आदर्श विद्यालय आंबोली विज्ञान प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / लतिफ शेख



खेड : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे गेली 26 वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी उत्तम भावी नागरिक बनावे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. 30 वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2022-23 या प्रदर्शनाचा नुकताच जिल्हास्तर व राज्यस्तरीय प्रदर्शन 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन पार पडले. यात आदर्श विद्यालय आंबोली चा करंट लिकेज इंडिकेटर हा प्रकल्प गुजरात मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीसाठी निवडला आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शन 16 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर2022 या कालावधीत पार पडले. यात जिल्ह्यातून सुमारे 279 प्रकल्पांचा समावेश होता नंतर प्रत्येक जिल्ह्यातून येणारे प्रकल्प असे राज्यस्तरावर 260 प्रकल्प आले होते. राज्यस्तरावर दोन फेरीत सादरीकरण झाले पहिल्या फेरीत 260 मधून 60 प्रकल्प निवडले गेले व दुसऱ्या फेरीत 30 प्रकल्प निवडले गेले यात आंबोलीचा करंट लिकेज इंडिकेटर या प्रकल्पाचा समावेश होता.  पुढे नॅशनल पातळीवर दिनांक 27/01/2023 ते 01/01/2023 यादरम्यान अहमदाबाद या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे. विद्यालयात आय.बी.टी (स्टेम प्रोग्रॅम) हा पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम LTIMindtree आणि विज्ञान आश्रम यांच्या सहकार्याने सुरु आहे त्या अंतर्गत टेक्नोव्हेशन  प्रदर्शनामध्ये हा प्रकल्प तयार करण्यात आला होता.

समस्या -- आंबोली हे गाव डोंगरी आदिवासी भागात आहे पाऊस खूप पडतो वीज वाहून नेणाऱ्या लोखंडी खांबात सतत काहीतरी कारणामुळे वीज गळती होते व त्याला पाळीव प्राण्यांचा स्पर्श झाल्यावर प्राण्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू होतो या समस्येवर उपाययोजना करण्याच्या हेतूने विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का राजेंद्र शिंदे व दक्षा दत्तात्रय शिंदे यांनी ही कल्पना शोधून काढली व एक उपयोगी किट तयार केले या सर्व संशोधनात विज्ञान शिक्षक श्री विलास आदलिंगे सर व आय बी टी शिक्षक श्री सुदाम शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले. व विशेष मार्गदर्शन श्री सुनील पोटे सर ( जिल्हा समन्वयक पुणे , राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद पुणे )यांनी केले. व विद्यालयाचे शिक्षक श्री शंकर शिंदे सर , घोरपडे मॅडम , अजित शिंदे ,  विकास लोहोट, गणेश सातकर,  रवी शिंदे ,प्राजक्ता शिंदे, सदाशिव शिंदे , गणेश मामा , सुनील मामा  , संदीप मामा व  दत्ता मामा यांचेही योगदान लाभले. शाळेच्या या यशाबद्दल सर्व परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे व आपल्या जनावरांचे प्राण वाचवावेत यासाठी हे किट शाळेकडून विविध ठिकाणी बसवून घेतले आहे यामुळे त्यांची आर्थिक आणि हानी टाळणार आहे व जनावरांचे आणि माणसांचे प्राणही वाचणार आहेत या सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ शिंदे आणि सचिव बाळासाहेब शिंदे सर्व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक श्री पोटवडे सर यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात