पोस्ट्स

गोल्डन कार्ड काढणे शिबीरास लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी/ विशाल खुर्द        शिराळा दि.२३,    शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून निवड झाली असून गोल्डन कार्ड धारकांना दरवर्षी पाच लाखापर्यतचा आरोग्य विषयक उपचार मोफत मिळणार असल्याने शिराळा नगरपंचायत मार्फत आज दिनांक 23/01/2023 व दिनांक 24/01/2023 रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यापैकी दिनांक 23/01/2023  रोजी शिराळा शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर शिराळा , लक्ष्मी मंदिर, कदमवाडी रोड नवजीवन वसाहत शिराळा , इंदिरा गणेश मंडळ शिराळा , यादव हॉस्पिटल जवळ कॉलेज रोड, शिराळा , मारुती मंदिर होळीचे टेक शिराळा या 5 ठिकाणी आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून  एकूण 350 गोल्डन कार्ड काढण्यात आले आहेत. तरी उद्या दिनांक 24/01/2023 रोजीही सदरचे शिबिर

इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / लतिफ शेख   खेड : इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष छगनजी राठोड अशोक तोडमल ,उद्योजक व प्रेरणादायी वक्ता ,मनोज कुमार ढगे , कृषी अधिकारी वैभव चव्हाण ,सर्जेराव पिंगळे , सतीश नाईकरे ,राष्ट्रपती पदक विजेते विठ्ठल भोर ,केशव बनकर , चेतन पोखरकर , साहेबराव सातकर , पत्रकार दत्ता भगत , रामदास रेटवडे, व आसपास गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते . या मॉलमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट , हेल्थकेअर , सौंदर्य प्रसाधने ,आर्युवेदिक उत्पादने व 100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट राजूनगरमधील लोंकाना  प्राप्त होणार आहे . या कार्यक्रमाची दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रेरणादायी वक्ते अशोक तोडणकर यांनी आपले विचार व्यक्त केले . व कंपनीचे अध्यक्ष छगन जी राठोड यांनी कंपनीचे तीन उद्दिष्टे सांगितली ती म्हणजे जमिनीला काळ्या आईला वाचवणे ,राष्ट्रप्रेम , व समाज जागृती , व महिला सबलीकरण , हे कंपनीचे उद्दिष्ट असून प्रामुख्याने रासायनिक खत वापरल्यामुळे अनेक आजारांचे मूळ आहे , सेंद्रिय खताचे

ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी -विजय धादवड आळंदी देवाची : मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी देवाची मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थीनी राजमाता जिजाउंच्या वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली..याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे, , मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋतुजा भारंबे व अक्षरा आघाव यांनी केले.

शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनेलने उडविला परिवर्तन पॅनेलचा धुव्वा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / बाळासाहेब मुळे खेड/ चाकण : शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या पतसंस्थेची निवडणूक पार पडली यामध्ये दोन पॅनल अनुक्रमे विकास पॅनल,  परिवर्तन पॅनल व अपक्ष या मध्ये मतदान झाले.      मतदान प्रक्रिया पार पडली असता विकास पॅनलने १२/० अशी बाजी मारली .इतर मागास प्रवर्गामधुन मधुकर नाईक ,सर्वसाधारण प्रवर्गामधुन  अविनाश कड ,विजय पवार ,राजेंद्र चौधरी ,बाळासाहेब  मुळे आदलिंगे विलास, काळे संतोष, घेनंद पांडुरंग ,घोरपडे सरिता  ,टोपे एकनाथ  ,शेलार नंदकुमार , अनुसूचित प्रवर्गामधुन आव्हाड प्रशांत हे बारा उमेदवार बहुमताने विजयी झाले. एकुण १५ सभासद असुन तीन बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे भटक्या जाती प्रवर्गातुन देवकाते हरीदास, महिला वर्गातून खराबी प्रिती, शेरकर अंजली यांची निवड झाली.      महत्वाचे म्हणजे विरोधी पॅनलने निवडणूक प्रचारा दरम्यान अपप्रचार करुन सुध्दा सुजान मतदारांनी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडूण दिले.       विकास पॅनला भरघोस मतदान करुन सर्व शिक्षक सेवकांचे आभार व्यक्त करताना विकास पॅनलचे प्रमुख मधुकर ना

जि.प.प्राथमिक शाळा -ठाकरवाडी वेताळे शाळेस एनप्रो इंडस्ट्रीज लि.पुणे व रोटरी क्लब ऑफ निगडी ,कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांचे कडून साहित्य वाटप

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर      राजगुरुनगर  दि.१२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी वेताळे या शाळेस  एनप्रो इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे, रोटरी क्लब ऑफ निगडी - पुणे, कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांच्या वतीने अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.  यामध्ये, १. ई-लर्निंग व सोलर संच २. पिण्याच्या पाण्याची १५०० लिटर पाण्याची साठवणूक क्षमतेची टाकी , लोखंडी स्टँड व संपूर्ण प्लंबिंग ३. कृतियुक्त शैक्षणिक साधने ४. शालेय परसबाग ५. वृक्षारोपण ६. २ के.व्ही. क्षमतेचे सौरउर्जा  संच युनिट  ७. सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.         कडूस, दोंदे , वेताळे, सायगाव या ग्रामपंचायत क्षेत्रातील १४ ठाकर वस्त्यांमध्ये ग्राम समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी क्षेत्रातील ठाकर वस्त्यांसाठी आदिवासी विकास योजनेअंतर्गत शाळेस या सुविधा उपलब्ध करत देण्यात आल्या. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व कामाचे मान्यवरांनी कौतुक केले. समाजातील लोकांनी विकासात्मक कामामध्ये स्वतःहून पुढे येऊन आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्या साठी योगदान देणे ग

ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ११: जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.  निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब  २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्

कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’ वर- कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ११: मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन उद्योग विक्री केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. गुप्ता यावेळी म्हणाले. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी उपस्थित होते. कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात, असे सांगून श्री. गुप्ता म्हणाले, बंदीजनांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कायद्यानुसार बंद्यांना पुरवणे आवश्यक असलेल्या स

अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ११ : महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे ६८ व ८४ कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात ७ ते ९ जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण २९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर २५ आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण ३७ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.  यापूर्वी सप्टेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये अशा प्रकारचे एकूण ३५ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यामधील एकूण ७१ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून १ लाख २७ हजार ८०० रुपये  इतका दंड करण्यात आला आहे.  याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समुळ उच्चाटण करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये ३८२ सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्ग

पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्धघाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि.११: राज्याचे पोलीस महासंचालक  रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिह, कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, होमगार्डचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार,पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.  पुण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा नगरीत  पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे आयोजन होत असल्याचबाबत आनंद व्यक्त करून श्री. सेठ म्हणाले,  पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण १३ संघ सहभागी होत असून १८ क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. राज्यातून २ हजार ५९० खेळाडू सहभागी झाले आहेत.  पोलीस दलातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य, खेळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आह

एल एम एस तर्फे खेडमध्ये दिनांक सहा व सात जानेवारी 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल राजगुरुनगर येथे खेड व मावळ तालुका यांच्या स्पर्धा संपन्न

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख खेड :  इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्पर्धेचे आयोजन केले बजाज ऑटो लिमिटेड आणि एल एम एस स्पोर्ट फाउंडेशन यांनी या स्पर्धेचे नियोजन केले या स्पर्धेत कबड्डी कबड्डी खो-खो रीले रसिखेच या स्पर्धा घेण्यात आल्या निकाल पुढीलप्रमाणे , कबड्डी प्रथम क्रमांक वसंतराव मारोतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी द्वितीय क्रमांक रामभाऊ माळगे विद्यालय कडूस तृतीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय राजुर नगर चतुर्थ क्रमांक शिवाजी विद्यामंदिर चाकण मुले प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर शिवाजी विद्यामंदिर चाकण तृतीय क्रमांक वसंतराव मारोतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी चतुर्थ क्रमांक श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय वडमुखवाडी खो खो मुली साजिनाथ महाराज विद्यालय वडमुखवाडी रामभाऊ परळीकर विद्यालय तळेगाव दाभाडे तृतीय क्रमांक श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय बाबुराव चतुर्थ क्रमांक श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण मुले प्रथम क्रमांक रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय तृतीय क्रमांक रामभाऊ परळीकर विद्यालय त

चाकण येथे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / सोहम भगत   चाकण दि. ६, चाकण येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्थेच्या सभागृहात स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक, शहर प्रमुख महेश शेवकरी, जमीर काझी, चाकण पतपेढीचे चेअरमन राहुल परदेशी, उपनगराध्यक्ष ॲड.प्रकाश गोरे,सोसायटीचे सर्व आजी माजी चेअरमन, संचालक तसेच बाजार समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या तैलचित्राचे सौजन्य युवा इन्फ्रास्ट्रकचर्स हे होते. यावेळी सूत्रसंचालन अशोक जाधव व आभार सोसायटीचे मा. चेअरमन गोरक्षनाथ कांडगे यांनी केले.

जि.प.प्राथ.शाळा-थिगळस्थळ ची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर         31जुलै 2022रोजी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा थिगळस्थळ ने दैदिप्यमान यश संपादन केल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सातकर यांनी सांगितले. शाळेतील आर्या प्रकाश थिगळे हिने २८०गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत शहरी विभागात ९वा क्रमांक प्राप्त केला असून शाळेतील अजून १५विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.  प्रज्ञा योगेश माळशिरसकर २७६गुण , प्रसाद विश्वास ओव्हाळ २७६गुण, कार्तिक विकास मनकर २७०गुण, अनुष्का सुनील धंद्रे २६८ गुण, वेदिका आत्माराम शिंदे २६२गुण,श्रेयाली बाबाजी कोरडे २६०गुण, संस्कृती काळूराम ठाकूर २५४गुण, संचिता गणेश सांडभोर २४८गुण, अथर्व अरविंद पारधी २४६गुण, सायली शरद भोकसे २४०गुण, आदित्य शरद ठाकूर २३८गुण, धनश्री काशिनाथ बागुल २३८गुण, सिद्धेश सुधीरकुमार गोसावी २३६गुण,मयूर संजय गोरख २३४गुण व आर्यन पांडुरंग जैद २३२गुण असे थिगळस्थळ शाळेचे  एकूण १६ विद्यार्थी यावर्षी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षिका सुचिता दौंडकर - कराळे तसेच सहकारी शिक्षक अनुराधा बोरकर, महादू राळे

रेड, बेलदारवाडी जि. प. शाळेचे वनभोजन उत्साहाट संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी -रणजित चव्हाण  शिराळा : जि प शाळा रेड, बेलदारवाडी शाळेचे वन भोजन म्हसोबा मंदिर रेठरे धरण या ठिकाणी संपन्न झाले.सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास बेलदारवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील व उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, ग्रामसेवक प्रमोद माळी, लोकप्रतिनिधी सुधीर बिळासकर, राजेंद्र घारगे. अंगणवाडी रेड व बेलदारवाडी अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होत्या. भरारी पथकाचे खोत व गायकवाड सर उपस्थित होते. सदर परिसर चिमुकल्याच्या आवाजाने गजबजून गेला . गोष्टी, गाणी, बडबड गीते विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. परिसरातील विविध गोष्टींचे निरीक्षण करण्यास सांगितले. सर्वांनी चुलीवरच्या भोजनाचा मनमुराद आनंद लुटला. रेड शाळेचा मुख्याध्यापिका पूजा विभुते, वैशाली कारंडे, बेलदारवाडी शाळेचे मुख्याध्यापक अमोल जाधव,  शिक्षक तानाजी कदम उपस्थित होते.

बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवून महाराष्ट्र सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे सह-संस्थापक आणि कायदेशीर सल्लागार यांच्यावर आयपीसी सेक्शन ४२०,५०५ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.२६, रॅपिडो बाईक टॅक्सीचे सह-संस्थापक अरविंद सांका आणि कायदेशीर सल्लागार शंतनू शर्मा यांना पुणे शहर पोलिसांनी बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवण्याप्रकरणी आणि संबंधित कर न भरून महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची  फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार, रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप चालवणारी कंपनी रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध २४ नोव्हेंबर रोजी बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. भारतीय दंड संहितानुसार  कलम 420, 505, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ अधिकाऱ्याच्या पुरवणी निवेदनानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २६: ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे यांच्यावतीने आयोजित लोकन्यायालयामध्ये २३० खटल्यांच्या तडजोडीतून ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधिकरणाचे प्रबंधक एस. एम. अबूज यांनी दिली. ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयाने तसेच पुणे डी.आर.टी. बार असोशिएशनच्या सहकार्याने शनिवारी (२४ डिसेंबर) लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उद्घाटन ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष तथा केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक मेनन आणि पुणे ऋण वसुली न्यायाधिकरणाचे पिठासीन न्यायाधीश तथा निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिलीप मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आले.  या लोकन्यायालयामध्ये १ हजार ३८ खटले तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३० खटले तडजोडीने मिटविण्यात यश आले. या तडजोडीतून बँकाची एकूण ६०४ कोटी रूपयांची वसुली झाली आहे. त्यापैकी एक खटल्यामध्येच १४९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.  या लोकन्यायालयामध्ये न्यायाधिशांचे ५ पॅनेल तयार करण्यात आले होते. त्यामध्ये पॅनेल प्रमुख म्

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि २६:  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी २८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल.   दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्

तृतीयपंथीयांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.२६: समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. भवानी पेठ येथील संत ज्ञानेश्वर समाज मंदिर येथे आयोजित या शिबिर कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, मनपा क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तालुका समन्व्यक मंगेश गाडीवान, सोस्वा ट्रेनिंग इन्स्टिट्युट व तृतीया फाऊंडेशन पुणेचे सदस्य, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या प्रेरणा वाघेला, आशिका पुणेकर, कादंबरी, मित्र क्लिनिकचे मधु गुरु आदी उपस्थित होते.   यावेळी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर म्हणाल्या, तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यामध्ये राज्यात पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून जिल्ह्यात आतापर्यंत ३४३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.   तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क व  त्याचे महत्व सांगून जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी करावी. तसेच https://transgender.dosje.gov या पोर

पिंपरी-चिंचवडच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या म्हणजेच सोमवारी (दि.२६)  सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे.  नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या सभेसाठी महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही - सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला  नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.             मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.             राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद

लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क नागपूर, दि. 22 :- लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते. संसदीय कार्य मंत्री श्री.पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामांबाबत दूरदृष्टी असली पाहिजे. मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील निधी मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन निवडून दि

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             नागपूर, दि. 22 : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.             उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलिकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करून सुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या

नागरिकांना रॅपीडो ॲपचा वापर न करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.२३-मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स २०२० अनुसार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपीडो) यांनी दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक अनुज्ञप्ती  (ॲग्रीगेटर लायसन्स)  मिळण्याकरिता केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नाकारल्याने  नागरीकांनी रॅपीडो अॅपचा वापर करू नये आणि परवानाधारक वाहनांचा वापर करून   सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे  यांनी केले आहे.   समुच्चयकाची अनुज्ञप्ती  जारी करण्यासंदर्भाने केंद्र शासनाने २७  नोव्हेंबर  २०२० रोजी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. मे.रोपन ट्रान्सपोर्टेशन यांचा दुचाकी व तीनचाकी समुच्चयकाची अनुज्ञप्ती मिळण्याकरिताचा अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचेकडे १६ मार्च २०२२ रोजी प्राप्त झालेला होता. त्यावेळी अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने व अर्जदार यांनी सदर त्रुटींची पुर्तता विहित कालमर्यादित केली नसल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी मे रोपन ट्रान्सपोर्टेशन स

आदर्श विद्यालय आंबोली विज्ञान प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख खेड : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे गेली 26 वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी उत्तम भावी नागरिक बनावे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. 30 वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2022-23 या प्रदर्शनाचा नुकताच जिल्हास्तर व राज्यस्तरीय प्रदर्शन 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन पार पडले. यात आदर्श विद्यालय आंबोली चा करंट लिकेज इंडिकेटर हा प्रकल्प गुजरात मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीसाठी निवडला आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शन 16 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर2022 या कालावधीत पार पडले. यात जिल्ह्यातून सुमारे 279 प्रकल्पांचा समावेश होता नंतर प्रत्येक जिल्ह्यातून येणारे प्रकल्प असे राज्यस्तरावर 260 प्रकल्प आले होते. राज्यस्तरावर दोन फेरीत सादरीकरण झाले पहिल्या फेरीत 260 मधून 60 प्रकल्प निवडले गेले व दुसऱ्या फेरीत 30 प्रकल्प निवडले गेले यात आंबोलीचा करंट लिकेज इंडिकेटर या प्रकल्पाचा समावेश होता.  पुढे नॅशनल पातळीवर दिनांक 27/01/2023 ते 01/01/2023 यादरम्यान अहमदाबाद या ठिका

लोकराज्यमधील विषय समाज परिवर्तनशील -डॉ. नीलम गोऱ्हे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             नागपूर, दि.21 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेल्या 'लोकराज्य' मासिकामधील विषय हे समाज परिवर्तनशील असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.             नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने विधानभवन परिसरात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास त्यांनी भेट दिली,  त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी आमदार अभिजित वंजारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहूल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकार प्रविण टाके, गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, विधानमंडळातील अवर सचिव पुष्पा दळवी यांची उपस्थित होती.             उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित ह

रिंग रोडचे काम मुदतीत पूर्ण होणार-- मंत्री शंभूराज देसाई

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क        नागपूर, दि. 21 : “पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले             संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.पश्चिम भागातील रिंग रोड प्रक्रिया फेब्रुवारी 2023 मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच सुरू केला जाईल.यासाठी मोबदला दुप्पट केला आहे. या रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.             पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडबाबत सदस्य ॲड. राहुल कुल यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्ती कर रद्द करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             नागपूर, दि. २१ : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांवरील शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय शासन घेईल, असे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जाहीर करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका 267 अ नुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना लावण्यात येणाऱ्या शास्ती कर निर्णयांची यापुढे कडक अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली.             उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्या श्रीमती मंदा म्हात्रे, किशोर जोरगेवार यांनी सहभाग घेतला.             उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड परिसरातील अवैध बांधकाम नियमित करण्यासाठी योजना आणणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. एक हजार चौरस फुटापर्यंत शास्तीकर माफ करण्यात येणार आहे. तसेच एक हजार ते दोन हजार चौरस फुटापर्यंत 50 टक्के दराने व दोन हजार चौरस फु

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा ; पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क नागपूर, दि. २१: पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.  यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार श्री. भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दुरदृष्यप्रणाली

अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी प्रशिक्षण

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महिने कालावधीचे 'सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी' या विषयावरील  मोफत प्रशिक्षणाचे आयोजन २६ डिसेंबर पासून करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण अनिवासी हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत होणार असून या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा  संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकमुनिकेशन पदवीधारक असावा अथवा उमेदवाराने समतुल्य संगणकाचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. प्रशिक्षणात संबंधित विषयाची तांत्रिक माहिती, उद्योजकता विकासाचा अभ्यासक्रम, उद्योग सुरु करण्याबाबतची माहिती, कर्ज प्रकरण, शासकीय अनुदान, प्रकल्प अहवाल, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ इत्यादी माहिती दिली जाणार आहे.  प्रशिक्षणासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी २४ डिसेंबर पर्यंत ९८२२०६८१६५ किंवा ९४०३०७८७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी मदन कुमार शेळके यांनी केले आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २१:  राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २३ डिसेंबर रोजी विविध शासकीय कार्यालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना व तक्रार निवारण प्रणालीबाबत माहिती देणारे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात  वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजन मापामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगणे, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आदीबाबत जागरूकता येण्याच्यादृष्टीने संदेश देणारे विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.  नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे  आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २१:  जिल्हा जात पडताळणी समितीच्यावतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहीमेबाबत माहिती देण्यासाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान टाळण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचे असल्याने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेमधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये पुणे यांनी दिले आहेत. त्यानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत जात वैधता प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धती विषयावर  मार्गदर्शन करण्यात आले. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून मुळ प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी समि

नाविंदगी ग्रामपंचायतीवर पुन्हा 'प्रभुमल्लेश्वर गाव विकास पॅनल'चा वर्चस्व ; पंडित चव्हाण यांची बाजी

इमेज
नाविंदगी (प्रतिनिधी/दयानंद गौडगांव) दि,२०, अक्कलकोट तालुक्यात बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेल्या नाविंदगी ग्रामपंचायत निवडणुकीचा अखेर आज लागला आहे. श्री प्रभुमल्लेश्वर गाव विकास पॅनलचे थेट सरपंच पदासाठीचे अधिकृत उमेदवार पंडीत थावरू चव्हाण हे विजयी झाले आहेत. पंडित चव्हाण यांनी श्री प्रभुलिंगेश्वर गाव जनसेवा विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार चौडप्पा प्रकाश वड्डे यांचा जवळपास १९८ मतांनी पराभव करत आपला वर्चस्व सिद्ध केला आहे. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत पंडीत थावरू चव्हाण यांना एकूण १९५५ मतांपैकी १०७१ मते तर चौडप्पा प्रकाश वड्डे यांना ८७३ मते (इतर मते NOTA) पडली आहेत.  दुसरीकडे सदस्य पदासाठीच्या उमेदवारी मध्ये उलट परिस्थिती पहायला मिळाले आहे. श्री प्रभुमल्लेश्वर गाव विकास पॅनलच्या सदस्य पदासाठीच्या उमेदवाराचा श्री प्रभुलिंगेश्वर गाव जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवाराने पराभव केला आहे. दरम्यान तुर्तास तरी मतदारांनी पंडीत चव्हाण यांना कौल दिला आहे. राजकारणातला तब्बल १५-२० वर्षांच्या दिर्घ अनुभवाचा फायदा त्यांनी करून घेतला आणि ते गावाचा विकास करतील अशी अशा गावकरी व्यक्त करीत आहेत.

नाविंदगी ग्रामपंचायत निवडणुकीत ८१% मतदान ; प्रतिक्षा निकालाची

इमेज
नाविंदगी दि . १८ , अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी ग्रामपंचायत निवडणुक (आज दि.१८) पार पडली. यास मतदारांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. गेल्या काही दशकांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक, म्हणजेच तब्बल ८१% मतदान झाले आहे. यामध्ये इतर सर्व सदस्य बिनविरोध निवड झाल्यानंतर केवळ सदस्य पदासाठी दोन तर थेट सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते . यावेळी, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आले होते. अत्यंत शांततेत मतदारांनी आपला हक्क बजावला. आता मंगळवारी (दि.२०) निकाल पाहायला मिळणार आहे. निकालाची उत्सुकता गावकऱ्यांना लागली आहे.

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रध्दांजली

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १०: - “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जीवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कीट सहलीला नागरिकांचा प्रतिसाद

इमेज
 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.९: विभागीय पर्यटन कार्यालयाच्यावतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कीट सहलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सहलीत विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी, दिव्यांग आदींनी सहभाग घेतला. आमदार उमा खापरे यांच्याहस्ते जेट इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट चिंचवड येथे सहलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील सेनापती बापट मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरियल सिम्बायोसिस महाविद्यालय,  अहमदनगर मार्गावरील आगाखान पॅलेस, नगर परिषद तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय पयर्टन सहायक संचालक सुप्रिया करमरकर दातार यांनी दिली आहे.

औंध आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ८ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर बनवणारी योजना आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचा आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे  सहा. सल्लागार (तां). यशवंत कांबळे व  उपसंचालक आर. बी. भावसार  यांनी केले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०:  मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथक

'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यान संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०:  सामाजिक न्याय विभागातर्फे २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत 'सामाजिक न्याय पर्व' म्हणून साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत 'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्यवाह प्राध्यापक राजेंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळींवर भाष्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या व्यापक विषयावर माहितीपर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व त्यांनी वंचित घटकांसाठी केलेल्या विविध चळवळी याबाबत सखोल माहिती दिली. सत्यशोधक ढोक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून ‘सत्यशोधक विवाह’ संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती देत त्यांनी सत्यशोधक विवाह संस्था व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार यावर प्रकाश टाकला. समाजातील युवक-युवतींनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन केले. सत्यशोधक पद्धतीने लावण्यात येणारे विवाह मोफत करण्यात ये

पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेला सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय येथे  विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.   २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती, अनाथ आदी प्रवर्गातील पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये इयत्ता ११ वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थीनींनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.   या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ९०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.   विद्यार्थीनी बाहेरगावची परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारी असावी. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका,  प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकाचे आधा

बैलगाडा शर्यतींना पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर परवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: राज्य शासनाने प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मध्ये सुधारणेची अधिसूचना  जारी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये  लम्पी चर्मरोगाच्या अनुषंगाने संबंधीत तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडील अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मध्ये सुधारणेची अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सयव्यवसाय विभागाने काल जारी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या उपविभागाच

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक चालकांना आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  ऊस वाहतुकीची ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी अशी वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने प्रवास करीत असतात. प्रवास करताना किंवा उभे असताना दृष्यमान नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकींग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होते. हे टाळण्यासाठी वाहन मालक चालकांनी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिंग टेप लावावे. एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करु नये. वाहनांचा वेग योग्य मर्यादेत ठेवणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करु नये.  वाहने रस्त्याच्या

जिल्हास्तरीय युवा गट कार्यशाळेचे १ डिसेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळा’ तसेच स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ‘उद्योजकता विकास’ या कार्यक्रमांचे आयोजन १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.    सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसोर, येरवडा येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित  कार्यशाळेत जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर यांनी केले आहे.

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क               मुंबई, दि. 24 : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.             सन 2021 मध्ये श्री. अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) तसेच सन 2022 मध्ये श्री. जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था), दिव्यांग कल्याण आयुक्ताल

‘अमृत महाआवास अभियान 2022-23’-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात  20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  24 नोव्हेंबर, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम, मुंबई येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या अभियानामुळे 5 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम क

अग्नीवर भरती प्रकियेचा निकाल घोषित

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २३ : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या 'अग्नीवीर भरती' मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती  कार्यालयात २६ नोव्हेंबर पर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली आहे.

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    पुणे,दि. २३ : नैसर्गिक आपत्ती, किडी व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे आणि नुकसानीच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी बागायत व जिराईत या पीकांस

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २३: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहराबद्दल आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स-२०२२’ अंतर्गत हे नागरिक जाणीव सर्वेक्षण (सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे- सीपीएस) २३ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असून पुणे शहरातील नागरिकांनी ऑनलाईनरित्या या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ (अर्बन आऊटकम फ्रेमवर्क-युओएफ २०२२) चा शुभारंभ केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने २०१८ मध्ये १११ शहरांचा समावेश असणारा पहिला ‘राहणीमान सुलभता निर्देशांक’ जारी केला. त्यानंतर पाठोपाठ २०१९ मध्ये राहणीमान सुलभता निर्देशांक २.० आणि महानगरपालिका कामगिरीचा निर्देशांक जाहीर झाले. शहरांना परिणामावर आधारित नियोजन आणि शहरी व्यवस्थापनाकडे वाटचाल करण्यास मदत करणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते. शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चा उद्देश हा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द

नगरपरिषदांना १५ कोटींचा निधी मंजूर ; खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी/ विशाल खुर्द     शिराळा दि.२२,  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मूलभूत सुविधा व विकास कामांना निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी विषयी मागणी केली होती.या मागणीला यश मिळाले असून रुपये पंधरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.     दरम्यान,राज्यातील नगरपरिषदांना "वैशिष्ट्यपूर्ण" कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.सदर योजनेचे सुधारित निकष व मार्गदर्शक तत्वे शासन निर्णयान्वय विहित करण्यात आले आहेत.सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण या योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी व विविध कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील   नगरपंचायतीसाठी सांगली जिल्ह्यातील नगरपरिषदांना इस्लामपूर ३ कोटी, आष्टा १ कोटी, शिराळा १ कोटी असे विविध विकास कामांसाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.सदर प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्

महाडिक युवाशक्ती आयोजित किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  शिराळा/ विशाल खुर्द -  शिराळा येथील महाडिक युवाशक्ती शिराळा तालुका आयोजित भव्य तालुकास्तरीय किल्ला स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण जेष्ठ नेते मा. जयसिंगराव शिंदे(सरकार) जुनी नाणी व नोटांचे संग्रहक मा.दत्ताजीराव यादव (रावसाहेब)शिराळा विकास सोसायटीचे संचालक मा.महादेव खबाले (तात्या) ,मा.कुमार बाबा गायकवाड नगरसेवक केदार नलावडे ,मा.सचिन नलवडे (काका) मा.संतोष बांदिवडेकर (बापू) मा.गणेश गवाणे (तात्या) मा.हारूनभाई शेख मा.महेश घोडे (बबलुभैय्या ) यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी जवळपास ५० स्पर्धकांनी मंडळांनी  सहभाग घेतला होता.   स्पर्धेचे मानकरी (मोठा गट) प्रथम क्रमांक दुर्गवेडे प्रतिष्ठान,(नलावडे कॉलनी,शिराळा) ५००१/ व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक शंभो महादेव मंडळ (नाझरे गल्ली) शिराळा  ४००४/ व सन्मानचिन्ह तृतिय क्रमांक जिद्दी ग्रुप (कुरणे गल्ली) शिराळा ३००३/- व सन्मान चिन्ह  चतुर्थ क्रमांक कुंभार गल्ली (शिराळा) २००२/व सन्मानचिन्ह पाचवा क्रमांक चकमक चौक (पाडळी) १००१/ व सन्मानचिन्ह (लहान गट)  स्पर्धेचे मानकरी प्रथम क्रमाक - कु. समर्था मारुती तळेकर

पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेला सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २२: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय  येथे  विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती- ५७, विशेष मागास प्रवर्ग -२, अनाथ-२ जागेकरीता प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात इयत्ता ११ वी, पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.  या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ८०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.  विद्यार्थी हा पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्

डेन्मार्कच्या मदतीने राज्यात ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प ; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची डेन्मार्कच्या राजदूतांशी चर्चा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. २१ : डेन्मार्कच्या मदतीने राज्यात पुढील वर्षी ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा केली.             आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज श्री. स्वान यांच्याशी विविध प्रकारच्या सहकार्य कराराबाबतही प्राथमिक चर्चा केली. यावेळी डेन्मार्कचे व्यापार आणि उद्योग मंत्री सोरेन कैनिक, उपमंत्री हेन्री करकेडा, आनंद त्रिपाठी, रुरल डिजीटल हेल्थ अँड फायनान्सचे डॉ. रतिश तागडे आदी उपस्थित होते.             या बैठकीत भारत - डेन्मार्क यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रात औषधे, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा विकास आणि आरोग्य सुविधाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.             या तिन्ही क्षेत्रामधे गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य व डेन्मार्क यांच्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात उच्चस्तरीय बैठक होणार असून दोघांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने सामंजस्य करार करण्याचा दृष्ट