जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी च्या अध्यक्ष पदी सरोजनी कदम

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



शिराळा प्रतिनिधी ( जितेंद्र गायकवाड ) : ता.१६ शिराळा येथे नूतन अध्यक्षा मा.सौ. सरोजिनी कदम आणि पदाधिकारी यांचा पदग्रहण व शपथविधी समारंभ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रदीप पाटील सर सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मा.सौ. शामला जयसिंगराव खोत- पाटील, तहसीलदार शिराळा तालुका, तसेच सौ. शीला चौगुले, खजिनदार, जा.वे.फा.फेड.२ क,मा. भूषण शहा समन्वयक, जा.वे.फा.फेड.२क, उपस्थित होते.

ग्रुपचे नूतन सदस्य, पदाधिकारी व नूतन अध्यक्ष मा. सरोजिनी कदम यांना युनिट डायरेक्टर मा. दुष्यंत राजमाने यांच्या शुभहस्ते शपथ देण्यात आली. फेलो ऑफ जायंट्स हा सन्मान सौ. सविता नलवडे यांना शिराळा तालुक्याच्या तहसीलदार  शामला खोत पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी स्वाती भस्मे, साई सिमरन घाशी, डॉ. मनीषा यादव, डॉ. साधना पाटील यांचा ही  विशेष सत्कार करण्यात आला  सत्कार झाल्या नंतर प्रमुख मान्यवरानी मनोगत व्यक्त केले तसेच मकर संक्रांती निमित्त 

महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत-डॉ. मनीषा यादव यांनी केले. प्रार्थना-प्रज्ञा चरणकर व ॲड.नेहा सूर्यवंशी यांनी केली. प्रास्ताविक-डॉ.सविता नलवडे सूत्रसंचालन-शैलजा काकडे व डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला शिराळा परिसरातील पत्रकार बंधू, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंग जायंट्स,शिराळा चे अध्यक्ष विशाल खुर्द व  पदाधिकारी, जागृत ग्राहक राजा चे हंबीरराव देशमुख, अनंत खोचरे, सौ. सारिका पाटील (मांगले), शिवाजी चौगुले, रवी यादव, जितेंद्र गायकवाड, तसेच जायंट्स ग्रुप इस्लामपूरचे माजी अध्यक्ष नितीन फल्ले रेश्मा पवार, ज्योती गुरव व नवीन सदस्य-पद्मजा पाटील, दिपाली निकम, कांचन कांबळे इतर सर्व मान्यवर बंधु भगिनी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाचे काम प्रज्ञा चरणकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात