नाविंदगी ग्रामपंचायतीवर पुन्हा 'प्रभुमल्लेश्वर गाव विकास पॅनल'चा वर्चस्व ; पंडित चव्हाण यांची बाजी

नाविंदगी (प्रतिनिधी/दयानंद गौडगांव) दि,२०, अक्कलकोट तालुक्यात बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेल्या नाविंदगी ग्रामपंचायत निवडणुकीचा अखेर आज लागला आहे. श्री प्रभुमल्लेश्वर गाव विकास पॅनलचे थेट सरपंच पदासाठीचे अधिकृत उमेदवार पंडीत थावरू चव्हाण हे विजयी झाले आहेत.





पंडित चव्हाण यांनी श्री प्रभुलिंगेश्वर गाव जनसेवा विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार चौडप्पा प्रकाश वड्डे यांचा जवळपास १९८ मतांनी पराभव करत आपला वर्चस्व सिद्ध केला आहे. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत पंडीत थावरू चव्हाण यांना एकूण १९५५ मतांपैकी १०७१ मते तर चौडप्पा प्रकाश वड्डे यांना ८७३ मते (इतर मते NOTA) पडली आहेत. 



दुसरीकडे सदस्य पदासाठीच्या उमेदवारी मध्ये उलट परिस्थिती पहायला मिळाले आहे. श्री प्रभुमल्लेश्वर गाव विकास पॅनलच्या सदस्य पदासाठीच्या उमेदवाराचा श्री प्रभुलिंगेश्वर गाव जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवाराने पराभव केला आहे. दरम्यान तुर्तास तरी मतदारांनी पंडीत चव्हाण यांना कौल दिला आहे. राजकारणातला तब्बल १५-२० वर्षांच्या दिर्घ अनुभवाचा फायदा त्यांनी करून घेतला आणि ते गावाचा विकास करतील अशी अशा गावकरी व्यक्त करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद