सावित्री नदीच्या पुलावर अपघात ; चार जण गंभीर जखमी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर ( प्रतिनिधी योगेश रांजणे ) : वीकेंड ची सुट्टी असल्याने दापोली येथे निघाल्यल्या लंभिया कुटुंबाच्या गाडीचा जुन्या सावित्री नदीच्या पुलावर अपघात चार जण गंबिर जखमी झाले आहेत. जखमींना आमदार भरत गोगावले यांनी मदतीचा हात दिला. दापोली पंढरपूर मार्गावर महाड तालुक्यातील बोरव गावा जवळ सावित्री नदी वरील जुन्या सावित्री आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.हेवी डंपर व स्विफ्ट डिझायर गाडीची समोर समोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघात मध्ये स्विफ्ट डिझायर कार मध्ये पाच प्रवासी होते. या मध्ये चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या वेळीस महाडचे आमदार भरत गोगावले यांचा ताफा याच मार्गावरून जात असताना अपघात झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच आमदार भरत शेठ गोगावले यांनी तत्काळ जखमींना त्याच्या ताफ्यात आलेल्या पोलिस वाह्यान मधून उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी प्रसाद शांताराम लांबे वय वर्ष 34 दिपाली प्रसाद लांबे वय वर्ष 34 दीप शिवाजी जाधव वय वर्ष 25 अमित भालेराव वय वर्ष 38 मयूर सखाराम राणे वय वर्ष 30 हे सर्व राहणार नरे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथून आपल्या ताब्यातील MH 12BT0705 स्विफ्ट डिझायर कार मधून दापोली येथे फिरण्या करीता जात असताना दापोली पंढरपूर महाड बोराव गावा जवळ जुन्या सवित्र पुलावर आले असता समोरून येणाऱ्या MH 06 BD0535 क्रमांकाच्या हेवी डंपरला स्विफ्ट डिझायर कार चालकाची अचानक झोप लागल्याने समोरासमोर धडक दिल्याने अपघात घडला. या अपघाताची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटना स्थळावर पोहुचून या मार्गावर काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. सदर आपघताची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महाड पोलिस ठाण्याचे साय्यक पोलिस निरिक्षक मारुती आहंदळे यांच्या मार्गर्शनाखाली एमआयडी पोलिस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा