महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज मंचरला ए श्रेणी प्राप्त

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 




खेड ( प्रतिनिधी विजय कानवडे ):  दि. १९, रयत शिक्षण संस्था सातारा संचलित महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर या विद्यालयाला पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सण २०२२ या शैक्षणिक वर्षात जे मूल्यांकन करण्यात आलं त्या मूल्यांकनामध्ये आणि जी स्तर निश्चिती करण्यात आली त्यामध्ये या विद्यालयाला ए श्रेणी प्राप्त झालेली आहे. हे विद्यालय आंबेगाव तालुक्यामध्ये ए श्रेणी मध्ये प्रथम आलेले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या विद्यालयाचा १९ वा क्रमांक प्राप्त झालेला आहे.

 रमेश चव्हाण आय ए एस मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. या विद्यालयासाठी विद्यालयाचे प्राचार्य आवारी, उपमुख्याध्यापिका भांगरे वाय डी चासकर इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे कर्तुत्व व नेतृत्व हे शाळेला भविष्यामध्ये प्रगतीच्या पथावर नेणारे असल्याने त्यामुळे शाळेला नैपुण्य व दर्जा मिळाला आहे. सहकार्य करणारे संजय बांधले, अश्रफ पठाण, दिलीप चौधरी, विशाल पोंगडे व इतरही सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.  मंचर तालुक्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय मंचर व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक झालेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात