अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाच्या 'जनलोक वार्ता' इंदापूर विभाग वृत्तपत्राचे प्रकाशन सोहळा संपन्न ; पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी गणेश वाघ यांची निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी  / बाळासाहेब जगताप

 


                      

इंदापूर : दि. २५, अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाची सभा इंदापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जनलोक वार्ता इंदापूर विभागाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन सोहळा देखील पार पडली.  यावेळी जनलोक वार्ता समिती अध्यक्ष इस्माईल तांबोळी व उपाध्यक्ष मुस्तफा चाबरू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 


या सोहळ्यास अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंगाडे हे ही उपस्थित होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, "भारत सरकारचे कायमस्वरूपी मूळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इंदापूर येथील सदस्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे इंदापूर येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनलोक वार्ता साप्ताहिक वर्तमानपत्र नेहमीच कार्यरत असेल. पत्रकार संघाचे असंख्य सदस्य महाराष्ट्रात सध्या सामाजिक व विधायक कार्य करीत असून जनलोक वार्ता साप्ताहिक वर्तमानपत्रा द्वारे आपापल्या विभागातील समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करतात व प्रशासनास जनलोक वार्ता वर्तमानपत्रा द्वारे नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून देतात. पत्रकार संघाचे असंख्य सदस्य महाराष्ट्रभर असून नुसते सदस्य असून उपयोग नाही, त्यासाठी कुशल संघटन निर्माण करून महाराष्ट्रभर जनलोक वार्ता वर्तमानपत्र प्रकाशित होणे आवश्यक आहे. त्यासाठीच जनलोक वार्ता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. समितीवरील सर्व समिती सदस्यांचे महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करून जनलोक वार्ता प्रत्येक ग्रामीण भागात प्रकाशित करण्याचे काम जनलोक वार्ता समिती अध्यक्ष / उपाध्यक्ष यांचे आहे. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळया नवीन कल्पना , नवीन युक्त्या अंमलात आणून काम करणे आवश्यक आहे. अध्यक्ष / उपाध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर असणाऱ्या पदाधिकारी यांच्याशी रोज संपर्क साधून पत्रकार संघाचे सदस्य वाढविण्यासाठी व ग्रामीण विभागात जनलोक वार्ता वर्तमानपत्राचे प्रकाशन करणे आवश्यक आहे, आणि ते करतील असा विश्वास महाराष्ट्रातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना आहे. दरम्यान अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची निवड करण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 


या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका संपर्कप्रमुख तुकाराम शेळके, इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष व जनलोक वार्ता वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक - गणेश वाघ, वृत्तसंपादक बाळासाहेब जगताप, यांनी केले होते. संस्थापक / अध्यक्ष राजू शिंगाडे यांचा सत्कार गणेश वाघ, संतोष शिंदे  यांनी केला. जनलोक वार्ता समिती अध्यक्ष - इस्माईल तांबोळी यांचा सत्कार तुकाराम शेळके यांनी केला. उपाध्यक्ष मुस्तफा चाबरू यांचा सत्कार संतोष शिंदे,  यांनी केला. तसेच पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सलवदे, तुकाराम सावंत , जनलोक वार्ता राजगुरुनगर आवृत्तीचे संपादक व खेड तालुकाप्रमुख लतीफ शेख  , पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष - उत्तम खेसे , खेड तालुक्याचे दत्ता भगत  ( जाहिरात संपादक ) , गणेश जाधव या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी  इंदापूर तालुक्यातील अनेक सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश वाघ यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतीफ शेख यांनी केले. शेवटी  तुकाराम शेळके यांनी सर्वांचे मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात