येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे (प्रतिनिधी- सुनील शिरसाट) |दि. 12, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली. सदर सुविधेचे उद्घाटन मा.श्री.अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाले. सन्मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटी मार्फत संनियंत्रण करण्यात येत असलेला ICJS (Interoperable Criminal Justice System) प्रकल्प ज्यामध्ये सन्मा. न्यायालयाचे ई कोर्टस (eCourts) संगणकीकरण प्रकल्प, पोलीस विभागाचा सी.सी.टी.एन.एस. (CCTNS) संगणकीकरण प्रकल्प, कारागृह विभागाची ई प्रिझन (ePrisons) संगणकीकरण प्रकल्प, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांची ई-फॉरेन्सिक (eForensic) प्रणाली व पव्लीक प्रॉसिक्यूशन विभागाची संगणकीकरण प्रणाली यांचेमध्ये आपापसांत माहितीची देवाणघेवणा सुरु करणेवावत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासन, गृह विभाग, तुरुंग- २ यांचे पत्र दि.१७.०३.२०२१ रोजीच्या पत्रानुसार एन.आय.सी. (NIC) यांनी विकसित केलेली ई-प्रिझन (ePris