पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष व अजिंक्य रिक्षा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष शिवाजी काशिनाथ सल्ले यांचे निधन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             प्रतिनिधी / संदीप जगताप         वडकीगाव : शिवाजी काशिनाथ सल्ले, मुळगाव - नरसिंहपूर, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे. सध्या राहणार वडकीनाला, पुणे सासवडरोड, ता. हवेली, जि. पुणे. यांचे सोमवार दिनांक २४ /१०/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता अकस्मात दुःखद निधन झाले. ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली, १ मुलगा, नातवंड असा मोठा परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्याने सल्ले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २०१६ पासून ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष होते. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजूसाहेब शिंगाडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "इंदापूर येथे पत्रकार संघाचे त्यांचे काम खूपच प्रभावी होते. इंदापूर मधून सध्या जनलोक वार्ता आवृत्ती प्रकाशित होते, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. खूपच सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्तिमत्व पत्रकार संघातून अचानक गेल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार सदस्य व पदाधिकारी यांना खूपच दुःख झाले आहे. इंदापूर येथील त्यांच्या कार्य करण्याच्या

कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.२०-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.   अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना  प्रशासनाला देण्यात आल्या.

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये ; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. २० - जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.   आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.  कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी  वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल  आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी  रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.  २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक  स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे. 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ आज मंत्रालयात झाला.

गुजरात बर्फीचा ५ लाख ९० हजार रुपयांचा साठा जप्त

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २०: अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी मागवलेला ५ लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १७) रोजी  अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी - स्वीट हलवा (व्हानवटी), रिच स्वीट डिलाईट (ब्रिजवासी), स्वीट हलवा (ब्रिजवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी व स्वीट हलवा या अन्न पदार्थाचे ६ नमुने तपासणीसाठी घेवून हा साठा जप्त केला. हा गुजरात बर्फी अन्न पदार्थ पुणे शहरातील मे. अग्रवाल स्वीट मार्ट, बुधवार पेठ, मंडई, मे. कृष्णा डेअरी फार्म, मानसरोवर अॅनेक्स, कोंढवा बु., मे. अशोक राजाराम चौधरी, गहुंजे, देहुरोड व हिरसिंग रामसिंग पुरोहित, बालेवाडी यांनी गुजरात व वसई (जि. पालघर) येथून मागविला असल्याचे आढळून आले. या विक्रेत्याकडे त्यांनी मागवलेल्या गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता याबाबत अधिक तपास करून त्याअनुषंगाने संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे कार

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची कोतवालांना पदोन्नतीची विशेष भेट

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.२०- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोतवाल संवर्गातील ५७ कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण जवळ आला असताना पदोन्नतीची विशेष भेट दिली आहे.   महाराष्ट्र राज्यातील कोतवाल महसूल विभागाच्या अधिपत्याखालील अवर्गीकृत कर्मचारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील निर्णयानुसार महसूल विभागांतर्गत असणाऱ्या गट 'ड' च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. पुणे जिल्ह्याच्या आस्थापनेवरील गट 'ड' शिपाई संवर्गाच्या एकूण पदांच्या ४० टक्क्यांनुसार येणाऱ्या पदापैकी ५९ पदे कोतवालातून गट 'ड' शिपाई पदावर प्रथम नियुक्ती देण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.  जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, भूसंपादन अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या मार्गदर्शनानुसार कोतवालातून गट 'ड' शिपाई पदावर प्रथम नियुक्ती देण्याचे कामकाज प्राधान्य देत पूर्ण करण्यात आलले आहे. गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या ५७ कोतवाल कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर अ

हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव ; जगातील शंभर अग्रेसर शहरांच्या समुहाकडून पुरस्कार जाहीर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.२०: वायू प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा समावेश करत पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांची दखल जागतिक पातळीवरील जवळपास १०० अग्रेसर शहरांच्या समूहाने घेतली असून ‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’ या गटात पुणे शहराची पुरस्कारासाठी निवड केली आहे. हवामान बदलाच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद देत उपाययोजना करणाऱ्या जगातील जवळपास १०० अग्रेसर शहरांचा ‘सी-४०’ हा समूह कार्यरत आहे. या समुहामार्फत हवामान बदलाच्या समस्यावर उपाययोजनांसाठी विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करुन समुहात समाविष्ट शहरांना प्रोत्साहन दिले जाते. या समुहाने अर्जेंटिना देशातील ब्यूनास आयरेस शहरात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहराला ‘सी-४०' सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अ‍ॅवार्डस’चे विजेते म्हणून जाहीर केले आहे. ‘युनायटेड टू ॲक्सलरेट इमिडिएट ॲक्शन इन क्रिटीकल सेक्टर्स’, ‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’, ‘युनायटेड टू बिल्ड रेझिलीएन्स’, ‘युनायटेड टू इनोव्हेटीव्ह, ‘युनायट

इस्लामपूरमधे दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास अखेर इस्लामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / अमोल जाधव इस्लामपूर : शहरात दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस इस्लामपूर पोलिसांनी सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या.लोटस सोनोग्राफी सेंटर या ठिकाणहून दुचाकी चोरीस गेली होती, पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून आरोपी वैजनाथ बसवंत चव्हाण वय 30 रा.बन्की ता. खानापूर जि. बेळगाव यास पोलिसांनी अटक केली, त्याचाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने इस्लामपूर पोलीस हद्दीतून एक दुचाकी व बेळगांव बस स्टॅन्ड मधून एक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.त्याच्याकडून दोन दुचाकी असे एकूण 60000रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाचे पोलीस कोठडी रिमांड मिळाले आहे. दीक्षित गेडाम पोलीस अधीक्षक सांगली,मनीषा दुबले अपर पोलीस अधीक्षक यांनी वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहून कारवाई करण्याचे आदेश इस्लामपूर पोलिसांना दिले होते. या कारवाई मधे पद्मा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी विटा चार्ज इस्लामपूर,शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक इस्लामपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील शाखेतील सपोनी प्रवीण साळुंखे, सपोफो जयपाल कांबळे, उत्तम माळ

शिरूर तालुक्यात फटाक्याच्या दुकानाच्या परिसरात फटाके उडविण्यावर बंदी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि. १९:  उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांनी शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे व  कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्याचे आदेशीत केले आहे.  शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी (पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीसाठी लागू राहतील. प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा  १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी कळविले आहे.

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानातून सव्वा कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी- प्रा.डॉ. तानाजी सावंत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 19 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’स राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यातील सुमारे एक कोटींहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील एक कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी अवघ्या वीस दिवसात झाली हे विशेष आहे. राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह मोठ्या महानगरातील मॉडर्न वसाहतीत अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणीस करण्यात येत असून ग्रामीण भागात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. या अभियानाचा एक कोटीचा टप्पा ओलांडल्यानंतर आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. अभियानास अतिदुर्गम, आदिवासी पाडे, तांडा वस्तीसह खेड्यातील महिलांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे. कधीच दवाखान्याची पायरी न चढलेल्या माताभगिनी स्वतःच्या आरोग्याच्या तपासणीसाठी पुढे येत आहेत. या महिलांना त्यांच्या गावातून प्राथमिक आरोग्य

शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / सोनाली जगताप   पुणे दि. १९:  शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज आदेश निर्गमित केले आहे.   याबाबत नागरिकांनी त्यांच्याकडील सूचना, हरकती असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पुढील १५ दिवसात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाही, असेही आदेशान्वये कळविण्यात आले आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य-उद्योगमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी उत्तम खेसे पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि विद्युत समस्या सोडविण्याचे  निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,  एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, चाकण औद्योगिक क्षेत्रात विद्युत चार उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. महावितरणकडून अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पाणी पुरवठा आवश्यक प्रमाणात करण्याबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. स्थानिक उद्योजकांची भूखंडाची मागणी अधिकाऱ्यांनी घ्यावी, त्यांनाही प्राधान्याच्या उद्योगांसोबत भूखंड देण्याबाबत विचार करण्यात येई

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न ; औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राहुल सोनवणे पुणे तळेगाव दाभाडे : दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक १ साठी येत्या १५ दिवसात वाहन तळाची (ट्रक टर्मिनल) सुविधा करण्यात यावी, असे निर्देश श्री. सामंत यांनी यावेळी दिले. बैठकीला एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योजक आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुविधा भूखंडाची व्यवस्था करण्यात यावी. उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासोबत नवीन उद्योजक आकर्षित होतील अशा सुविधा विकसित कराव्या. पुण्यात चांगल्या शैक्षणिक संस्था आणि गुणवत्ता असल्याने  नव्या जागेचा विकास करताना  विद्यार्थ्यांकडून संकल्पना आणि सूचना मागविण्यात याव्या.  तज्ज्ञांच्या मदतीने उद्योजकस्नेही असणारा परिसर विकास करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. उद्योगमंत्री

अतिवृष्टीमुळे पिंकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १८ लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरीत ; जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / चंद्रकांत सलवदे पुणे, दि. १८: अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने निविष्ठा अनुदान म्हणून एकूण ३ कोटी १८  लाख ४५ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये २ हजार १७९ हे. ५ आर वरील जिरायती पिके, ३२ हे. ६५ आर क्षेत्रावरील बागायती पिके तर ३६ हे. १५ आर क्षेत्रावरील बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नियमानुसार निधीची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या.  नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तिंना केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) मद

डीपीसी बैठकीत अनधिकृत उपस्थिती ; तडीपार इसमावर गुन्हा नोंदवून जिल्ह्याबाहेर रवानगी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी राजू शिंगाडे   पुणे, दि. १८: कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अनधिकृतपणे उपस्थित राहिलेला तडीपार इसम प्रदीप बाजीराव जगताप (रा. सासवड) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. तसेच  जगताप याची रवानगी जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. तडीपार इसम प्रदीप बाजीराव जगताप राहणार जुने पोस्ट ऑफिस जवळ सासवड तालुका पुरंदर जि पुणे याला दौंड सासवडच्या प्रांताधिकाऱ्यांनी २९ जुलै २०२२ रोजी पुणे शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार केले होते. आदेश पारित केल्यानंतर प्रदीप बाजीराव जगताप यांनी  २ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे स्थगिती मिळण्याकरिता अपील दाखल केले आहे. परंतु हे अपील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असून स्थगिती मिळालेली नाही.  तडीपारीच्या आदेशाला स्थगिती मिळालेली नसताना काल (१७ ऑक्टोबर) जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन येथे सुर

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ ; ज्येष्ठांचे आशिर्वांद मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची भावना

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / गणेश वाघ        इंदापूर पुणे दि.१८:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अधिवेशन कालावधीत २५ ऑगस्ट, २०२२ रोजी ज्येष्ठांना  मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाच

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / इस्माईल तांबोळी पुणे, दि 18: येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.  एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी  / संदीप जगताप पुणे, दि. १८: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सप्टेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेकरीता प्रती शिधापत्रिका १५ किलो गहू, २० किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू, ३ किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी १ किलो गहू व ४ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रती लाभार्थी दोन्ही योजनेचे मिळून १० किलो धान्य लाभार्थ्यास मिळते. या योजनांचे सप्टेंबरचे धान्य घेतले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२२ च्या धान्यासोबत सप्टेंबरचे धान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या लाभार्

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ;१० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / मुस्तफा चाबरू पुणे, दि. १८: मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी व्हावे व मतदार नोंदणी करावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २५ जुलै रोजी घोषित केला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. संक्षिप्त पुनरीक्षण  कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्राम सभा आयोजित करून विविध कार्यक्रम राबविण्याबाबत ग्राम विकास विभागाने निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या उपक्रमांबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील त

कानवडे, खेसे, टोपे व साबळे यांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय पुरस्कार निवड पत्र प्रदान

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतीफ शेख    खेड दि. १८ महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विजय कानवडे व उत्तमराव खेसे रावसाहेब साबळे एकनाथ टोपे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2020-22 साठी निवड झाली आहे. महाराष्ट्र पुरस्कार निवड समितीने कानवडे, टोपे,खेसे व साबळे  साबळे यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली. व्यंकटराव जाधव प्रदेशाध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य व केदार सर यांनी कानवडे व खेसे यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल चे पत्र घरी येऊन सन्मानाने देण्यात आले.    सदरचा पुरस्कार 30 ऑक्टोबर 2022 रविवार सकाळी साडेनऊ वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे देण्यात येणार आहे.     या कार्यक्रमास छत्रपती संभाजी राजे मा . खासदार तथा अध्यक्ष स्वराज्य संघटना श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर इंदोर  धैर्यशील माने लोकसभा सदस्य राजेंद्र पाटील शिरोळा विधानसभा जिल्हा कोल्हापूर इत्यादी

बांबवडे येथे आईचे उत्तरकार्य रोपे भेट देऊन संपन्न, पाटील कुटुंबियांचा अनोखा उपक्रम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क शिराळा (प्रतिनिधी), बांबवडे ता. शिराळा येथील प्राथमिक शिक्षक नंदकुमार पाटील यांच्या मातोश्री फुलाबाई बापू पाटील यांच्या उत्तरकार्य प्रसंगी उपस्थित पाहुणे, मित्र यांना आंबा, चिकू, पेरू, शोभेची झाडे देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी नंदकुमार पाटील म्हणाले, आपण पर्यावरणाचे देणे लागतो.माझ्या आईच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने पर्यावरण चांगले राहण्यासाठी माझ्या आईचा खारीचा वाटा राहील. या कार्यक्रमांस गावातील नागरिक तथा महेश शरनाथे, नाना गायकवाड, आर. सि. पाटील, अनंत सपकाळ, अमोल जाधव,शिक्षक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील कुटुंबियांकडून उपस्थिताचे आभार मानले.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला रस्ता सुरक्षेचा आढावा ; जगातील स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था समृद्धी महामार्गावर कार्यान्वित करणार- उपमुख्यमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि.१७: राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच राज्यात २३ ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसेच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या हद्दीतील ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी समन्वय करावे. वर्षातून किमान तीन वेळा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, जगातील सर्वांत स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था समृद्धी महामार्गावर कार्यान्वित करण्यात यावी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी निर्देश दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरविण्याबाबत बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव

सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील याचे गणेश मंडळांना आवाहन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.१७: सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजातील गरजू व्यक्तींना मदत करावी आणि सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने  नवीन कल्पना सूचवाव्यात असे आवाहन  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी  केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर,  रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे घाडगे  आदी उपस्थित होते पुरस्कारप्राप्त गणेश मंडळाचे अभिनंदन करुन श्री. पाटील म्हणाले, कोरोना संकटानंतर सार्वजनिक उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गणेशोत्सव उत्साहाने आणि शांततेत साजरा करण्यात पोलीसांसोबत मंडळांची भूमिका महत्वाची आहे. गणेशोत्सवाप्रमाणे दिपावलीच्या काळात सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.  पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण असल्यामुळे नागरिकांना निर्भयपणे संचार करता येतो, बेरोजगारांना रोजगार मिळतो. त्यामुळेच हे शहर कायमस्वरुपी स्थायिक होण्या

दावडी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; आदर्श सरपंच संभाजी घारे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी -उत्तम खेसे दावडी खेड : दावडी बागायतदार, ऐतिहासिक, आरोग्य सुविधा युक्त गाव आहे. सामाजिक, शैक्षणिक दृष्टया पुढारलेले गाव असल्यामुळे दावडी गावाची खेड तालुक्यात वेगळी ओळख आहे. ५५०० ते ६००० हजार मतदार असलेले दावडी गाव. दावडी गावामध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत संभाजी घारे निर्विवाद सरपंच झाले. त्यांनी शासकीय सार्वजनिक कामाची, कार्याची ग्रामपंचायत दावडी मार्फत अनेक कामे पुर्ण करून अनेक कामे मंजूर करून आणली. कोरोना काळात कोव्हीड होऊ नये म्हणून मार्गदर्शन आरोग्य कँम्प, प्रतिबंधक लस कँम्प घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून दावडी तसेच पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेऊन जनतेची सेवा केली आणि करतात. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा गावातील विजेचा प्रश्न असो त्यांनी कधीही या कामात दिरंगाई केली नाही. पाणीपुरवठा सुरळीत केला . सार्वजनिक रस्त्याची दुरुस्ती करताना गटार लाईन मजबुत केली. शेतकरी , कष्टकरी सामान्य माणसाची किरकोळ कामे देखील त्यांनी केली. सर्वांसाठी मदतीला धावून जाणारे हे सरपंच आहे. अशी गावात व तालुक्यात त्यांची ख्याती आहे. सरकारी दरब

ग्राहकांना फसवणुकीविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव पुणे दि.१७: वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन करुन न घेणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते. पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तूवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास वैध मापन शास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते. येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ तसेच ९८६९६९१६६६ या व्हॉटस अप क्रमांकावर किंवा dclmms_complaints@

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण ; जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण गरजेचे-पालकमंत्री

इमेज
प्रतिनिधी / दत्ता भगत पुणे खेड : दि.१७: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरीत करण्यात आले. देशाच्या प्रगतीची मजबूत पायाभरणी करण्यासाठी शाळेतून जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे असे श्री.पाटील यावेळी म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत, पोपटराव काळे, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मंजुश्री खेडेकर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन, महानगरपालिका, उद्योग आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेता येईल, मात्र त्या शाळेतून विद्यार्थ्यांना ज्ञान देताना त्यांना जीवनातील आनंद देणे  गरजेचे आहे. विद्यार्थी केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर त्याचा पाया मजबूत व्हायला हवा. देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ, उत्तम शिक्षण आणि संशोधन आवश्यक आहे. त्याची पायाभरणी शालेय जीवनात व्हावी अशी अपेक्

दावडी विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विजय कानवडे खेड: रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी या ठिकाणी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य  अंकुश केंगारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक महादेव आगम उपस्थित होते .विद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीम. आशा बेडेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन  केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झालं तद नंतर विद्यालयातील विद्यार्थिनी कु. दीक्षा शिंदे हिने डॉ. कलामांच्या जीवनकार्याची माहिती दिली. सर्वात शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश केंगारे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत पुस्तक वाचनाची प्रेरणा घेण्याचं आवाहन केले. कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा संकल्प केला सूत्रसंचालन सौ वंदना गावडे यांनी केले तर आभार विलास बरबटे या

प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ; वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुक्त संवाद कार्यक्रमात वाचन संस्कृती विकसीत करण्याची ग्वाही

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१५: उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र आदी उपस्थित होते. मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात १२ हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि साधारण २७ हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाड्या धरून ४३ हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दीष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण

लंपी संदर्भातील उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आजार नियंत्रणात ; सध्या फक्त ८२७ बाधित जनावरे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १५: पशुधनातील लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार  नियंत्रणात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्यामुळे लंपी बाधित  जनावरांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात पशुधनातील लंपी चर्मरोगाची प्रकरणे आढळून येताच तातडीने ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लंपी संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र घोषित केले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तात्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लंपीबाबत उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे ५ चमू बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण हाती घेतले. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १६३ गावाती

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विकासकामांचा आढावा ; विकासकामे वेगाने मार्गी लावू; निधीची अजिबात कमतरता नाही –पालकमंत्री

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१५: जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च होईल याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. पाटील  म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने लंपी आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. शिरूर परिसरात बिबट्याच्या संचारामुळे ना

फेब्रुवारी २०२३ दरम्यान शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / उत्तम खेसे  पुणे : शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) १७ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन घेण्याची तयारी करण्यात येत आहे. परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यापैकी एका संस्थेची निवड केली जाणार आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या संस्थेकडून १६ डिसेंबरच्या आसपास परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून परीक्षेचा निकाल ५ मार्च २०२३ ला जाहीर करण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर ही परीक्षा होणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी अनुदानित, विनाअनुदानित,अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्येच घेण्यात आला. त्यासाठी 'पवित्र' पोर्टल तयार करण्यात आले. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे शक्यता आहे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर २०१७ नंतर राज्यात पुन्हा कधीही ही परीक्षा झाली नाही. परीक्

नेपाळ काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार अध्यापक अशोक ठाणगे यांना जाहीर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख  खेड : नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक  अशोक ठाणगे  यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना गोवा  येथे भाषारत्न पुरस्कार व खेड तालुका मुख्याधापाक संघ यांच्या  वतीने ही आदर्श हिंदी शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यासाठी खराबवाडी शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष  प्रकाश खराबी सचिव गोरक्षनाथ कड  सर्व विश्वस्त संचालक मुख्याध्यापक अविनाश कड  व सर्व अध्यापक बंधू भगिनींनी व कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा, भारत सरकार व नेपाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू (नेपाळ) येथे 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणा-या हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलन 2022 च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक  अशोक ठाणगे   यांची केंद्रीय समितीने निवड केली असून त्यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सण-उत्सवाच्या काळात खाजगी बसेसचे तिकीट दर शासन नियमाप्रमाणे आकारण्याचे आवाहन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१४-शासनाने सर्व खाजगी बस चालक- मालक यांना  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दिडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारण्यास मनाई केली आहे.  दिवाळी सणाचा कालावधी सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस वाहतुकदारांनी विहीत दरानुसार भाडे आकारणी करावी. आपले वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याचीदेखील खात्री करावी व दंडात्मक कारवाई टाळावी. प्रादेशिक परिवहन  कार्यालयाच्या वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.  प्रवाशांनी खाजगी  बसद्वारे प्रवास करताना तिकीट जादा दराने  आकारण्याबाबत तक्रार असल्यास  लेखी पुराव्यासह mh14prosecution@gmail.com या ई-मेल पत्त्यावर करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१४: सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचे मनोगत, तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्रे वाटप,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि शासकिय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाचे शासकिय वसतिगृहे व निवासी शाळेत प्रवेशितांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती तसेच सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेबाबतच्या इतिहासाची माहिती देण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.

आर्थिक समावेशनासाठी १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील १ हजार २९४ गावांमध्ये मेळावे ; भारत सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे नागरिकांना आवाहन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १४: भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे  १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत  पुणे जिल्ह्यातील १ हजार २९४ ग्रामपंचायतींमध्ये मेळाव्यांचे आयोजन   करण्यात आले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात उपस्थित राहून योजनांच्या लाभासाठी अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्ह्यातील सुमारे २१ बँकांचा यात सहभाग आहे. राज्य शासनाचे महसूल, जिल्हा परिषद,  पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व मत्स्य विभाग तसेच गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक  या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यासाठी सहकार्य करतील.  या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्र असलेल्या परंतू अद्याप त्यामध्ये सहभाग नोंदवलेला नाही अशा सर्व ग्रामस्थांना या योजनेचा लाभ देण्य

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची - रामनाथ पोकळे

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १४: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले.   पुणे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने पुणे शहरातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 यावर कार्यशाळेचे आयोजन पुणे पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी  तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या राज्य प्रकल्प अधिकारी जिया शेख, विभागीय व्यवस्थापक अभिजित संघई आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व प्रकल्पाची माहिती दिली. जिया शेख व अभिजीत संगई यांनी कोटपा 2003 कायद्याची दृकश्राव्य माध्यमाद्वारे विस्तृत माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य दंतरोगतज्ञ डॉ

आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १४: जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य, उद्योग, लघुउद्योगांचे तसेच लघुउद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोणतेही काम कमीपणाचे नाही हे आताच्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे आवश्यक असून त्यादृष्टीने या कामांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे सांगून श्री. लोढा म्हणाले, कौशल्य विकासासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील महानगरपालिका तसेच खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शालेय स्तरावर किमान एक 'कौशल्य केंद्र' सुरू करण्याचे निय

पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचे सहकार्य घेणार- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे,  दि. १४: पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत यात्रा व्यवस्थापक (टूर ऑपरेटर्स), हॉटेल असोशिएशन, टूरिस्ट गाईड्स यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. लोढा म्हणाले, पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड यासारखे गडकिल्ले, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आणि जुन्नर द्राक्ष महोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव  यासारखे विविध उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात. याच बाबीचा विचार करता पर्यटक क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध कार्यरत असणाऱ्या संघटनेची मदत घेऊन समिती स्थापन करावी. पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शासनाचा मानस आहे. यादृष्टीने या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्

विनाअनुदानित शिक्षकांचा महाएल्गार ला हवी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट अनुदानासाठी आझाद मैदानावर आंदोलन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / दत्ता भगत                                    मुंबई : ‘माझा पगार माझी जबाबदारी त्यासाठी शेवटची मुंबई वारी', आझाद मैदान मुंबई येथे १० ऑक्टोंबर पासून महाएल्गार बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार शिक्षक समन्वय संघाच्या शिक्षकांनी केला आहे. आम्ही आमदारांच्या मंत्र्यांच्या पाया पडलो, मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले, पण सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. आमचा वनवास काही संपत नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही हे आमचे दुर्भाग्य आहे. अशी व्यथा ऑक्टोबर हिटच्या रणरणत्या उन्हात महाआक्रोश आंदोलन पुकारणाऱ्या शिक्षकांनी जनलोक वार्ताशी बोलताना आपली भावना व्यक्त केली. राज्यातील खाजगी प्राथमिक  माध्यमिक, उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यातील ६५००० विना आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून २०१४ व नोव्हेंबर २०१५ वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानात बेमुदत महाआक्

फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद; ३ हजार २२४ नोंदी निर्गत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१३: सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीला जिल्हयात  चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ३ हजार २२४ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या.             राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.             त्यानुसार बुधवार १२ ऑक्टोबर रोजी आयोजित  फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून या फेरफार अदालतीमध्ये साध्या २ हजार ५८७ , वारस ४८७  आणि तक्रारी १५० अशा एकूण ३ हजार २२४ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. *बारामती तालुक्यात सर्वाधिक फेरफार नोंदी निर्गत*             बारामती तालुक्यात सर्वाधिक  ६४६ तर शिरूर तालुक्यात ४१७ नोंदी निर्गत करण्यात आल्या. हवेली तालुक्यात २६७, पिंपरी चिंचवड १५७,  आंबेगाव २४६, जुन्नर २३९,  इंदापूर ३४४, मावळ १९६, मुळशी १३४, भोर १०८, वेल्हा ७०,