आव्हाट येथे आर्थिक साक्षरता अभियान संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / विकास शिंदे
खेड दि १६. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक आणी कौटुंबिक उदिष्टये उत्तम प्रकारे पुर्ण करण्यासाठी आर्थिक बाबींविषयी ज्ञान व कौशल्ये असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय .
वैयक्तीक आर्थिक व्यवस्थापन अंदाजपत्रक आणी गुंतवणुक यासह विविध आर्थिक कौशल्ये समजुन घेण्याची आणी प्रभावीपणे वापरण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय .
खेड तालुक्यातील आव्हाट ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक ( नाबार्ड ) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित पुणे शाखा वाडा आणी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता अभियान घेण्यात आले .
वाडा शाखेचे ब्रॅच मॅनेजर श्री सुदाम केदारी ;विकास अधिकारी श्री रघुनाथ मुळुक ; एफ एल सी तालुका समन्वयक अधिकारी श्रीमती फदाले मॅडम ;श्री सुरज सुर्यवंशी ;श्री अमोल विरणक यांनी उपस्थित राहून ; बॅकेच्या योजना ;कर्ज ;बचत खाते ;मुदत ठेवी ;विमा ;एटीएम सुविधा आणी बँकेचे ध्येय याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले .
सोसायटीचे चेअरमन शिवाजीशेठ वाळुंज ;श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री दत्ताशेठ वाळुंज ;माजी सरपंच हरिभाऊ तळपे ;नामदेव वाळुंज यांच्या हस्ते बॅक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणी दत्ताशेठ वाळुंज यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा