श्रीक्षेत्र गुळाणी येथे श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह उत्साही
प्रतिनिधी - दत्ता भगत
खेड दि.१३, खेड तालुक्यातील श्री सटवाजी बाबा मंदिर श्रीक्षेत्र गुळाणी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा , अखंड हरिनाम सप्ताह उत्साही वातावरणात पार पडला. दररोज पहाटे चार ते सहा वाजता काकड आरती ,सकाळी सात ते अकरा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण ,दुपारी तीन ते पाच नियमाचे भजन होत असे , सायंकाळी सहा ते सात हरिपाठ , रात्री सात ते नऊ हरिकीर्तन रात्री नऊ नंतर प्रसाद व रात्री ११ नंतर हरिजागर होत असे. पहिल्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा ह .भ. प. डॉ ज्ञानेश्वर महाराज थोरात मंचर यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. रात्री जागर पारगाव येथील हनुमान भजनी मंडळ, पांडुरंग भजनी मंडळ, बोरदरा. अंबिका भजनी मंडळ चिचबाईगाव आणि रात्री प्रसादाची पंगत वार्ड क्र. एक ने दिली. दुसऱ्या दिवशीची सेवा ह. भ .प .विश्वनाथ महाराज रिठे नागापूर यांची झाली. जागर वडगाव पाटोळे भजनी मंडळ, एकविरा महिला भजनी मंडळ थीगळ स्थळ आणि जळके खुर्द यांचा झाला. कीर्तनानंतर वार्ड क्रमांक दोनने प्रसाद दिला. तिसऱ्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा ह. भ .प .वैभव महाराज राक्षे अध्यापक वारकरी शिक्षण संस्था देहू यांची झाली. जागर भिकोबा भजनी मंडळ, गाडकवाडी, पहाडदरा, गोसावी भजनी मंडळ यांचा जागर झाला. प्रसाद वार्ड क्रमांक तीन ने दिला. चौथ्या दिवशीची कीर्तन रुपीस सेवा ह. भ .प. केशव महाराज हागवणे आळंदी यांची झाली. जागर तुकाई माता भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ शिवले वस्ती किवळे, मोहितेवाडी भजनी मंडळ दत्तकृपा भजनी मंडळ धामणी या दिवशीच प्रसाद वार्ड क्रमांक चार ने दिली. पाचव्या दिवशीची कीर्तन रुपीस सेवा ह. भ. प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री नेवासा यांची सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कलशारोहण २४ व्या वर्धापनदिनी कीर्तन झाले . सायंकाळी ह .भ .प .अमृत महाराज जोशी यांचे कीर्तन झाले.जागर ढोरेवाडी भजनी मंडळ ,होलेवाडी भजनी मंडळ, संत सेवा भजनी मंडळ बेळगाव शोभाबाई भजनी मंडळ कुरवंडी, भाबुरवाडी भजनी मंडळ ,मांदळवाडी भजनी मंडळ यांचा जागर झाला . अन्न प्रसाद वार्ड क्रमांक पाच ने दिला. सहाव्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा ज्ञानेश्वर महाराज शिंदे अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे झाले .जागर ढोरेवाडी भजनी मंडळ, होलेवाडी ,भजनी मंडळ संत सेवा भजनी मंडळ वेहळदरा चोंभाबाई भजनी मंडळ कुरवडी , भाबुरवाडी मांदळवाडी या भजनी मंडळांचा जागर झाला . अन्नप्रसाद वार्ड क्रमांक सहा ने दिला . सातव्या दिवशी ची कीर्तनरुपी सेवा ह .भ .प. सुभाष महाराज जाधव निरा यांचे झाले. हरिजागर पांडुरंग भजनी मंडळ जरेवाडी ,खरपुडी, आंबेठाण ,जातेगाव, हैबतबाबा भजनी मंडळ कनेरसर ,वाकळवाडी या भजनी मंडळांचा व रोकडोबा भजनी मंडळ रेटवडी यांचा जागर झाला. वार्ड क्रमांक सहाणे अन्नप्रसाद दिला . काल्याचे किर्तन अनिल महाराज पाटील बार्शी सकाळी दहा ते बारा वाजता झाले. या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये हार्मोनियम श्रीरंग चौधरी पाटील गुरुजी आणि मृदुंगमणी महेश महाराज गाडे पूर , भागरे गुरुजी आळंदी यांनी केले. गायक म्हणून ह.भ. प.महाराज शंकर ढोरे ,वसंत पवळे, शिवाजी पवळे, शिवाजी लंगोटे, बबन नाना पवळे, गणपत नायकवडी ,मारुती पवार, पराड महाराज, मच्छिंद्र अभंग यांनी सुरेख काम केले आहे. भालदार ,चोपदार म्हणून येथील ह .भ .प .लक्ष्मण महाराज पिंगळे व ह .भ. प .दगडू महाराज रोडे यांनी केले. गावातील अनेक भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी व तालुक्यातील अनेक लोकांनी देणगी व वस्तू रुपी मदत केली आहे. सप्ताहाचे आयोजन नियोजन गुळाणीतील अखंड हरिनाम सप्ताह मंडळ ग्रामस्थांनी व गावातील सर्व संस्थांच्या पदाधिकारी वर्गाने केली आहे .दररोज किर्तन रुपी सेवेसाठी कमीत कमी तीन ते चार हजार भाविक भक्त गुळाणी आणि परिसरातून येत असून कीर्तनाचा लाभ घेत होते. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी अन्नप्रसाद घेण्यासाठी गुळाणी आणि परिसरातून दहा ते बारा हजार भाविक भक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते . सर्व कीर्तनकार महाराज यांनी ज्ञान, भक्ती, कर्म आणि समाज प्रबोधन यावर किर्तन रुपी सेवा केली आहे.सप्ताहाचे नियोजन अगदी आदर्श केल्यामुळे तालुक्यातून सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा