खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ यांच्या वतीने राजगुरू रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / उत्तम खेसे
खेड, दि. १८, खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराचे आयोजन करून खेड तालुक्यासह जिल्ह्यातील एकूण 166 पुरस्कारांचे वितरण खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे ,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ कार्याध्यक्ष मधुकर नाईक, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड,केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर व राजगुरू क्रीडा रत्न पुरस्कार लतीफ शेख यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे ,माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे, नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, पुणे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, विद्या समिती सचिव रिठे, अध्यक्ष वागदरे, तसेच पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, व विविध विषयाचे अध्यक्ष, व पुरस्कारार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणात रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी कोकणे यांनी आपल्या मनोगता मध्ये खेड तालुका हा माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांकाचा आहे तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाचे कौतुक करताना सेवकापासून तर मुख्याध्यापकापर्यंत तसेच स्वयं अर्थसहाय्य शाळेतील कर्मचारी तसेच इंग्रजी माध्यमातील शिक्षकांनाही पुरस्कार देणारे ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे, असे गौरव उद्गार काढले.
माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी भविष्यात शिक्षकासमोरील आव्हाने याबाबत मौलिक विचार व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी संघटनेचे कौतुक करताना शिक्षकाबद्दल गौरव उद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अनुदानित व बिगर अनुदानित शाळेविषयी विचार व्यक्त केले . या सत्कार समारंभाच्या सोहळा संपन्न करण्यासाठी खेड तालुका मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक परिषद,व शिक्षकेतर संघटना व विविध विषय संघटना यांच्या प्रतिनिधीने मौलिक सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष मधुकरराव नाईक व सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे व शोभा भोंगाळे तसेच आभार प्रदर्शन उत्तमराव पोटवडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा