मोशन क्लिप्स चाकण यांच्या वतीने विजय कानवडे यांचा सन्मानचिन्हाने गौरव

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी उत्तम खेसे

   


            

खेड  (राजगुरुनगर)  दि. २३, श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी येथे दि,२३  रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ वा जयंती समारोह सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मोशन क्लिप चाकण चे सर्वेसर्वा बाबाजी दिघे यांच्या मोशन क्लिप्स चाकण इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲनिमेशन अँड फिल्म डिझाइनिंग फिल्म डिझाइनिंग तर्फे दावडी विद्यालयाचे उपशिक्षक विजय कानवडे यांना अविनाश गायकवाड उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भाटघर जलविद्युत केंद्र यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

याप्रसंगी मा. आमदार, विभागीय चेअरमन, पश्चिम विभाग रयत शिक्षण संस्था सातारा,  राम कांडगे साहेब आणि आनंदराव तांबे अजीव सभासद, रयत शिक्षण संस्था सातारा, दावडी गावचे विद्यमान सरपंच सौ. राणी डुंबरे ,सुरेश डुंबरे ,माजी सरपंच संतोष शेठ गव्हाणे ,दावडी गावच्या सोसायटीचे चेअरमन गणेशशेठ गव्हाणे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तुकाराम जी गाडगे पाटील, उपसरपंच अनिल मामा नेटके, माजी सरपंच संभाजी आबा घारे ,जिल्हा परिषद च्या माजी सदस्या वंदनाताई सातपुते ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार राऊत, माजी सरपंच कविताताई शिंदे ,माजी चेअरमन साहेबरावजी दुंडे , सकाळचे जेष्ठ पत्रकार सदाशिव अमराळे, पुढारीचे जेष्ठ पत्रकार कुंडलिकजी वाळुंज व गावातील विविध अधिकारी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात