शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनेलने उडविला परिवर्तन पॅनेलचा धुव्वा
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / बाळासाहेब मुळे
खेड/ चाकण : शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या पतसंस्थेची निवडणूक पार पडली यामध्ये दोन पॅनल अनुक्रमे विकास पॅनल, परिवर्तन पॅनल व अपक्ष या मध्ये मतदान झाले.
मतदान प्रक्रिया पार पडली असता विकास पॅनलने १२/० अशी बाजी मारली .इतर मागास प्रवर्गामधुन मधुकर नाईक ,सर्वसाधारण प्रवर्गामधुन अविनाश कड ,विजय पवार ,राजेंद्र चौधरी ,बाळासाहेब मुळे आदलिंगे विलास, काळे संतोष, घेनंद पांडुरंग ,घोरपडे सरिता ,टोपे एकनाथ ,शेलार नंदकुमार , अनुसूचित प्रवर्गामधुन आव्हाड प्रशांत हे बारा उमेदवार बहुमताने विजयी झाले. एकुण १५ सभासद असुन तीन बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे भटक्या जाती प्रवर्गातुन देवकाते हरीदास, महिला वर्गातून खराबी प्रिती, शेरकर अंजली यांची निवड झाली.
महत्वाचे म्हणजे विरोधी पॅनलने निवडणूक प्रचारा दरम्यान अपप्रचार करुन सुध्दा सुजान मतदारांनी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडूण दिले.
विकास पॅनला भरघोस मतदान करुन सर्व शिक्षक सेवकांचे आभार व्यक्त करताना विकास पॅनलचे प्रमुख मधुकर नाईक यांनी सांगितले ही संस्था शुन्यातुन उभी राहीलेली असुन या संस्थे मध्ये कोणताही गैरप्रकार होत नाही. ही संस्था एकमेकांच्या सहकार्यावर चालली आहे. शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण सहाय्यक निबंधकांचा अ दर्जा प्राप्त झालेला आहे. आपण आम्हास निवडूण जो आमच्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हाच आमचा खरा विजय आहे. पतसंस्थे मधील सर्व मतदारांचे सर्व विजयी उमेदवारांनी आभार मानले. शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकणची प्रगती उत्तरोत्तर उंच अशी भरारी घेतली जाईल याची सर्व विजयी उमेदवारांनी ग्वाही दिली. तालुक्यातील सर्व स्तरावरून विजयी उमेदवारांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा