सावली फाउंडेशन व हाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'भूक' हा उपक्रम ; दररोज मिळणार १००० गरीबांना मोफत जेवण
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / प्राजक्ता पाटील
पुणे : दि. २४, पुणे शहरातील विविध भागांमध्ये आढळणाऱ्या भटक्या जमाती कुटुंब व निवारा नसल्याने रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांसाठी पत्रकार प्राजक्ता पाटील यांच्या सावली फाउंडेशन व हाऊ फाउंडेशन मार्फत रोज १००० गरीब नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था आज पासून करण्यात आली आहे. या उपक्रमास त्यांनी ' भूक ' हे नाव दिलेले आहे. हा उपक्रम जनलोक वार्ताच्या प्रतिनिधी प्राजक्ता पाटील या स्वतः राबवित आहेत.
आज पासून या उपक्रमास त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन व ससून रुग्णालया बाहेरील गोरगरीबांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ' भूक ' या उपक्रमाची सुरुवात केली. शासन आपल्या पद्धतीने गोरगरीब लोकांसाठी व्यवस्था करतेच पण, आपणही समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्राजक्ता पाटील यांनी सामाजिक कार्य करण्याचे ठरविले. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम त्या राबवित असून या अगोदरही त्यांनी ' स्वच्छ पुणे सुंदर पुणे ' या उपक्रमांतर्गत हडपसर भागामध्ये साफसफाई चे काम केलेले आहे. एका व्यक्तीकडून भटक्या रस्त्यावरील गोरगरिबांसाठी राबवला जाणारा पुणे शहरातील बहुदा हा पहिलाच उपक्रम असेल.
पुणे शहरामध्ये अनेक दानशूर रोज गोरगरीब लोकांना अन्नदान करतात. परंतु ते श्रीमंत उद्योगपती असल्यामुळे त्यांना ते सहज आणि सोपे जाते. मात्र एक सामान्य युवती प्राजक्ता पाटील ज्यावेळेस अशा प्रकारचा उपक्रम राबवते त्यावेळेस खरंच त्यांचे म्हणावे तेवढे कौतुक करणे थोडेच आहे.
समाजामध्ये आपल्या आसपास अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना दोन वेळेचे अन्न देखील भेटत नाही. कधी कधी उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर येते. महागाईने चांगले कमावणाऱ्या लोकांना देखील महिन्याचे कुटुंबासाठी राशन भरणे देखील अवघड होऊन बसलेले आहे. आणि महागाईची ही झळ या गरिबांना का नाही लागणार..? म्हणून याच विचाराने सावली फाउंडेशन व हाऊ फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ' भूक ' हा उपक्रम राबवला जात आहे. याची सुरुवात दिनांक २४/ ०९ / २०२२ ला प्राजक्ता पाटील यांनी केली. आज पुणे स्टेशन परिसरात, ससून मधील गरीब पेशंट, रस्त्यावरील गरीब लोकांना, भिकारी अशा एक हजाराहून अधिक लोकांना अन्न वाटप केले. कोणी उपाशीपोटी राहू नये या एकमेव विचाराने हा उपक्रम पुणे शहरात ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत तिथे राबवला जातोय. प्राजक्ता पाटील यांच्या ' भूक ' या उपक्रमास जनलोक वार्ताचा सलाम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा