वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास खिशाला बसणार दुप्पट कात्री ; वाहतूक विभागाने जारी केले नवीन दंडाच्या रकमेची यादी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे दि २६,
पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आले आहे.
वाहतूक नियम:
वाहनाचा प्रकार - दुचाकी - चारचाकी
प्रथमच दंडाची रक्कम - रु 500 - रु. 500
दुसऱ्यांदा दंडाची रक्कम - रु 1500 - रु. 1500
टोइंग चार्ज:
दुचाकी - 200 रु
चारचाकी - 484 रु
दुचाकी - रु 85.56
चारचाकी - रु 87.12
दुचाकी - रु 785.56 (पहिल्यांदा) आणि रु 1,785.56 (दुसऱ्यांदा)
चारचाकी - रु 1,071.12 (पहिल्यांदा) आणि रु 2,071.12 (दुसऱ्यांदा)
MH 14. HG 9210
उत्तर द्याहटवा