पुण्यातील वेळअमावस्या स्नेह भोजनास आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुनिभाऊ कांबळे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्तिथी ; बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांचा सलग 17 वर्षाचा विक्रम
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे (प्रतिनिधी) - बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. गेल्या १७ वर्षापासून पुण्यातील अक्कलकोट चे रहिवासी साठी वेळ अमावस्याचा कार्यक्रम नित्य नियमाने दर वर्षी केला जात आहे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पुणे कॅन्टोमेंट चे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र येवून आपली उपस्थिती दर्शवली व एकत्र च या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी हजोरो च्या संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला मंडळीनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळ जवळ ४००० लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजनबद्द केल्याबद्दल मा. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्याकडून आयोजकवरती कौतुकाचा वर्षाव झाला.कार्यक्रम दरम्यान साप्ताहिक गावगाथा अंकाचे प्रकाशन झाले आणि मिलिंद लडगे प्रस्तुत नवरदेव BSC AGRI या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले, यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्तिथ होती.या चित्रपटास अक्कलकोट चे संजीवकुमार हिळी हे कॅमेरामन असुन सर्व अक्कलकोट करांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.यापुढे दरवर्षी कार्यक्रमाला येणार अशी ग्वाही दिली व व अक्कलकोटकरांसाठी उपस्थित असलेले आमदार सुनिलभाऊ कांबळे, बाबाशेठ मिसाळ,नगरसेवक पिंटू भाऊ धाडवे, सीनियर PI महेश बोळकोटगी, भीमराव साठे, शिवशंकर डेरी चे मालक मुथु शेठ उद्योगपती बोरे,विवेक शेकापुरे, धोंडप्पा नंदे आणि इतर सर्व मान्यवरांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योगपती मधुकर सुरवसे, शैलेश जाकापुरे विरभद्र हारकुड, कल्याणराव मंठाळे, रविंद्र गुळगोंडा, सी.एम.पाटील, पंडीत जकापुरे, लक्ष्मण माने राजशेखर दुर्गे, नीलकंठ हिळ्ळी, योगीनाथ हिरेमठ, काशिनाथ प्रचंडे, अप्पू बिराजदार, मल्लिनाथ गद्दी, शिवानंद बिराजदार, शरणय्या स्वामी,मल्लीनाथ साखरे साहेब, राजशेखर म्हेत्रे, संजय कलशेट्टी, सुरेश माळी, अप्पु पुजारी, शरणप्पा हुळबेटे,सागर जाधव, हणमंत आल्लापुरे, निळकंट मुगळी, मल्लु कुंभार, शरीफ मकानदार, जयंत क्षीरसागर, तानाजी कुशेकर, शिवा मेळकुंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन काशिनाथ प्रचंडे यांनी केले व आभार प्रदर्शन पंडित जाकापुरे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा