पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती वाडा विद्यालयात उत्साहात साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी / उत्तम खेसे खेड दि २८; रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अ‍ॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय वाडा येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 135 वा जयंती सोहळा रयत शिक्षण संस्थेचे,पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या याप्रसंगी प्रमुख उपस्थिती शंकरशेठ हुंडारे पाटील,नगरसेवक मुंबई, आनंदराव तांबे,आजीव सभासद रयत शिक्षण संस्था सातारा हे होते.          कार्यक्रमा वेळी प्रथम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले यानंतर  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात एन.एम.एम.एस., स्कॉलरशिप,दहावी व बारावी मध्ये प्रथम क्रमांक आलेले तीन विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यात आले त्यात प्रणय तनपुरे, अभिषेक कडलग व स्नेहल गुंडाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले शंकरशेठ हुंडारे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात  रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग,चेअरमन राम

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान ; भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि. २८ : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण  ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  आज रविंद्र नाट्यमंदीर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन २०२० चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर सन २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सदा सरवणकर, आमदार आशीष शेलार

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत ; केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /राजू शिंगाडे   पुणे, दि. २८: देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकं

तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / प्राजक्ता पाटील   पुणे दि.२८: देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅव्होकसी अँड रिसर्च संस्था (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र नोंदणी अभियान आणि ओळखपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.   शिबिरात तृतीयपंथीयांना आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्ड यासाठी आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त रविंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, पुणे मनपा उपायुक्त रंजना गगे, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर आणि विविध तृतीयपंथी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  तृतीयपंथी संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एकत्रित पुढाकारातून तृतीयपंथी व्यक्तींना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे श्री.पाटोळे यांनी यावेळी सांगितले.  शिबिरात २० तृतीयपंथी व्यक्ती सहभागी झाल्या होत्

महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत' ; माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /दत्ता भगत   पुणे दि.२८: राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचा शुभारंभ आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आदी उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले, घरातील महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असते. कुटुंबासाठी झिजताना तिचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सर्व महिलांची स्थिती साधारण हीच असते. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या

चांदणी चौक पूल पाडण्याच्यावेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक बंद रहाणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / दयानंद गौडगांव पुणे, दि. २८: मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार असल्याने या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाईबाबतचे आदेश पुणे शहरचे पोलीस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत. वाहतूकीतील बदल १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अथवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. *वाहतुकीतील बदल-* • मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे. • साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे. • मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे. • मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय

मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी  / राजू शिंगाडे             मुंबई, दि. २७ : राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील ७८ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विभागातील नियुक्तीपत्रे देण्यात आली.             मंत्रिमंडळ बैठक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.             शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग (ईएसबीसी) प्रवर्गास सरळसेवेत १६ टक्के आरक्षणाचा निर्णय २०१४ मध्ये झाला होता. त्यास उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. २०१८ मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग

खरपुडी येथील साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक विष्णू काळे, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                                      प्रतिनिधी  / लतीफ शेख श्रीवर्धन : रायगड येथे झालेल्या अविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर तसेच अविष्कार फाउंडेशन शाखा- रायगड जिल्हा च्या  वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार साने गुरुजी विद्यालय खरपुडी बु ता.खेड येथील उपशिक्षक  काळे विष्णू ज्ञानू यांना दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला. सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत  प्रयत्नशील असलेले व्यक्तिमत्व, आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. सदर कार्यक्रम   रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार  आदितीताई  तटकरे, आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पवार, रायगड जिल्हाध्यक्ष मा.संदीपजी नागे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी पाटील अविष्कार फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी कंठाळे सर यांच्या उपस्थितीत पार पडला. या संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विभागातील लोकांसाठी कार्याची दखल घेऊन दरवर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार ; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / दयानंद गौडगांव पुणे, दि. २७: मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. चांदणी चौक पूल पाडण्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजीव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आदी उपस्थित होते.  चांदणी चौकात होणारी वाहतुकीचा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौक येथे एकात्मिक संरचना पूल प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अस्तित्वातील जूना पूल पाडण्यात येणार असून महामार्ग सहापदरी करण्यात येण

नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /इस्माईल तांबोळी पुणे, दि. २७ : - यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.  पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात. यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळव

लम्पी रोगामुळे शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी ; निमगाव खंडोबा भागात बैलांना पुरणपोळीचा घास घरीच भरवून सण साजरा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दत्ता भगत पुणे/खेड दि२६,  लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बैल पोळ्याच्यानिमित्ताने बैलांच्या मिरवणुकीवर घातलेल्या बंदीमुळे खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील शेतकरी वर्गाने साध्य पध्दतीने बैल पोळा सण साजरा केला आहे. गेल्या काही दिवसापासुन पशुसंवर्धन खात्याने घातलेल्या निर्भबधनामुळे लम्पिचे संकट ओढवले आहे. लसीकरण बऱ्यापैकी झालेले असले तरी खबरदारीचे उपाय म्हणून काही प्रमाणात निरबंध घालण्यात आले आहे. मिरवणुकीवरील बंदी याचाच एक भाग म्हणून साध्या आणि घरगुती पध्दतीने बैल पोळा सण साजरा करण्यात आला. दत्ता भगत यांनी अगदीच साध्या पध्दतीने राहत्या घरी बैल सजवले,अगदी ढोल,ताशा,लेझीम वगैरे सर्व नियोजन केले होते पण ते सर्व बारगले कारण पशुसंवर्धन खात्याचे सर्व नियमांचे पालन केले. या मुळे आम्ही बैलांना धून,शिगंना रंग,बेगाडे ,गळ्यात विविध फुलांचे हार बांधून  घरातील महिला भगिनींनी पूजन करून पुरण पोळीचा घास भरविला आणि शेतकरी वर्गाला यावरच समाधान मानावे लागले. 

शिराळ्यातील बायपास नाक्यावरील खाजगी बस थांब्यावर महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उभारा ; शिराळा तालुका प्रवासी संघाची मागणी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / विशाल खुर्द शिराळा येथली शासकीय तंत्रनिकेतन (ITI)- शिराळा बायपास येथील ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर मुंबई- पुणेकर प्रवाशी, विशेषतः महिला प्रवाशी, लहान मुले यांच्याकरिता स्वच्छतागृहाची उभारणी करावी, तसेच स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत फिरते स्वच्छतागृह देण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिराळा तालुका प्रवासी संघ, शिराळा-वाळवा (शिवा) युवक क्रांती आघाडी तर्फे शिराळा नगरपंचायत प्रशासनास देण्यात आले. सदर ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिला तसेच इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने उघड्यावर लघुशंकेस जाण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. यामुळे महिला सुरक्षा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत शिराळा तालुका प्रवासी संघाचे समन्वयक लालासाहेब शिंदे, बंटी नांगरे- पाटील, महादेव रोकडे, मानसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, महेश माने, मारुती रोकडे, कैलास देसाई यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

चांदोली राष्ट्रीय अभयारण्य परिसरात दुर्मिळ ग्रेट हॉर्नबिल पक्षाचे दर्शन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी- विशाल खुर्द    शिराळा/ वारणावती  : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्य परिसरातील मणदूर गाव परिसरात ग्रेट हॉर्नबिल या जागतिक दृष्टीने धोक्यात असलेल्या पक्षाचे दर्शन झाले आहे. अभयारण्या बाहेरील  गावांमध्ये  सुद्धा महत्वपूर्ण जैवविविधता आढळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.सदर परिसरातील जैवविविधता जपणे आणि महा वृक्षांची तोड थांबवणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी गाव परिसरातील वृक्षतोड करू नये असे आवाहन प्लानेट अर्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे. सदर पक्षाचा फोटो व व्हिडीओ संस्थेचे सदस्य अमित माने तसेच चांदोली चे प्रसिद्ध गाईड गणेश पाटील यांनी काढला आहे. एक मीटर लांबीचा पंखांचा विस्तार असलेला हा धनेश पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. य

अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाच्या 'जनलोक वार्ता' इंदापूर विभाग वृत्तपत्राचे प्रकाशन सोहळा संपन्न ; पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी गणेश वाघ यांची निवड

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / बाळासाहेब जगताप                          इंदापूर : दि. २५, अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाची सभा इंदापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जनलोक वार्ता इंदापूर विभागाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन सोहळा देखील पार पडली.  यावेळी जनलोक वार्ता समिती अध्यक्ष इस्माईल तांबोळी व उपाध्यक्ष मुस्तफा चाबरू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  या सोहळ्यास अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंगाडे हे ही उपस्थित होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, "भारत सरकारचे कायमस्वरूपी मूळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इंदापूर येथील सदस्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे इंदापूर येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनलोक वार्ता साप्ताहिक वर्तमानपत्र नेहमीच कार्यरत असेल. पत्रकार संघाचे असंख्य सदस्य महाराष्ट्रात सध्या सामाजिक व विधायक कार्य करीत असून जनलोक वार्ता साप्ताहिक वर्तमानपत्रा द्वारे आपापल्या विभागातील समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करतात व प्रशासनास जनलोक वार्ता वर्तमानपत्रा द्वारे नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून देतात. पत्रकार संघाचे असंख्य सद

सीएसआर निधीतून खर्ड्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात येणार लाखोंची कामे; विदयार्थी-विद्यार्थिनींना होणार फायदा ;आमदार रोहित पवारांचाही पुढाकार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क खर्डा (जामखेड प्रतिनिधी) :  कर्जत जामखेड मतदारसंघात सीएसआरच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कामे सुरू असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे. त्यातच न्यू इंग्लिश स्कूल खर्डा येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर निधीमधून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सोयीसाठी लाखोंची कामे करण्यात येणार आहेत. त्याचा भूमिपूजन सोहळा शनिवारी आमदार रोहित पवार आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी यांच्या हस्ते पार पडला.  मतदारसंघात सीएसआर निधी उपलब्ध करून आणण्यासाठी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्याचे काम आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या प्रयत्नातून निधी देखील उपलब्ध होत असून अनेक विकास कामे मार्गी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वॉश प्रकल्पांतर्गत आयओसीएलच्या सीएसआर निधीतून जवळपास 30 लाख रुपयांची विविध कामे करण्यात येणार आहेत ज्यामध्ये विदयार्थ्यांना स्वच्छ पेयजल उपलब्ध करणे, अत्याधुनिक स्

मोशन क्लिप्स चाकण यांच्या वतीने विजय कानवडे यांचा सन्मानचिन्हाने गौरव

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी उत्तम खेसे                  खेड  (राजगुरुनगर)  दि. २३, श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी येथे दि,२३  रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ वा जयंती समारोह सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मोशन क्लिप चाकण चे सर्वेसर्वा बाबाजी दिघे यांच्या मोशन क्लिप्स चाकण इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲनिमेशन अँड फिल्म डिझाइनिंग फिल्म डिझाइनिंग तर्फे दावडी विद्यालयाचे उपशिक्षक विजय कानवडे यांना अविनाश गायकवाड उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भाटघर जलविद्युत केंद्र यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  याप्रसंगी मा. आमदार, विभागीय चेअरमन, पश्चिम विभाग रयत शिक्षण संस्था सातारा,  राम कांडगे साहेब आणि आनंदराव तांबे अजीव सभासद, रयत शिक्षण संस्था सातारा, दावडी गावचे विद्यमान सरपंच सौ. राणी डुंबरे ,सुरेश डुंबरे ,माजी सरपंच संतोष शेठ गव्हाणे ,दावडी गावच्या सोसायटीचे चेअरमन गणेशशेठ गव्हाणे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तुकाराम जी गाडगे पाटील, उपसरपंच अनिल मामा नेटके, माजी सरपंच संभाजी आबा घारे ,जिल्हा परिषद च्या मा

नाविंदगी गावालगतच्या वळणावर असलेली काटेरी झुडपे देत आहेत अपघाताला आमंत्रण ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क अक्कलकोट प्रतिनिधी : अक्कलकोट दि. २५. अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील अक्कलकोट-नाविंदगी रस्त्यावर गावालगत असलेल्या वळणावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहे. नाविंदगी- अक्कलकोट मुख्य रस्त्यावर गावाच्या वेशीपासून सुमारे २०० मीटर अंतरावर एक वळण आहे. त्या वळणाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. नाविंदगी गाव हे सीमावर्ती भागात असल्याने त्या गावातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मात्र या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, परिणामी अपघात होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देवून काटेरी झुडपे हटविण्याचे काम करावे. अशी मागणी गावकरी करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नाविंदगी-अक्कलकोट मुख्य रस्त्यावर आणि नाविंदगी-नाविंदगी तांडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अडचणी निर्माण होत आहेत.

सावली फाउंडेशन व हाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'भूक' हा उपक्रम ; दररोज मिळणार १००० गरीबांना मोफत जेवण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी  / प्राजक्ता पाटील पुणे : दि. २४, पुणे शहरातील विविध भागांमध्ये आढळणाऱ्या भटक्या जमाती कुटुंब व निवारा नसल्याने रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांसाठी पत्रकार प्राजक्ता पाटील यांच्या सावली फाउंडेशन व हाऊ फाउंडेशन मार्फत रोज १०००  गरीब नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था आज पासून करण्यात आली आहे. या उपक्रमास त्यांनी ' भूक ' हे नाव दिलेले आहे. हा उपक्रम जनलोक वार्ताच्या प्रतिनिधी प्राजक्ता पाटील या स्वतः राबवित आहेत. आज पासून या उपक्रमास त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन व ससून रुग्णालया बाहेरील गोरगरीबांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ' भूक ' या उपक्रमाची सुरुवात केली. शासन आपल्या पद्धतीने गोरगरीब लोकांसाठी व्यवस्था करतेच पण, आपणही समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्राजक्ता पाटील यांनी सामाजिक कार्य करण्याचे ठरविले. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम त्या राबवित असून या अगोदरही त्यांनी ' स्वच्छ पुणे सुंदर पुणे ' या उपक्रमांतर्गत हडपसर भागामध्ये साफसफाई चे काम केलेले आहे.   एका व्यक्तीकडून भटक्या रस्त्यावरील गोरगरिबांसाठी राब

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा - पाहा संपूर्ण यादी

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे मुंबई दि 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,  सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,  चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,  गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव दादा भुसे- नाशिक,  संजय राठोड- यवतमाळ, वाशिम सुरेश खाडे- सांगली, संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव) रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली,  दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,  अतुल सावे - जालना, बीड, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी यंत्रणा गतीमान करा- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव पुणे, दि. 24: केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला वेग देणे गरजेचे असून त्यासाठी सर्व यंत्रणांना गतीमान करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्याची केंद्रपुरस्कृत योजनांची आढावा बैठक विधानभवन येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, माधुरी मिसाळ, राहूल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी यावेळी उपस्थित होते. केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर श्रीमती सीतारामन म्हणाल्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सौरपंप वितरण, सौर पॅनेलद्वारे ऊर्जानिर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याला उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देणारी प्रधानमंत्री कुसुम योजना प्रभावीपणे राबवावी. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची क्षमता पाहता अधिकाधिक यो

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दत्ता भगत खेड पुणे दि.२४: देशाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मिमा मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी मिटकॉनचे अध्यक्ष संचालक प्रदीप बावडेकर,कार्यकारी उपाध्यक्ष सुरेश घोरपडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्या बावडेकर,  जोशी, अमोल वालवटकर, श्रीमती ज्योती कळमकर आदी उपस्थित होते.  श्री पाटील म्हणाले, मिटकॉनमध्ये राज्यासह देशातील इतर भागातील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, त्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे. जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात भारताची वेगळी ओळख निर्माण झाली असून शिक्षण तसेच उद्योग क्षेत्राला पाठबळ देण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणाचा व्यवहारात उपयोग होईल अशा ब

दहा दिवसापूर्वी गोंडस बाळाला जन्म देऊन ती आज जग सोडून गेली ; बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार शितल जगताप ( गलांडे ) यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / योगेश रांजणे बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या उमद्या महिला पोलीस अंमलदार शितल जगताप ( गलांडे ) यांचे आकस्मित निधन. बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शितल जगताप (गलांडे). यांचे त्या प्रसूती रजेवर गेल्यानंतर प्रसूतीनंतर त्यांना डेंगू आजाराची लागण झाल्याने त्यांचे आज पहाटे केईम रुग्णालय पुणे येथे निधन झाले. शितल गलांडे बारामती शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने कामकाज पाहत असे, व पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे अकाली निधन होणे पोलीस दलासाठी न भरून निघणारी उणीव आहे. त्यांची वेळोवेळी उणीव भासेल असे मत व्यक्त करत बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये संपूर्ण पुणे ग्रामीण प

ग्राहकांना फसवणुकी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /मुस्तफा चाबरू पुणे दि.१९-वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहीत मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न करणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते. पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तुवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधिकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास या विभागाकडुन कारवाई केली जाते.  येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणुक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२ ०२०-२६१३७११४ व्हॉटस अप क्रमांक ९८६९६९१६६६ या क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा ; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /दयानंद गौडगांव मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी  भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले. गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी                                                                                             पुणे दि.१९: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले आणि महर्षी कर्वे स्मारकालाही भेट दिली.  राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेतील वास्तुरचना महाविद्यालय, ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चालविली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तु असलेली ‘कर्वे यांची झोपडी’ या ठिकाणी भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी कर्वे शिक्षण संस्था परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्ष सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी खांबेटे उपस्थित होते. 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / चंद्रकांत सलवदे पुणे, दि. १९:  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.  १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील अनुसूचित जाती, अनसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जातीचे दाखले शाळेमध्येच त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  सेवा पंधरवडा कालावधीत या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

नाविंदगी जिल्हा परिषद शाळांना खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्याबाबत शाळा व गावकऱ्यांकडून ग्रामपंचायतीला निवेदन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क अक्कलकोट प्रतिनिधी दि, १९. अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नसल्याने येथील विद्यार्थी शारीरिक व मानसिक तणावाला बळी पडत आहेत. नाविंदगीत सध्या मराठी, कन्नड आणि उर्दू या तिन्ही माध्यमांच्या शाळा आहेत मात्र यामध्ये एकाही शाळेला खेळाचे मैदाने नाही. त्यामुळे याबाबत तिनही माध्यमांच्या शाळेंनी वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देवूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा गावकऱ्यांकडूनही निवेदन देण्यात आले आहे. त्यासोबत शाळांच्या शौचालये, पाणी , कंम्पाऊंड आणि इतर समस्यांविषयी चे निवेदन देण्यात आले.  दरम्यान, गावच्या सरपंचांनी या निवेदनाचे समर्थन करत काम करण्यासाठी सकारात्मकता दाखविली असून लवकरच आपण विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, श्रिकांत पांतारे, पुंडलिक तडलगी, , मल्लिकार्जुन नाविंदगीकर, दयानंद गौडगांव, चंद्रकांत हाळतोट आदी गावकरी उपस्थित होते.

पुणे जिल्हास्तरीय खेड येथील गुणवंत शिक्षक पुरस्काराने दत्ता भगत उत्तमराव खेसे विजय कानवडे व लतीफ शेख राजगुरू रत्न पुरस्काराने सन्मानित

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी / विजय कानवडे   पुणे, दि. १८,पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व राजगुरुरत्न पुरस्कार खेड येथे रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात  करण्यात आला. गुणवंत शिक्षक पुरस्कार दत्ता भगत, उत्तमराव खेसे व विजय कानवडे यांना खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच  लतीफ शेख यांना राजगुरू रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वरील सर्व शिक्षक हे शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामध्ये प्रशंसनीय कार्य करत आहेत. हे शिक्षक शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या आणि जनसेवेच्या कल्याणासाठी निस्वार्थीपणे अविरत कार्य करत असतात. या कार्याचा गौरव म्हणून खेड तालुक्याचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, पदवीधर आमदार गणपती लाड, जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील, जि. प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षणाधिकारी पुणे, सुनंदा वाखारे शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड, मनपा संजय नाईकडे सचिव महाराष्ट

खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ यांच्या वतीने राजगुरू रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे                                            खेड, दि. १८, खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराचे आयोजन करून खेड तालुक्यासह जिल्ह्यातील एकूण 166 पुरस्कारांचे वितरण खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे ,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ कार्याध्यक्ष मधुकर नाईक, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड,केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर व राजगुरू क्रीडा रत्न पुरस्कार लतीफ शेख यांना प्रदान करण्यात आला.     या  कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे ,माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अतुल  देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे, नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, पुणे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, विद्या समिती सचिव रिठे, अध्यक्ष वागदरे, तसेच पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, व विविध विषयाचे अध्यक्ष, व पुरस्कारार्थी व शिक्षक मोठ्या प

सेवा पंधरवडा निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे दि.१८-राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत भोर तालुक्यातील इंगवली येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण करण्यात आले.  यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी स्नेहा देव, विविध विभागाचे अधिकारी, इंगवली ग्रामस्थ उपस्थित होते. उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोविड कालावधी नंतर महसूल विभागात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित केल्याने त्यातून प्रलंबित फेरफार निर्गमित करण्यात येऊन नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यात येत आहे. सेवा हमी कामकाजामध्ये आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात दिलेल्या एकूण सेवांपैकी ९६ टक्के सेवा या वेळेत दिलेल्या आहेत. सेवा पंधरवड्यात देखील प्रशासनाकडून जास्तीत जास्त सेवा व प्रलंबित प्रकरणे निर्गमित करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत भोर उपविभागातील विविध गावात अशा शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या अर्जावर आवश्यक कार्यवाही करण्यात

जॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी / राजू शिंगाडे         मुंबई दि.18: अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना 15 सप्टेंबर 2022 पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.         अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी तपासणी साठी नमुने घेतले होते. शासकीय विश्लेषक, औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई यांनी बेबी पावडरचे उत्पादन अप्रमाणित घोषित केल्याने ही कारवाई करण्यात आली.         'जॉन्सन बेबी पावडर' चा प्रामुख्याने नवजात बाळासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. वरील उत्पादन पध्दतीमध्ये दोष असल्यामुळे सदर उत्पादनाचा सामू ( PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापरामुळे नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उत्पादन सुरु ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही, त्यामुळे मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.         वरील अप्रमाणित घोषित नमुन्याच्या अनुषंगाने संस्थेची अनुज्ञप

हैद्राबादच्या परेड ग्राऊंडवर मुख्यमंत्र्यांनी केला शिवरायांचा जयघोष ; महाराष्ट्राच्या ढोल ताशांनी परेडमध्ये मने जिंकली

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव पुणे दि १८:  कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त काल हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी येथील परेड ग्राऊंडवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.  काल सकाळी औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हैद्राबाद येथे पोहचले आणि त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी आयोजित केलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.  या कार्यक्रमास  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.  *शिस्तबद्ध, आकर्षक परेड* प्रारंभी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक अशा तीनही राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दर्शकांची मने जिंकून घेतली. विशेषतः महार

आव्हाट येथे आर्थिक साक्षरता अभियान संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विकास शिंदे खेड दि १६. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक आणी कौटुंबिक उदिष्टये उत्तम प्रकारे पुर्ण करण्यासाठी आर्थिक बाबींविषयी ज्ञान व कौशल्ये असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय . वैयक्तीक आर्थिक व्यवस्थापन अंदाजपत्रक आणी गुंतवणुक यासह विविध आर्थिक कौशल्ये समजुन घेण्याची आणी प्रभावीपणे वापरण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय . खेड तालुक्यातील आव्हाट ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक ( नाबार्ड ) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित पुणे शाखा वाडा आणी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता अभियान घेण्यात आले . वाडा शाखेचे ब्रॅच मॅनेजर श्री सुदाम केदारी ;विकास अधिकारी श्री रघुनाथ मुळुक ; एफ एल सी  तालुका समन्वयक अधिकारी श्रीमती फदाले मॅडम ;श्री सुरज सुर्यवंशी ;श्री अमोल विरणक यांनी उपस्थित राहून ; बॅकेच्या योजना ;कर्ज ;बचत खाते ;मुदत ठेवी ;विमा ;एटीएम सुविधा आणी बँकेचे ध्येय याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले . सोसायटीचे चेअरमन शिवाजीशेठ वाळुंज ;श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री

महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायाभिमुख अणि आनंददायी असावे- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विजय कानवडे पुणे दि.१७- महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायाभिमुख, बहुश्रुत व्यक्तिमत्व घडविणारे आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करताना आनंदही देणारे असावे. विद्यार्थ्यांला शिक्षणामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या आवडीचे शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक सत्र २०२२२३ पासून सी.बी.सी.एस. प्रणालीनुसार नवीन अभ्यासक्रम सर्व विद्याशाखेत लागू केला असून त्याबाबत विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांतील नियमित व तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याकरीता एकदिवसीय ‘मास्टर ट्रेनींग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापकांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते.  मंत्री श्री.पाटील म्हणाले, एकाच अभ्यासक्रमात विविध प्रकारचे शिक्षण घेण्याची सुविधा विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे. त्यातूनच विद्यार्थ्याचे सर्वांगिण व्यक्तिमत्व विकसीत होऊ शकेल. नवे शैक्षणिक धोरण प्राध्यापकांना पुढे न्यावयाचे असल्याने त्यांनी मोकळ्या म

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /उत्तम खेसे पुणे दि.१७: युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि‍ विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, पद्मभूषण सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.  श्री.कोश्यारी म्हणाले, समाजाला सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र असल्याने आपल्याला स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासूनच चांगले लोकशाही राष्ट्र घडविण्याचा विचार करावा. जीवनात कोणत्याही परिस्थितीत निराश न होता उच्च ध्येय ठेवून वाटचाल सुरू ठेवावी.  छात्र संसदेच्या मा