जि.प.प्राथ.शाळा-थिगळस्थळ ची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर
31जुलै 2022रोजी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा थिगळस्थळ ने दैदिप्यमान यश संपादन केल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सातकर यांनी सांगितले. शाळेतील आर्या प्रकाश थिगळे हिने २८०गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत शहरी विभागात ९वा क्रमांक प्राप्त केला असून शाळेतील अजून १५विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
प्रज्ञा योगेश माळशिरसकर २७६गुण , प्रसाद विश्वास ओव्हाळ २७६गुण, कार्तिक विकास मनकर २७०गुण, अनुष्का सुनील धंद्रे २६८ गुण, वेदिका आत्माराम शिंदे २६२गुण,श्रेयाली बाबाजी कोरडे २६०गुण, संस्कृती काळूराम ठाकूर २५४गुण, संचिता गणेश सांडभोर २४८गुण, अथर्व अरविंद पारधी २४६गुण, सायली शरद भोकसे २४०गुण, आदित्य शरद ठाकूर २३८गुण, धनश्री काशिनाथ बागुल २३८गुण, सिद्धेश सुधीरकुमार गोसावी २३६गुण,मयूर संजय गोरख २३४गुण व आर्यन पांडुरंग जैद २३२गुण असे थिगळस्थळ शाळेचे एकूण १६ विद्यार्थी यावर्षी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षिका सुचिता दौंडकर - कराळे तसेच सहकारी शिक्षक अनुराधा बोरकर, महादू राळे, रोहिणी जाधव, देविदास नेहेरे, दिपाली जुनवणे व मुख्याध्यापिका वैशाली सातकर यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या सात वर्षांपासून शाळेची शिष्यवृत्ती परंपरा अखंडित असून यावर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्येने उच्चांक प्राप्त केला आहे. शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, विस्तारअधिकारी भारती उबाळे, केंद्रप्रमुख दत्तात्रय गोसावी तसेच शा. व्य. समितीचे अध्यक्ष गणेश थिगळे, एकवीरा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव थिगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रेवणशेठ थिगळे, माजी गटसमन्वयक शांताराम थिगळे, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, शंकरराव थिगळे, रेवजी थिगळे, काकासाहेब थिगळे, रामभाऊ थिगळे, दिलीप थिगळे, प्रकाश थिगळे, अनिल सांडभोर, सर्व ग्रामस्थ थिगळस्थळ यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा