सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


प्रतिनिधी - दत्ता भगत



खेड : दि.०६, सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवा‌द्याचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला झाला असून बाबुळगाव जातीवादी बौद्ध समाजावर हल्ला कारणास्तव राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाला या घटनेबाबत सूचना दिलेल्या आहे. जिल्हा अधिकारी काय करत आहे ? पोलीस काय करतायेत ? यांनी या घटनेला भेट दिली पाहिजे. कायद्यानुसार कलेक्टर व एस.पी. यांनी २४ तासाच्या आता आले नाही तर कायद्याची काय ताकद आहे हे आम्ही याना दाखूवून देऊ, या कुटुंबातील जे जखमी आहेत ह्या हल्ल्यातील एक आरोपी अटक आहे. तर दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. दोघे ताब्यात असलेले आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना अटक दाखवलेले नाही. राहिलेले जे तीन आरोपी आहेत. त्यामध्ये एक प्रत्यक्षात असलेला व दोन संघनमत केले असून ते फरार असून जोपर्यंत त्याना अटक होत नाही यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यकर्त्यावर हल्ला झाला त्यावेळेस कलम १२० ब नुसार कार्यवाही केली पाहिजे. सत्तुर कुठून आणला ? आणण्यासाठी कोणी मदत केली ? कोणी पैशाची मदत केली होती ? का कोणी पळून लावण्याची मदत केली आहे का ? गुन्हा करताना कट कुठे केला ? या संदर्भात सर्व तपास होणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रिपाई (आंबेडकर) व अनेक आबेडकरी संघटना निषेध व्यक्त करत आहे. असेही आकाश डोळस म्हणाले कि, पुन्हा असे कृत्य घडू नये. खेड पोलिस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl (A), खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ डोळस, खेड तालुका युवक उपाध्यक्ष निलेश भोसले कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात