अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी :दत्ता भगत
खेड दि.११, एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षेनुवर्षे काम करणारे अंगणवाडी कर्मचा-यांनी त्यांच्या वेतनात वाढ देण्यात तसेच सुप्रिम कोर्टाचा निर्णयनुसार ग्रॅच्युईटीची रक्कम व पेन्शन देणे योजनेच्या कामासाठी मोबाईल देणे, लाभार्थ्यांच्या दरात वाढ करणे या व इतर त्यांचे प्रश्न व मागण्या मान्य करावे व थकित टी.ए.डी.ए. व आहाराचे थकित पैसे देण्यात यावे. या मागणीसाठी देशाच्या घटनेने त्यांना दिलेले अधिकारानुसार त्यांनी दि. ४.१२.२०२३ पासुन त्यांनी संपावर गेल्या आहे. संपावर जाण्याचा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांच्या मागण्या शासनाने व आपले कार्यालय मान्य करीत नाही, तर संपावर असलेल्या महिलांना कामावरून कमी करण्याची नोटिस दिले आहे. परिणामी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे. आम्हाला बेकायदेशीर नोटिस देऊन आम्हाला न्याय न देण्याचा आपल्या प्रकल्प कार्यालयाकडून केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी व धमकी, व नोकरीतून कमी करण्याच्या नोटिसची होळी करण्याकरीता व शासन प्रशासनाने अंगणवाडी कर्मचा- यांच्या मागण्या त्वरीत मान्य करण्यासाठी याचा आग्रह धरण्यासाठी प्रकल्प या अंगणवाडी कर्मचा-यांचा पंचायत समिती येथे दि. मध्ये काम करणा- रोजीपासुन दुपारी १२ वाजता बेमुदत ठिय्या आंदोलन, जेलभरो आंदोलन, थाळीनाद आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. यातून निर्माण होणा-या प्रश्नांची पूर्ण जबाबदारी आपले कार्यालयाची राहील. आम्ही या पत्राने मागणी करीत आहोत की, परिस्थिती या थरला जाऊ न देता त्यापुर्वीच प्रकल्पांनी ज्या अंगणवाडी कर्मचा-यांना बेकायदेशीर नोटिस दिली आहे. ती त्वरीत मागे घ्यावी व ज्या अंगणवाडी कर्मचा-यांना सेवेतून कमी केलेल्या आहे. अशा सर्व अंगणवाडी कर्मचा-यांना सेवेत रुजू करून घेण्यात यावे. अंगणवाडी कर्मचा- यांचे तालुक्यातील प्रश्न त्वरीत सोडवावे व कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य करावे. याचा तातडीने आपल्या कार्यालयाने शासनाकडे पाठपुरावा करावे. अशी विनंती मधील अंगणवाडी कर्मचा-यांची मागणी आहे. तरी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ डोळस तर्फे पाठींबा देण्यात आला. तसेच निवेदन देण्यात आले त्याचवेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl (A) खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ डोळस, खेड तालुका युवक उपाध्यक्ष निलेश भोसले कार्य करते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा