महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे महाळुंगे पडवळ येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम ; ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



खेड दि.२१,  महाळुंगे पडवळ  येथे कृषीकन्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देण्याचा उपक्रम राबवत आहेत. त्यांचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय,आंबी (ता.मावळ) येथील विद्यार्थीनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पद्धती, आधुनिक शेती,माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण आदी माहिती शेतकरी बांधवांना देत आहेत.

कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत ह्या विद्यार्थीनी तीन महिने महाळुंगे पडवळ येथे मुक्कामी राहून आधुनिक शेतीबाबत मोफत प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी सौ.चेतना नायकरे यांनी दिली. कृषीकन्या स्नेहा पाटील,साक्षी गलांडे,विशाखा शिवले,वैष्णवी शिवले,अंजली माने,प्रेमज्योती ठोंगे.आदी विद्यार्थ्यांचे स्वागत , सरपंच सौ.सुजाता चासकर, उपसरपंच विकास पडवळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ बारवे व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी केले . यावेळी शेती उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीकन्यांकडून करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद