पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजगुरुनगर मधील बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क राजगुरुनगर दि.२५ (प्रतिनिधी - योगेश माळशिरसकर)     सोहम नाटय संस्था व स्वास्थ्यमंत्र व्याख्यानमाला राजगुरूनगर आयोजित राजगुरूनगर मध्ये ६ ते १४ वयोगातील विद्यार्थ्यासाठी पहिले बालनाट्य प्रशिक्षण उत्स्फूर्त प्रतिसादासह नुकतेच दि. ७ मे ते २१ मे या दरम्यान  पार पडले .      यासाठी एकूण ४० मुलांनी शिबिरात सहभाग नोंदवला.नाटक आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर दिग्दर्शक,संगीतकार, व्हॉईस आर्टिस्ट यांनी नाट्य कलेची विविध माहिती ,नाटकाचे प्रकार , प्रात्यक्षिकांसह मुलांना मार्गदर्शन केले.         १५ दिवस चाललेल्या या शिबिराची सांगता रविवार (दि.२१ मे)रोजी समतानगर,वाडा रोड वरील सारा इंटरनॅशनल स्कूल येथे देवाची फुलं,वेडात मराठे वीर दौडले सात,राजहंस,मूकनाट्य  Mime Act,अप्पर डिप्पर या नाटकांच्या सादरीकरणाने झाली.     या शिबिरासाठी प्रतिक खिसमतराव,डॉ.नीलम गायकवाड,डॉ.शीतल ढवळे - खिसमतराव ,डॉ.कुंतल जाधव  या आयोजकांनी  राजगुरुनगर मध्ये प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले .

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास खिशाला बसणार दुप्पट कात्री ; वाहतूक विभागाने जारी केले नवीन दंडाच्या रकमेची यादी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि २६, पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आले आहे. वाहतूक नियम: वाहनाचा प्रकार - दुचाकी - चारचाकी प्रथमच दंडाची रक्कम - रु 500 - रु. 500 दुसऱ्यांदा दंडाची रक्कम - रु 1500 - रु. 1500 टोइंग चार्ज: दुचाकी - 200 रु चारचाकी - 484 रु दुचाकी - रु 85.56 चारचाकी - रु 87.12 दुचाकी - रु 785.56 (पहिल्यांदा) आणि रु 1,785.56 (दुसऱ्यांदा) चारचाकी - रु 1,071.12 (पहिल्यांदा) आणि रु 2,071.12 (दुसऱ्यांदा)

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार- मंत्री शंभूराज देसाई

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई ,  दि. 18 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत ,  त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत ,  यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात  ‘ शासन आपल्या दारी ’  हे अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे दि.१३ मे रोजी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी अंतर्गत २७ हजार पात्र लाभार्थींना लाभ झाला असून  या अभियानांतर्गत  जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ होण्यासाठी सातारा पॅटर्न तयार करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.             मंत्री श्री. देसाई यांनी आज शासन आपल्या दारी अभियान व जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन या विषयाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.             मंत्री श्री. देसाई म्हणाले ,  शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व कोणताही पात्र लाभार्थी या

आकुर्डी रेल्वेलाइन हद्दीतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  निगडी दि.१८, आकुर्डी रेल्वे लाइन हद्दीतील अवैध टपऱ्यांवर पालिकेने कारवाई केली. आकुर्डी रेल्वलाइन हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालला होता. अखेर आज पालिका प्रशासनाने त्याच्यावर धडक कारवाई केली आहे.          पिंपरी चिंचवड महानगरपालिके आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणावर धडक मोहीम राबविण्याचे काम करत आहेत. शहरातील सर्व अ ते ह क्षेत्रीय हद्दीत अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जात आहे. मात्र याला अनेक कष्टकरी आणि फेरिवाल्या संघाकडून विरोध देखिल होताना पहायला मिळत आहे.

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                  मुंबई ,  दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये ,  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.            आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे  ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या श्री. शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये ,  असे निर्देश दिले. तसेच या वा

गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू, त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि.१७ : गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National games), २०२२ स्पर्धेतील राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली  असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.             महाजन म्हणाले, स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पदक प्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहिर केली आहे. खेळाडू व मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकासाठी एकूण रक्कम रू. २०३६.७० लक्ष प्राप्त झालेली आहे.              राज्याचे क्रीडा धोरण अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित असून त्याअंतर्गत दि. २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात या राज्यात संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National g

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१७: पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भरता निधी अर्थात स्वनिधी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रमकुमार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पथविक्रेत्यांनी एकत्रितपणे वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कमी किमतीत खरेदी होईल. त्यामुळे मिळणारे उत्पन्न वाढविता येईल.  सुरुवातीच्या खरेदीसाठी  निधी उभारण्यातांना लोकप्रतिनिधी मदत करतील. पुढच्या आठवड्यात प्

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय थोडक्यात...

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  दिनांक: १६ मे २०२३ आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. भरीव वाढ.  (कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग) अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय (पदुम विभाग) इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ (उद्योग विभाग) मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण (सामाजिक न्याय) ---------------------- सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले

सातव्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १६: सातव्या युएन जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ते सुरक्षितेतच्यादृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, वाहन वितरक, मोटार वाहन प्रशिक्षण संस्था, पीयूसी केंद्र, रेट्रोफिटमेंट केंद्र, वाहतूकदार संघटना तसेच सामाजिक संस्थेमार्फत ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर वॉकेथानचे आयोजन करणे, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर करण्याकरिता नागरिकामध्ये प्रबोधन करणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉक ऑन राईट बाबत जनजागृतीपर कार्यक्रम करणे, व्याख्याने आयोजित करणे, माहितीपत्रके वाटणे तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  रस्ते अपघाताचे प्रमाण विचारात घेऊन त्याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या जनजागृती होण्यासाठी २१ मे पर्यंत ‘शाश्वत वाहतूक’ या विषयासंदर्भात जनजागृती  करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांप्रती  स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे.  रस्ते

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न; व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १६: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’  संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. *खेड शिवापूर ते नवले पूलदरम्यान दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई* यापूर्वी झालेल्या समितीच्या निश्चित करण्यात आल्याप्रमाणे कात्रज नवीन बोगद्याच्या अलिकडे जांभूळवाड

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश ;सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.१५ - अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या  दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार ;कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.             सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.             बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २० हजार ८६० आहे तर त्य

शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानदारांकडे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १५: पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानातून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ई-पॉस मशीनमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.  भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट केल्यानंतर किती धान्य मिळाले याचा संदेश भ्रमणध्वनीवर येतो. ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश येत नाही त्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रास्त भाव दुकान किंवा तहसिल कार्यालयाकडे समाविष्ट करावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.                                

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ; श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई, दि. १५: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार  विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन  ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.  पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे.  यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाणेर-बालेवाडी २४x७ पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण ;पुण्याच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देणार-उपमुख्यमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१५- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि  २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते  बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले.  पुणे शहराच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री.फडणवीस यांनी दिली. बालेवाडी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,  पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून भविष्यातील शहर आहे. जगाच्या पाठीवर २१ व्या शतकातील ‘नॉलेज सिटी’ म्हणून नोंद असलेले पुणे शहर आहे, ह

भारती विद्यापीठाचा ५९ वर्धापन दिन समारंभ संपन्न ; कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १०: भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या संस्था कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी काढले. भारती विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिन समारंभ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमीपूजन समारंभात श्री. नार्वेकर बोलत होते. कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भारती विद्यापीठाचे  कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते. जो वाचायला शिकवतो तो देश घडवतो, असे सांगून श्री. नार्वेकर म्हणाले, भारती विद्यापीठ केवळ शैक्षणिक संस्था नसून देशात महाराष्ट्राची ओळख म्हणून ओळखले

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दूध डेअरींसाठी कार्यशाळा संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १०: पुण्यातील दूध डेअरी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ‘व्हिटॅमिन ए आणि डी सह दुधाचे दृढीकरण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ, सहायक आयुक्त अनिल गवते, राजेंद्र काकडे, दुग्ध संवर्धन तांत्रिक तज्ज्ञ विवेक अरोरा आदी उपस्थित होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने मुख्य खाद्यपदार्थ गहू, तेल, दूध, दुहेरी फोर्टिफाइट मीठ आणि तांदूळ यांच्या फोर्टिफिकेशनसाठी मानके परिभाषिक केली आहेत. ही मानके भारत सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये राजपत्रित केली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सह आयुक्त श्री. भुजबळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासनाने राज्यात दूध फोर्टीफिकेशनला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून या संदर्भात विकास एजन्सी ही केएचपीटी आणि जीएआयएन सोबत भागीदारी करत आहे. त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये फूड फोर्टिफिकेशनबद्दल जाणीवजागृती केली आहे. याच अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये सहभाग

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कृषि महाविद्यालयात विविध कामांचा शुभारंभ ; सभागृह बांधकामासाठी १० कोटी रुपयास मान्यता

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.८ : कृषि महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या १ हजार क्षमतेच्या सभागृहासाठी १० कोटीची मान्यता देण्यात आली असून ६ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुसज्ज, पायाभूत व मूलभूत सुविधा असलेले सभागृह बांधण्यात यावे, अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. कृषि महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या निवासी इमारत, शेततळे, बेकरीचे उद्घाटन व सभागृहाच्या जागेचे भूमिपूजन कृषिमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाला कृषि आयुक्त सुनील चव्हाण, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर उपस्थित होते. कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता मोठ्या सभागृहाची आवश्यकता होती. त्यासाठी आवश्यक असणारा उर्वरित ४ कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल.  येत्या शैक्षणिक वर्षांपासून प्राथमिक शिक्षणामध्ये क

जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे ११ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार  गुरुवारी ११ मे  रोजी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी  यांच्या मंचर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विशेष लोक अदालतीसाठी संबंधित पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून विशेष लोक अदालतीचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण ६ पथके तयार करण्यात आलेली आहेत.   या विशेष लोक अदालतीत सन २०१३ ते २०२० या कालावधीतील प्रलंबित दावे मुख्यत्वे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.  विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व त्यांच्या विधिज्ञांनी हजर राहून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गोविंद शिंदे उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग, मंचर (पुणे) यांनी केले आहे.                                 

बाणेर-बालेवाडी योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क      पुणे, दि. ८: समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी येत्या १७ मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले.     शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस  पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे  मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील  यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे महसूल विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ; शेतकऱ्यांना वेळेत गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते मिळतील याकडे लक्ष द्या- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ८: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके कार्यान्वित करुन चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत गैरप्रकारांना आळा घालावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. विधानभवन येथे  आयोजित पुणे महसूल विभाग खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौतुभ दिवेगावकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी,  जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  ज्ञानेश्वर खिलारी,  संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते. पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी कृषि विभागाने आणि विद्यापीठांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे सांगून कृ‍षिमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कृषि विद्यापीठांनी पिकांचे नवनवीन वाण तयार करुन

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध ;समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ८: महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४  तास उपलब्ध असून  समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.  महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडतीची मुदत १५ मेपर्यंत असल्याचे तसेच १५ मे नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश आणि माहिती अज्ञातामार्फत विविध सामाज माध्यमांवर पसरविण्यात  येत आहे. महाडीबीटी पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश आणि माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे, असे कृषि विभागाने कळवले आहे. शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी अर्ज करावेत, असेही आवाहन कृषि व

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न ; सर्व विभागांनी आपत्तीच्या परिस्थितीत समन्वयाने काम करावे-डॉ.राजेश देशमुख

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ४: नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एनडीआरएफचे कमांडंट संतोष बहादूर सिंग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात ११ नद्या आणि ८० पेक्षा जास्त पूरप्रवण गावे, २२ दरडप्रवण गावे आहेत. याशिवाय पुणे, पिंपरी चिंचवडसह शहरांमध्ये जुने वाडे, जुन्या निवासी इमारती आहेत. यंदा अल निनोचा अंदाज असला तरी गतवर्षी पर्जन्यछायेतील तालुक्यात एका दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या बाबींचा विचार करुन आपत्तीच्या अनुषंगाने

राज्यातील मधमाशा पालकांसाठी 'मधुमित्र' पुरस्कार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ५: राज्यातील मधमाशा पालकांना  राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यातील मधमाशा पालनाला  प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ  मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे, या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन  मिळावे यासाठी यावर्षीपासून 'मधुमित्र' या पुरस्कारांची घोषणा केली आहे. मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.  या पुरस्कारांचे वितरण २० मे या जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय येथे होणार आहे. पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मानपत्राचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये जास्तीत जास्त मधपालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.साठे यांनी केले आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी

पुण्यात १० मे रोजी ‘रोजगार मेळावा; दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ४: नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील दुसरा रोजगार मेळावा येत्या १० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याप्रसंगी विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरिता पाचारण कर