राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पुणे, दि. २१:  राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २३ डिसेंबर रोजी विविध शासकीय कार्यालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना व तक्रार निवारण प्रणालीबाबत माहिती देणारे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात येणार आहे.


या प्रदर्शनात  वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजन मापामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगणे, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आदीबाबत जागरूकता येण्याच्यादृष्टीने संदेश देणारे विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.  नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे  आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

टिप्पण्या