दहा दिवसापूर्वी गोंडस बाळाला जन्म देऊन ती आज जग सोडून गेली ; बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार शितल जगताप ( गलांडे ) यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


प्रतिनिधी  / योगेश रांजणे



बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या उमद्या महिला पोलीस अंमलदार शितल जगताप ( गलांडे ) यांचे आकस्मित निधन. बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शितल जगताप (गलांडे). यांचे त्या प्रसूती रजेवर गेल्यानंतर प्रसूतीनंतर त्यांना डेंगू आजाराची लागण झाल्याने त्यांचे आज पहाटे केईम रुग्णालय पुणे येथे निधन झाले. शितल गलांडे बारामती शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने कामकाज पाहत असे, व पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे अकाली निधन होणे पोलीस दलासाठी न भरून निघणारी उणीव आहे. त्यांची वेळोवेळी उणीव भासेल असे मत व्यक्त करत बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दल व बारामती शहर पोलीस ठाणे सहभागी आहे. तसेच त्यांच्या पाठीमागे पती एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. महिला पोलिस कर्मचारी शीतल जगताप यांच्या निधनामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, 

अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व संपूर्ण बारामती शहर पोलीस ठाणे यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा अंत्यविधी शासकीय ईतमामात पणदरे या ठिकाणी सकाळी दहा वाजता होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात