चांदूस येथील जिल्हा परिषद शाळेत खाऊ गल्ली आणि आठवडा बाजाराचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी / संतोष गाडेकर



शनिवार दि. 13, खेड तालुक्यातील चांदुस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि देवाणघेवाणीची माहिती व्हावी या संकल्पनेतून खाऊ गल्ली आणि आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी  सकाळी आठ वाजता  मुख्याध्यापक जंगली , सर्व प्राथमिक शिक्षक, आजी माजी पदाधिकारी तसेच सरपंच यांच्या हस्ते या विद्यार्थी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.  गावातील महिला व तरुण वर्ग यांनी या विद्यार्थी बाजारात सहभाग नोंदविला . 




 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पालेभाज्या व्यवसाय करताना आनंद  होताना पाहायला मिळाला.  'भाजी घ्या भाजी' अशा मधूर आवाजात विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष वेधून घेतले. खाऊ गल्लीमध्ये अनेक छोटे स्टॉल तयार करण्यात आले होते. पावभाजी ,बटाटा वडा, लिंबू सरबत ,ओली भेळ, पाणीपुरी, सर्व स्टॉलवर एकच गर्दी झाली होती. ग्रामस्थ पालक छोट्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आनंदाने खाऊ गल्लीचा स्वाद घेतला आणि भाजी मंडई. खाऊ गल्ली एक दिवसाचा बाजार संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद