नाविंदगी ग्रामपंचायत निवडणुकीत ८१% मतदान ; प्रतिक्षा निकालाची

नाविंदगी दि . १८ , अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी ग्रामपंचायत निवडणुक (आज दि.१८) पार पडली. यास मतदारांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. गेल्या काही दशकांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक, म्हणजेच तब्बल ८१% मतदान झाले आहे.



यामध्ये इतर सर्व सदस्य बिनविरोध निवड झाल्यानंतर केवळ सदस्य पदासाठी दोन तर थेट सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते . यावेळी, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आले होते. अत्यंत शांततेत मतदारांनी आपला हक्क बजावला. आता मंगळवारी (दि.२०) निकाल पाहायला मिळणार आहे. निकालाची उत्सुकता गावकऱ्यांना लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद