औंध आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पुणे, दि. ८ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर बनवणारी योजना आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचा आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे  सहा. सल्लागार (तां). यशवंत कांबळे व  उपसंचालक आर. बी. भावसार  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद