भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कीट सहलीला नागरिकांचा प्रतिसाद

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



पुणे, दि.९: विभागीय पर्यटन कार्यालयाच्यावतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कीट सहलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सहलीत विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी, दिव्यांग आदींनी सहभाग घेतला.


आमदार उमा खापरे यांच्याहस्ते जेट इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट चिंचवड येथे सहलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील सेनापती बापट मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरियल सिम्बायोसिस महाविद्यालय,  अहमदनगर मार्गावरील आगाखान पॅलेस, नगर परिषद तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय पयर्टन सहायक संचालक सुप्रिया करमरकर दातार यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात