महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन ; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई दि.२३, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मानले जाणारे मनोहर जोशी  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद