नाविंदगी गावालगतच्या वळणावर असलेली काटेरी झुडपे देत आहेत अपघाताला आमंत्रण ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
अक्कलकोट प्रतिनिधी :
अक्कलकोट दि. २५. अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील अक्कलकोट-नाविंदगी रस्त्यावर गावालगत असलेल्या वळणावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहे.
नाविंदगी- अक्कलकोट मुख्य रस्त्यावर गावाच्या वेशीपासून सुमारे २०० मीटर अंतरावर एक वळण आहे. त्या वळणाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. नाविंदगी गाव हे सीमावर्ती भागात असल्याने त्या गावातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मात्र या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, परिणामी अपघात होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देवून काटेरी झुडपे हटविण्याचे काम करावे. अशी मागणी गावकरी करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नाविंदगी-अक्कलकोट मुख्य रस्त्यावर आणि नाविंदगी-नाविंदगी तांडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे काहीवेळेस अपघातही झाला आहे. या बाबीकडे ग्रामपंचायत साफ दुर्लक्ष करत आहेत.
-चौडप्पा वड्डे , कार्यकर्ता
शिवसेना,नाविंदगी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा