महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाच्या सचिवपदी विश्वनाथ पाटोळे यांची निवड

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी-- लतिफ शेख 



खेड दि. २९, केडगाव चौफुला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघ संघटना व पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य महासंघाचे अध्यक्ष राजेद्र कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये सर्वप्रथम पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेची सभा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेसाठी महाराष्ट्र राज्यातून तमाम शिक्षक उपस्थित झालेले होते. या राज्याच्या वार्षिक मीटिंगमध्ये पहिल्या क्रीडा शिक्षक अधिवेशनाचे जनक व शारीरिक शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडविणारे विश्वनाथ पाटोळे यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी निवड करण्यात आली तसेच दौंडचे जालिंदर आवारी यांची महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी निवड करण्यात आली यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आदरणीय निलेश जगताप काळे व ठाकूर तसेच पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके व पुणे चिंचवड क्रीडा शिक्षक संघटनेचे सर्व अध्यक्ष सचिव पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक दौंड शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आवारी यांनी केले तर सूत्रसंचालन उत्तम जावळे व जठार यांनी केले  तर आभार प्रदर्शन भिसे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात