बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवून महाराष्ट्र सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे सह-संस्थापक आणि कायदेशीर सल्लागार यांच्यावर आयपीसी सेक्शन ४२०,५०५ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



पुणे दि.२६, रॅपिडो बाईक टॅक्सीचे सह-संस्थापक अरविंद सांका आणि कायदेशीर सल्लागार शंतनू शर्मा यांना पुणे शहर पोलिसांनी बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवण्याप्रकरणी आणि संबंधित कर न भरून महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची  फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार, रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप चालवणारी कंपनी रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध २४ नोव्हेंबर रोजी बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. भारतीय दंड संहितानुसार  कलम 420, 505, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ अधिकाऱ्याच्या पुरवणी निवेदनानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात