पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सांगली ( प्रतिनिधी ) : प्रहार शिक्षक संघटने तर्फे सांगली जिल्हा परिषद च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षकांच्या विविध प्रश्नबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.  शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाबाबत फाईल्स एक आदर्श नमुना असावा  व फाईल पंचायत समितीवर परिपूर्ण होऊनच जिल्हा परिषद ला पाठवण्यात यावी. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या गुणवत्ता परीक्षा घेण्यात येऊ नयेत,ऍप, लिंक,यांचा वापर मर्यादित असावा यांसारख्या, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यांसारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या, विध्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन प्रहार शिक्षक संघटना कडून देण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रश्नावर शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड व शा. पो. आहार जिह्वा प्रमुख मा. दीपाली यादव मॅडम यांच्याशी केली सकारात्मक चर्चा. प्रहार शिक्षक संघटना सांगली यांनी  जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड साहेब यांचे सोबत शिक्षकांच्या विविध

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाच्या सचिवपदी विश्वनाथ पाटोळे यांची निवड

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी-- लतिफ शेख  खेड दि. २९, केडगाव चौफुला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघ संघटना व पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य महासंघाचे अध्यक्ष राजेद्र कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये सर्वप्रथम पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेची सभा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेसाठी महाराष्ट्र राज्यातून तमाम शिक्षक उपस्थित झालेले होते. या राज्याच्या वार्षिक मीटिंगमध्ये पहिल्या क्रीडा शिक्षक अधिवेशनाचे जनक व शारीरिक शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडविणारे विश्वनाथ पाटोळे यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी निवड करण्यात आली तसेच दौंडचे जालिंदर आवारी यांची महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी निवड करण्यात आली यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आदरणीय निलेश जगताप काळे व ठाकूर तसेच पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके व पुणे चिंचवड क्रीडा शिक्षक संघटनेचे सर्व अध्यक्ष सचिव पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक दौंड शिक्षक सं

दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: पुरंदर उपविभागातील दौंड व पुरंदर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, सोनारी व हिवरे या गावांतील पुणे वर्तुळाकार महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे.    ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणा

अमेरिकेला प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन अपेडाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू  यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकेला डाळिंब निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्रीमती सुधांशू यांनी यावेळी व्यक्त केला.  कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे डॉ. आर. ए. मराठे, अपेडाचे सरव्यवस्थापक यु. के. वत्स, प्लॅंट प्रोटेक्शन ॲडवायजर जे. पी. सिंग, विकिरण सुविधा केंद्राचे प्रमुख सतिश वाघमोडे आदिंसह अधिकारी व निर्यातदार उपस्थित होते. डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास २०१७-१८ मध्ये ब

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाकरिता सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.  राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आयुक्तालय स्तरावर परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, बी. टेक, विज्ञान, कृषी व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौटुंबिक कमाल उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे.  परदेशी शिष्यवृत्तीचे विहित नमुन्यातील अर्ज  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी एकात्मिक आद

पर्वती विधानसभा मतदार संघातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार, रविवारी मतदार नोंदणी अभियान

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८:  मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१२ पर्वती विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार २९ व रविवार ३० जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांची नावे नमुना क्रमांक ६ मध्ये भरुन घेणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ तर मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरुन घेतला जाणार आहे.   मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: नमुना क्रमांक ६ भरण्यासाठी अर्हता दिनांकाला वय वर्षे १८  पूर्ण होत असावे. निवासाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासप

खेड तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे दि. २८: खेड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात  आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध  करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील काही गावांतील पुणे वर्तुळ रस्त्याची संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून रोहकल येथील जमीन संपादनाच्या अनुषंगाने मोजणी स्थगित करण्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.    ही परिस्थि

खेड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था खेड अध्यक्षपदी वैशाली रविंद्र चौधरी तर सचिवपदी ज्ञानेश्वरी तितर यांची बिनविरोध निवड

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   खेड (प्रतिनिधी) : सन २०२३ते२०२८या कार्यकालासाठी नवीन अकरा सभासद बिन विरोध निवडुन आले यामध्ये दिलिप ढमाले लतिफ शेख अरविंद गवळे किशोर भगत संजय बोरकर उत्तम पोटवडे पाडुरंग वारे व्ही डी काळे रामदास रेटवडे वैशाली चौधरी ज्ञानेश्वरी तितर बिनविरोध निवडून आले यापैकी महिलांना सर्वप्रथम अध्यपदी व सचिवपदी बिनविरोध निवडून महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच रामदास रेटवडे उपाध्यक्षपदी तर लतिफ शेख यांची खजीनदारपदी निवड करण्यात आली  छत्रपती शिवाजी सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा खरपूडी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब चौधरी पाटील तसेच दोंदे गावचे सरपंच चंद्रकात बारणे व आनंदराव कदम तसेच मुख्याध्यापक रविंद्र चौधरी माजी सचिव मुख्या रामदास पवार संतोष पुजारी यांनी स्वागत व सत्कार केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बगाडे यांनी काम पाहिले.

आदर्श ग्राम सिद्धेगव्हाणच्या उपसरपंचपदी प्रा. राजेंद्र गाडे बिनविरोध निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  खेड (प्रतिनिधी ) : आदर्श ग्राम सिद्धेगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे समर्थक प्रा. राजेंद्र गाडे यांची निवड करण्यात आली.  सौ. ज्योती साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी. या उद्देशाने पदाचा राजीनामा दिला. त्यानुसार दौलतराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवडणुक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी राजेंद्र गाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी स्वाती माळी व सभेचे अध्यक्ष दौलतराव मोरे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.  यावेळी सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे मावळत्या उपसरपंच ज्योती साबळे,मा.चेअरमन अनिल साबळे, उद्योजक उमेश मोरे , ग्रामपंचायत सदस्य स्वाती मोरे, कांचन थोरात, अच्युता पवार, अविनाश मोरे, मनोज मोरे, बाळासाहेब मोरे, वाल्मिकराव साबळे, मुगुटराव मोरे, संतोष साबळे माजी सैनिक प्रकाशराव उगले, धनंजय धाऊत्रे, विनायक पवार, मा. सरपंच दत्तात्रय गंगावणे, दिलीप मोरे, शिवाजी मोरे, विलास चौधरी, संतोष मोरे, जयसिंग धाऊत्रे, दत्ता गाडे, दयानंद धुमाळ, कमलाकर वाडेकर,

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली ; कुमार आशीर्वाद नवे जिल्हाधिकारी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सोलापूर (प्रतिनिधी) दि. २०, सोलापूर चे आदर्श  जिल्हाधिकारी म्हणून ठसा उमटविलेले मिलिंद शंभरकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी  कुमार आशीर्वाद  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यतील काही आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत यात सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . राज्य सरकारने तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे,  तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन च्या मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्

जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार ; राजकीय क्षेत्रातून महाजनी यांना श्रद्धांजली

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१५,  मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युत दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.रवींद्र महाजनी यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी,मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे. दरम्यान राजकीय क्षेत्रातूनही रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील – मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रविंद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. ‘देवता’ या  चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ या ओळींची आज प्रत्यक्षात अनुभूती होत  आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –  ‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्र

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १४: क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी या स्मारकाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. हे स्मारक लवकरात लवकर उभे रहावे अशी शासनाची भूमिका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, त्यासाठी स्मारकात समाविष्ट करावयाचे संग्रहालय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आदी तपशीलाबाबत समितीने चर्चा करु

जिल्ह्यातील २० हजार गृहनिर्माण संस्थांमध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान’-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. १४- जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी येत्या २२ व २३ जुलै २०२३ रोजी  जिल्ह्यातील २० हजार ९३६ गृहनिर्माण  संस्थांमध्ये ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान’  राबविण्यात येणार असून गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व मतदार नोंदणी अधिकारी , सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी   उपस्थित होते. डॉ.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करावे. अभियानाची माहिती सोसायटीतील सदस्यांपर्यंत पोहोचवावी. तेथील अपेक्षित मतदार संख्या, झालेली मतदार नोंदणी याबाबत माहिती घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. अभियानाशी संबंधीत घटकांना सहभागी करून घेतल्यास मतदार नो

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर ; पाहा कुणाला कोणती खाती

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.  *इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:* छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी ; अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.14:-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.  उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे  कामकाज पाहणार आहेत.

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. 14:- ‘चांद्रयान-3  मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे.  भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली चांदणी चौक येथील परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी ;उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे दिले निर्देश

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ११:  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.   यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल  आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदणी चौकातील कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्यस्थितीतील कामाबद्दल  व चौकातील इतर कामाबद्दल आढावा घेतला. श्री. देशमुख म्हणाले, चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. या  ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात  प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे.  प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने ड्रोन वापरावर बंदी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ११:  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पूर्व परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरणास मनाई असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेशित केले आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, आयोजक यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करता येणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत-अपर मुख्य सचिव राजेश कुमार

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                          पुणे दि. ९: राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने संस्था स्वबळावर उभी करण्यासाठी उत्पन्नाची नवीन साधने शोधावीत आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत, असे प्रतिपादन सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.  राजेश कुमार यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, संचालक डॉ. सुभाष घुले, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.  राजेश कुमार म्हणाले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने  शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. दूरच्या प्रशिक्षणार्थीना लाभ मिळण्यासाठी संस्थेने समाज माध्यमाचा वापर वाढवावा. ‘मॅग्नेट’ प्रकल्पातून संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी काही घटक घेता येतील का याचाही विचार करावा. राज्यात काही ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू करता येतील का याचीही चाचपणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. श्री. कोकरे

'देश के सच्चे हिरो' संस्थेच्या वतीने पिंपरीत स्वच्छता विषयी जनजागृती अभियान

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क निगडी, दि. ०९, (प्रतिनिधी) :  'देश के सच्चे हिरो' संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिंपरीच्या आंबेडकर चौकात स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध योजना राबविल्या जात आहेत. तरीदेखील काही भागात घाणीचे साम्राज्य अजूनही दिसून येत आहे. मागील दोनच दिवसांपूर्वी पवना नदी पात्रात रसायनयुक्त पाण्याने नदी फेसाळल्याचे वृत्त जनलोक वार्ता   ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपण याबाबत जनजागृती करून आपण संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे जनलोक वार्ताच्या प्रतिनीधींना कळविले. त्या अनुषंगाने आज पिंपरी जनजागृती मोहीम राबविण्यात आले. यावेळी परिसरात घाण , कचरा टाकणाऱ्यांना 'दणाका द्या दंडाचा' असा नारा देण्यात आला. याशिवाय 'स्वच्छ भारत सुंदर भारत' , 'प्लास्टिक हटाव देश बचाव ',  'कचरा फेंकनेवालों पर दंड लागाओ' अशा घोषणा देण्यात आल्या. या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छत

पवना नदी फेसासळी ; नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

इमेज
 निगडी दि ७ , थेरगाव जवळ पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात फेसाळ दिसत आहे. पवना नदीत वारंवार रसायन मिश्रीत पाण्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असलेली पवना नदी काही समाज कंटकांनी प्रदूषित करण्याचा विडा उचलला आहे. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदी मृत होत चालली आहे. परंतु, या कंपन्यांना आवर घालण्यासाठी वाली उरला आहे की नाही असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी केला आहे. केजुबाई बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी मंदिरापर्यंत सध्या मोठ्या प्रमाणात नदी पांढऱ्या रंगाने फेसाळली आहे. हा फेस पाण्यावर तरंगत आहे. फेस उगमापासून आहे की, मध्येच कुठे मिश्रित आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. याशिवाय संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत .