राजकीय वर्तुळातून मोठी बातमी: काॅंग्रेसचे नेते मिलींद देवरा यांचा राजीनामा ; ट्विट करून दिली माहिती

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 




पुणे (प्रतिनिधी) दि.१४, राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काॅंग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी अचानक काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देवरा यांनी एक्स वरून ट्विट करत ही माहिती दिली आहे.

यामध्ये, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी @INCIndia च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, माझ्या कुटुंबाचे 55 वर्षांचे नाते संपुष्टात येत आहे." अशी ट्विट देवरा यांनी केली आहे. दरम्यान पक्ष सोडण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.

https://twitter.com/milinddeora/status/1746368092736037291?t=PwWoycVdjh_HHiyvvyQS1w&s=19

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद