कानवडे, खेसे, टोपे व साबळे यांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय पुरस्कार निवड पत्र प्रदान
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / लतीफ शेख
खेड दि. १८ महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विजय कानवडे व उत्तमराव खेसे रावसाहेब साबळे एकनाथ टोपे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2020-22 साठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र पुरस्कार निवड समितीने कानवडे, टोपे,खेसे व साबळे साबळे यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली.
व्यंकटराव जाधव प्रदेशाध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य व केदार सर यांनी कानवडे व खेसे यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल चे पत्र घरी येऊन सन्मानाने देण्यात आले.
सदरचा पुरस्कार 30 ऑक्टोबर 2022 रविवार सकाळी साडेनऊ वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास छत्रपती संभाजी राजे मा . खासदार तथा अध्यक्ष स्वराज्य संघटना श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर इंदोर धैर्यशील माने लोकसभा सदस्य राजेंद्र पाटील शिरोळा विधानसभा जिल्हा कोल्हापूर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
श्रीमंत फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी या विद्यालयाचे प्राचार्य केंगारे सर पर्यवेक्षक आगम सर व सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि अशोक टावरे सुनील दौंडकर इत्यादी लोकांनी अभिनंदन केले आहे वाशेरे विद्यालयातील साबळे व वाकी विद्यालयातील टोपे मामासाहेब प्रशालेचे खेसे सर यांचे खेड तालुक्यात शिक्षण विभागातील वर्गाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा