राजांसारखे कार्यकर्तृत्व करावं ,राजांची दूरदृष्टी आत्मसात करावी आणि यश मिळवावे असे मार्गदर्शन व्याख्याते संपत गारगोटे यांनी विद्यार्थ्यांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नीती नियम हे प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयसेवकांनी आत्मसाद करावे आणि खूप मोठे कार्य करावे असे आव्हान गारगोटे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तिन्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे तर या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे तसेच यावेळी या कार्यक्रमास ग्रापंचायत सदस्य प्रियंकाताई पाचारणे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे, कामगार नेते राज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते हेमंत विरकर, संवाद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेशजी ढवळे, महाविद्यालयाचे प्राचार्य जरे सर ,कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी पत्रकार गणेश आहेरकर सर,खेड तालुका कृषी अधिकारी नंदु वानी साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख, राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन  येथिल प्रत्येक तरुणाने  यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा  तसेच  इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून  प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे  यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील  महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना  मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर  राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी  संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन  स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले . येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसा

राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण ; १ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई दि.२३ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून त्यामधील  ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.             छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्येच ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. कोकण विभागात १४९ ,  नाशिक विभागात १ हजार ७० ,  पुणे विभागात २ हजार ९०७ ,  कोल्हापूर विभागात ७०८ ,  छत्रपती संभाजीनगर विभागात ४७४ ,  लातूर विभागात २९० ,  अमरावती विभागात १८७ आणि नागपूर विभागात २८७ असे राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहे. या योज

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क निगडी, दि. २२ , (प्रतिनिधी / दयानंद गौडगांव) : अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीरामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य श्रीराम प्रतिमा पूजन तसेच दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.०० वाजता काॅलनीतील महिलांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला, त्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी मनोरंजनात्मक  संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ठिक ८:३० वाजता प्रसिद्ध उद्योजक आदेश नवले यांच्या हस्ते दिपोत्सव कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्रीराम प्रतिमेचा महाआरती करण्यात आली. आरती नंतर सर्व रामभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी उद्योजक आदेश नवले तसेच ज्ञानेश्वर वाल्हेकर यांचा सहकार्य तसेच आशिर्वाद व्यासपीठाला लाभला. यावेळी प्रतिष्ठानचे , शिवा फुलारी, नागेश सुतार, मल्लीनाथ कोरे, यल्लप्पा सुतार, तुकाराम अर्जुन, गोपी अर्जुन, बाशा मुल्ला, गंगाधर पुजारी, प्रभू फुलारी , खंडेराय बेलंगी यांच्या समावेत इतर कार्यकर्ते तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.

श्री क्षेत्र गुळाणी येथे श्री राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त पालखी सोहळा व भव्य मिरवणूक संपन्न

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी /  दत्ता भगत खेड :  तालुक्यातील श्री संत सटवाजी  बाबा येथील गुळाणी  गावांमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावामध्ये पालखी सोहळा व भव्य दिव्य अशी भक्तिमय वातावरणात जय श्रीराम अशा जल्लघोशात मिरवणूक संपन्न झाली. पालखी सोहळ्याची मिरवणूक संपूर्ण गावभर भगवे झेंडे व हरिनामाच्या गजरामध्ये उत्साही वातावरणात संपन्न झाली . गुळाणी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वात शेवटी मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची आरती करून प्रसाद वाटप करून पालखी सोहळ्याचे समारोप करण्यात आला.

पहिले युवा मराठी साहित्य संमेलन ; अध्यक्षपदी नवनाथ गोरे यांची निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे ( प्रतिनिधी जयदीप वनशिव ) : राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केंद्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून, संमेलनाचे उदघाटन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ चंद्रकांत कुंजीर व निमंत्रक  ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी  दिली. संमेलनाध्यक्ष श्री गोरे यांच्या फेसाटी कादंबरी चा मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास क्रमात  समावेश करण्यात आला आहे, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. वारुळ, मुराळी, सत्यघटना, रौंदाळ आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे, फेसाटी कादंबरी ला केंद्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.  दि. २८ जानेवारी रोजी पुणे येथील आंबेगाव पठारावर  पुणे केंब्रिज शिक्षण समुहाच्या प्रांगणात साहित्य संमेलन होत आहे,  सकाळी दहा वाजता ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे, दुपारी १२ वाजता उद्घाटन समारंभाला प्रारंभ होईल.  प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे

रामनामात दंग झाले महाबळेश्वर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क           महाबळेश्वर ( प्रतिनिधी प्रशांत भोसले ) : पाचशे वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आयोध्येमध्ये राम लला विराजमान झाले आणि कणाकणातील राम मनामनात रूजला!  शोभायात्रेद्वारे सूरवात झालेल्या कार्यक्रमातून राम नामाचा गजर झाला आणि असंख्य रामभक्तांचे बलिदानातून विराजमान झालेल्या आयोध्येतील रामललांची मोदीजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा याची देही याची डोळा लाईव पाहून  सर्व रामभक्तांचे आयूष्य सार्थक झाले, श्रीराम जय राम जय जय राम या जपामध्ये महाबळेश्वर येथिल सर्व श्री राम भक्त गूंग झाले !  रामरक्षा स्त्रोतातून प्रभू श्रीरामांनी सर्व भक्तांची रक्षा करावी असे गार्‍हाणे प्रभूश्रीराम चरणी मांडण्यात आले.भजन व महाआरती द्वारे श्रींचरणी नतमस्तक होऊन महाप्रसाद घेऊन, संध्याकाळी घरोघरी दिपोत्सव साजरा करण्यात आला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे महाळुंगे पडवळ येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम ; ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  खेड दि.२१,  महाळुंगे पडवळ  येथे कृषीकन्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देण्याचा उपक्रम राबवत आहेत. त्यांचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय,आंबी (ता.मावळ) येथील विद्यार्थीनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पद्धती, आधुनिक शेती,माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण आदी माहिती शेतकरी बांधवांना देत आहेत. कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत ह्या विद्यार्थीनी तीन महिने महाळुंगे पडवळ येथे मुक्कामी राहून आधुनिक शेतीबाबत मोफत प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी सौ.चेतना नायकरे यांनी दिली. कृषीकन्या स्नेहा पाटील,साक्षी गलांडे,विशाखा शिवले,वैष्णवी शिवले,अंजली माने,प्रेमज्योती ठोंगे.आदी विद्यार्थ्यांचे स्वागत , सरपंच सौ.सुजाता चासकर, उपसरपंच विकास पडवळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ बारवे व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी केले . यावेळी शेती उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीकन्यां

जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी च्या अध्यक्ष पदी सरोजनी कदम

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  शिराळा प्रतिनिधी ( जितेंद्र गायकवाड ) : ता.१६ शिराळा येथे नूतन अध्यक्षा मा.सौ. सरोजिनी कदम आणि पदाधिकारी यांचा पदग्रहण व शपथविधी समारंभ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रदीप पाटील सर सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मा.सौ. शामला जयसिंगराव खोत- पाटील, तहसीलदार शिराळा तालुका, तसेच सौ. शीला चौगुले, खजिनदार, जा.वे.फा.फेड.२ क,मा. भूषण शहा समन्वयक, जा.वे.फा.फेड.२क, उपस्थित होते. ग्रुपचे नूतन सदस्य, पदाधिकारी व नूतन अध्यक्ष मा. सरोजिनी कदम यांना युनिट डायरेक्टर मा. दुष्यंत राजमाने यांच्या शुभहस्ते शपथ देण्यात आली. फेलो ऑफ जायंट्स हा सन्मान सौ. सविता नलवडे यांना शिराळा तालुक्याच्या तहसीलदार  शामला खोत पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी स्वाती भस्मे, साई सिमरन घाशी, डॉ. मनीषा यादव, डॉ. साधना पाटील यांचा ही  विशेष सत्कार करण्यात आला  सत्कार झाल्या नंतर प्रमुख मान्यवरानी मनोगत व्यक्त केले तसेच मकर संक्रांती निमित्त  महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे स्

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर - रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण; प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             सोलापूर, दि. 19 : केंद्र शासन गोरगरिबांसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.             दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.             यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी तसेच रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आ

शासनाने २२ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे ( प्रतिनिधी दयानंद गौडगांव ) दि. १९ : श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने  दिवे ट्रॅक, आळंदी रस्ता कार्यालय, आयडीटीआर (नाशिक फाटा) व संगम ब्रिज मुख्यालय कामकाजात बदल करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे. दिवे येथील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आळंदी रस्ता येथील अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आयडीटीआर येथील अनुज्ञप्ती चाचणी व संगम ब्रिज मुख्यालय येथील शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरिकांनी, वाहनधारकांनी २२ जानेवारी रोजीच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्या आहेत त्यांची २३ ते २५ जानेवारी दरम्यान सुधारीत अपॉइंटमेंट दिली जाणार आहे.  वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे ( प्रतिनिधी मुस्तफा चाबरू ) दि.१९-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या कामासाठी राज्य शासनातर्फे २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. श्री.पवार म्हणाले, कात्रज चौक उड्डाणपूल ६५०-७०० मीटर पुढे वाढवावा. खडी मशीन चौकापासून पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. खडी मशीन चौकापासून कान्हा हॅाटेलकडे येणारा एकतर्फी मार्ग  तात्काळ चालू करायचे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यासाठी जमीन ताबा देणाऱ्यांना त्यांनी व्यक्तीश: धन्यवाद दिले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्त्याच्या कामाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला या कामाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चेतन तुपे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

  *जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क* पुणे दि. १९ : श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने  योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने २७ जानेवारी रोजी तपासणीकरिता सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या निविदेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही ;आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

  *जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क* मुंबई, दि. १९: आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा  प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी निविदा १२ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली होती. निविदा पूर्व सभेनंतर आतापर्यंत निविदेस तीन मुदतवाढी झालेल्‍या असून निविदा विहीत कार्यपध्‍दतीने राबविण्‍यात आलेली आहे.  यास शासनाची तसेच उच्‍चस्‍तर समितीची मान्‍यता असून यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा भ्रष्‍टाचार झालेला नाही.  तसेच निविदा दि.२३ जानेवारी २०२४ पर्यंत खुली असल्‍याने सर्व इच्‍छुक निविदाकार निविदा भरु शकतात, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले असून निविदा भरण्याचे आवाहनही केले आहे. महाराष्ट्र राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी एम/एस. बीवीजी इंडिया लिमिटेड यांची नियुक्ती दि.०१.०३.२०१४ रोजी पुढील पाच वर्षासाठी करण्‍यात आलेली होती. तद्नंतर करार संपुष्‍टात आल्‍यापासून मंत्रीमंडळाच्‍या शिफारशीनुसार  पुढील पाच वर्षाकरिता दि.३१.०१.२०२४ पर्यंत कंपनीला मुदतवाढ देण्‍यात आली. ही मुदतवाढ संपुष्टात येत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध स्व

सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्यावर भर-उपमुख्यमंत्री अजित पवार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे ( प्रतिनिधी इस्माईल तांबोळी ), दि.१९ : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असल्याने सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचा अधिक प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कुलगुरु वि. गं. तथा दादासाहेब केतकर सभागृह अरणेश्वर येथे आयोजित पुणे मर्चंटस को-ऑप बँक लि. शतक महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा व शतकोत्सवी बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष सुधीर शेळके, संचालक मंडळ उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करीत असताना राज्याचे हित लक्षात घेऊन पुढच्यादृष्टीने नवीन पिढीला मदत करण्यासाठी नवनवीन कल्पना राबविण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. याबाबत आवश्यकता भासल्यास मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडण्यात येईल. यामुळे तरुणाला सहकार क्षेत्रात संधी मिळण्यास मदत होईल.  *सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी विश्वासहर्ता जपण्याच

आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा– सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे खेड ( प्रतिनिधी उत्तम खेसे ) दि. १९  : केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात असून सर्व शासकीय यंत्रणानी लाभार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.  पंचयात समिती आंबेगाव (घोडेगाव) येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार संजय नागटिळक, प्रभारी गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.  श्री. वळसे पाटील यांनी पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, उपनिबंधक कार्यालय, महावितरण आदी विभागाकडून प्रलंबित कामांची आणि योजनांची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने पशुधनासाठी औषधोपचार अधिक वाढवावेत. तालुक्यात नवीन पशु वैद्यकीय दवाखाना सूरू करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. नवीन अंगणवाडी बांधकामासाठी आवश्यक ठिकाणचा प्रस्ताव

महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज मंचरला ए श्रेणी प्राप्त

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  खेड ( प्रतिनिधी विजय कानवडे ):  दि. १९, रयत शिक्षण संस्था सातारा संचलित महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर या विद्यालयाला पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सण २०२२ या शैक्षणिक वर्षात जे मूल्यांकन करण्यात आलं त्या मूल्यांकनामध्ये आणि जी स्तर निश्चिती करण्यात आली त्यामध्ये या विद्यालयाला ए श्रेणी प्राप्त झालेली आहे. हे विद्यालय आंबेगाव तालुक्यामध्ये ए श्रेणी मध्ये प्रथम आलेले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या विद्यालयाचा १९ वा क्रमांक प्राप्त झालेला आहे.  रमेश चव्हाण आय ए एस मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. या विद्यालयासाठी विद्यालयाचे प्राचार्य आवारी, उपमुख्याध्यापिका भांगरे वाय डी चासकर इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे कर्तुत्व व नेतृत्व हे शाळेला भविष्यामध्ये प्रगतीच्या पथावर नेणारे असल्याने त्यामुळे शाळेला नैपुण्य व दर्जा मिळाला आहे. सहकार्य करणारे संजय बांधले, अश्रफ पठाण, दिलीप चौधरी, विशाल पोंगडे व इतरही सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.  मंचर तालुक्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय मंचर व ज्युनि

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

इमेज
    जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १५: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे व संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. प्रभा अत्रे यांची भाची मनीषा रवी प्रकाश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, तहसिलदार राधिका बारटक्के, स्वरमयी गुरुकुलचे सदस्य यांच्यासह गायन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१५: मकर संक्रांत सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या विविध वस्तू विक्रीसाठी वस्तू उपलब्ध असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे ब्रीद असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. त्यांच्या  कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. विक्री केंद्रामार्फत बंदी निर्मित वस्तूंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.  मकर संक्रांतीनिमित्त आयोजित विक्री मेळावा व प्रदर्शनामध्ये बंद्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू,

धनकवडी येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १५: कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय पुणे आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर धनकवडी येथे महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एक हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. हा मेळावा विविध पात्रताधारक महिला उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध  करून देण्यात येत आहेत. नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती स

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत मढ येथे लाभाचे वाटप

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १५: प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत ‘प्रधानमंत्री जनमन’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मढ, ता. जुन्नर येथे करण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करण्यात आले. भारतातील ७५ आदिम जमातींसाठी  २४ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील मागासलेल्या कातकरी समाजापर्यंत यापूर्वी न पोहोचलेल्या सोयी सवलती पोहचविण्यासाठी हे महाअभियान उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाचे वेळी प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना शिधापत्रिका वाटप, जातीचे दाखले वाटप, बँक खाते उघडणे, त्यांच्यासाठी पक्के घरकुल, कातकरी लोकांसाठी मच्छीमारीसाठी जाळे, वीट भट्टीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान आदी देण्यात आले. बँजो पार्टीसाठी चार लाख रुपये ‘आधी विकास फाउंडेशन’ जुन्नर शिरोली यांना देण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगातून मच्छी जाळीचे वाटप मढ ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रक्षेप

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचा ५७ वा स्थापना दिवस समारंभ संपन्न ; नवीन सहकारी धोरण निर्मितीमध्ये वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेची उत्तम भूमिका-सहकारमंत्री

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १५: केंद्र शासनामार्फत आखण्यात आलेल्या नवीन सहकारी धोरणामध्ये सहकार चळवळ सशक्त बनवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; हे धोरण ठरविताना वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेने उत्तम भूमिका पार पाडली आहे, अशा शब्दात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संस्थेचा गौरव केला. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या (वैमनीकॉम) ५७ व्या स्थापना दिवस समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी), आनंदचे अध्यक्ष डॉ. मीनेश शाह, वैमनीकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, वैमनीकॉमचे निबंधक आर. के. मेनन, सह प्राध्यापक वाय. एस. पाटील उपस्थित होते. सहकारी संस्थांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी वैमनीकॉम या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे, असे सांगून मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, कृषी बँकींग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षण केंद्र असलेली

चांदूस येथील राजे शिवछत्रपती विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  खेड दि.१५, खेड तालुक्यातील चंद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे राजे शिवछत्रपती विद्यालय चांदुस  या विद्यालयामध्ये इयत्ता आठवी नववी दहावी सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये राजे शिवछत्रपती विद्यालयांमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे यांनी प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सर्व शिक्षक वृंद नेटके विठ्ठल. तीवरासे कैलास, सौ सुजाता सांडभोर, सारिका  आधारी या शिक्षक महिला प्रतिनिधी यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष जितेंद्र कारले, सचिव रामदास सांडभोर, सर्व संचालक दिलीप कारले यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रथमेश चे पूजन केले राजमाता जिजाऊ. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श  विद्यालयांमध्ये एक प्रेरणा  विद्यार्थ्यांना मिळाली त्यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते सौ मनीषा कारले. राजेंद्र सांडभोर 

चांदूस येथील जिल्हा परिषद शाळेत खाऊ गल्ली आणि आठवडा बाजाराचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / संतोष गाडेकर शनिवार दि. 13, खेड तालुक्यातील चांदुस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि देवाणघेवाणीची माहिती व्हावी या संकल्पनेतून खाऊ गल्ली आणि आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी  सकाळी आठ वाजता  मुख्याध्यापक जंगली , सर्व प्राथमिक शिक्षक, आजी माजी पदाधिकारी तसेच सरपंच यांच्या हस्ते या विद्यार्थी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.  गावातील महिला व तरुण वर्ग यांनी या विद्यार्थी बाजारात सहभाग नोंदविला .   प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पालेभाज्या व्यवसाय करताना आनंद  होताना पाहायला मिळाला.  'भाजी घ्या भाजी' अशा मधूर आवाजात विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष वेधून घेतले. खाऊ गल्लीमध्ये अनेक छोटे स्टॉल तयार करण्यात आले होते. पावभाजी ,बटाटा वडा, लिंबू सरबत ,ओली भेळ, पाणीपुरी, सर्व स्टॉलवर एकच गर्दी झाली होती. ग्रामस्थ पालक छोट्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आनंदाने खाऊ गल्लीचा स्वाद घेतला आणि भाजी मंडई. खाऊ गल्ली एक दिवसाचा बाजार संपन्न झाला.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी: काॅंग्रेसचे नेते मिलींद देवरा यांचा राजीनामा ; ट्विट करून दिली माहिती

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे (प्रतिनिधी) दि.१४, राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काॅंग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी अचानक काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देवरा यांनी एक्स वरून ट्विट करत ही माहिती दिली आहे. यामध्ये, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी @INCIndia च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, माझ्या कुटुंबाचे 55 वर्षांचे नाते संपुष्टात येत आहे." अशी ट्विट देवरा यांनी केली आहे. दरम्यान पक्ष सोडण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. https://twitter.com/milinddeora/status/1746368092736037291?t=PwWoycVdjh_HHiyvvyQS1w&s=19

मैंदर्गी येथील श्री. शिवचलेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिकेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मैंदर्गी अक्कलकोट ( प्रतिनिधी शब्बीर मुजावर ) : दि.१३,  प्रशालेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवचलेश्वर देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष तुकप्पा नागुर होते. यावेळी मंचावर प्राचार्य ए. एच. हरवाळकर, पर्यवेक्षक आर.डी.जाधव,एस.एस.केंगिनळ के. एम. आळंद, आर. एस. भालके, के. एम. आदटराव मॅडम. प्रमुख पाहुणे अ.कोट. ग्राहक पंचायत चे अध्यक्ष अभिजीत लोके  उपस्थित होते.  प्रथमतः राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद तसेच सोलापूरचे चार हुतात्मे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात आर. एस. भालके मॅडम यांनी १२ जानेवारी दिनाच महत्त्व व या थोर राष्ट्र निर्मात्यांच योगदान व हुतात्म्यांचे बलिदानाची महत्ती विशद केले. यावेळी अभिजीत लोके सर  यांनी राष्ट्रीय युवा दिनाच औचित्य साधून विद्यार्थी ग्राहक प्रबोधन करताना सांगितले की विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे.तसेच आज फसवणूक जास्त होत आहे. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती ,वस्तु खरेदी करताना दर, मुदत तारीख, विस्त

सौ.अनिता गोरे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क वाई, दि.१२: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच डायट फलटण यांनी जाहीर केला असून त्यामध्ये वाई तालुक्यातील अभेपुरी शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका सौ.अनिता गोरे यांच्या ' समजून आनंदाने वाचूया, गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचूया ' या नवोपक्रमाचा प्राथमिक गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरासाठी या उपक्रमाची निवड करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापरामुळे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे लिखित व मुद्रित मजकुराच्या वाचनाकडे दुर्लक्ष होते की काय ? ह्या जाणिवेतून जन्म घेतलेला हा नवोपक्रम शिक्षण आणि परीक्षा यांच्यापुरता मर्यादित न ठेवता परंपरा,उत्सव,सांस्कृतिक, सामाजिकता यांच्याशी जोडत भविष्यातील जगण्याचे व अर्थार्जनाच्या साधनांची पहिली पायरी  उभारण्याचे काम या  नवोपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.           या उपक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे ह्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर शाळांनी,मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी ह्या

सावित्री नदीच्या पुलावर अपघात ; चार जण गंभीर जखमी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क महाबळेश्वर ( प्रतिनिधी योगेश रांजणे )  : वीकेंड ची सुट्टी असल्याने दापोली येथे निघाल्यल्या  लंभिया कुटुंबाच्या गाडीचा जुन्या सावित्री नदीच्या पुलावर अपघात चार जण गंबिर जखमी झाले आहेत. जखमींना आमदार भरत गोगावले यांनी  मदतीचा हात दिला. दापोली पंढरपूर मार्गावर महाड तालुक्यातील बोरव गावा जवळ सावित्री नदी वरील जुन्या सावित्री आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.हेवी डंपर व स्विफ्ट डिझायर गाडीची समोर समोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघात मध्ये स्विफ्ट डिझायर कार मध्ये पाच प्रवासी होते. या मध्ये चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या वेळीस महाडचे आमदार भरत गोगावले यांचा ताफा याच मार्गावरून जात असताना अपघात झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच आमदार भरत शेठ गोगावले यांनी तत्काळ जखमींना त्याच्या ताफ्यात आलेल्या पोलिस वाह्यान मधून उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी प्रसाद शांताराम लांबे वय वर्ष 34 दिपाली प्रसाद लांबे वय वर्ष 34 दीप शिवाजी जाधव वय वर्ष 25 अमित भालेराव वय वर्ष 38 मयूर सखाराम राणे वय वर्ष 3

श्रीक्षेत्र गुळाणी येथे श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह उत्साही

इमेज
प्रतिनिधी - दत्ता भगत  खेड दि.१३, खेड तालुक्यातील श्री सटवाजी बाबा मंदिर श्रीक्षेत्र गुळाणी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा , अखंड हरिनाम सप्ताह उत्साही वातावरणात पार पडला. दररोज पहाटे चार ते सहा वाजता काकड आरती ,सकाळी सात ते अकरा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण ,दुपारी तीन ते पाच नियमाचे भजन होत असे , सायंकाळी सहा ते सात हरिपाठ , रात्री सात ते नऊ हरिकीर्तन रात्री नऊ नंतर प्रसाद व रात्री ११ नंतर हरिजागर होत असे. पहिल्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा ह .भ. प. डॉ ज्ञानेश्वर महाराज थोरात मंचर यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. रात्री जागर पारगाव येथील हनुमान भजनी मंडळ, पांडुरंग भजनी मंडळ, बोरदरा. अंबिका भजनी मंडळ चिचबाईगाव आणि रात्री प्रसादाची पंगत वार्ड क्र. एक ने दिली. दुसऱ्या दिवशीची सेवा  ह. भ .प .विश्वनाथ महाराज रिठे नागापूर यांची झाली. जागर वडगाव पाटोळे भजनी मंडळ, एकविरा महिला भजनी मंडळ थीगळ स्थळ आणि जळके खुर्द यांचा झाला. कीर्तनानंतर वार्ड क्रमांक दोनने प्रसाद दिला. तिसऱ्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा ह. भ .प .वैभव महाराज राक्षे अध्यापक वारकरी शिक्षण संस्था देहू यांची झाली.  जागर

शहरातील ६८ लिंगांना तैलाभिषेक करून सिध्देश्वर यात्रेस आजपासून उत्साहात प्रारंभ

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सोलापूर दि.१३,     900 वर्षाची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेस आज शनिवार दि. 13 जानेवारी रोजी नंदीध्वज मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन शहरातील 68 लिंगास तैलाभिषेक ( यण्णीमज्जन ) करण्यात येणार आहे यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झाली आहे यंदा खास लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा राहणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.         प्राचीन परंपरेनुसार यात्रेच्या काळात धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाच्या वातावरणात होणार आहेत या वर्षी दि. १३ ते १७ जानेवारी २०२४ पर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत. श्री सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची व श्री सिध्दरामेश्वरांच्या पालखीची मिरवणुक दि. १३ ते १७ जानेवारी २०२४ या काळात पारंपारिक प्रथेनुसार निघणार आहे. शनिवार दि. १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून पालखी व नंदिध्वजाच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन सोलापूर शहराच्या पंचक्रोशीत पारंपरिक नियोजि

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे  (प्रतिनिधी- सुनील शिरसाट) |दि. 12, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली. सदर सुविधेचे उद्घाटन मा.श्री.अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य  यांचे शुभहस्ते संपन्न झाले. सन्मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटी मार्फत संनियंत्रण करण्यात येत असलेला ICJS (Interoperable Criminal Justice System) प्रकल्प ज्यामध्ये सन्मा. न्यायालयाचे ई कोर्टस (eCourts) संगणकीकरण प्रकल्प, पोलीस विभागाचा सी.सी.टी.एन.एस. (CCTNS) संगणकीकरण प्रकल्प, कारागृह विभागाची ई प्रिझन (ePrisons) संगणकीकरण प्रकल्प, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांची ई-फॉरेन्सिक (eForensic) प्रणाली व पव्लीक प्रॉसिक्यूशन विभागाची संगणकीकरण प्रणाली यांचेमध्ये आपापसांत माहितीची देवाणघेवणा सुरु करणेवावत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासन, गृह विभाग, तुरुंग- २ यांचे पत्र दि.१७.०३.२०२१ रोजीच्या पत्रानुसार एन.आय.सी. (NIC) यांनी विकसित केलेली ई-प्रिझन (ePris