खरपुडी येथील साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक विष्णू काळे, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

                                    

प्रतिनिधी  / लतीफ शेख



श्रीवर्धन : रायगड येथे झालेल्या अविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर तसेच अविष्कार फाउंडेशन शाखा- रायगड जिल्हा च्या  वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार साने गुरुजी विद्यालय खरपुडी बु ता.खेड येथील उपशिक्षक  काळे विष्णू ज्ञानू यांना दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला. सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत  प्रयत्नशील असलेले व्यक्तिमत्व, आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. सदर कार्यक्रम   रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार  आदितीताई  तटकरे, आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पवार, रायगड जिल्हाध्यक्ष मा.संदीपजी नागे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी पाटील अविष्कार फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी कंठाळे सर यांच्या उपस्थितीत पार पडला. या संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विभागातील लोकांसाठी कार्याची दखल घेऊन दरवर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रामध्ये देदीप्यमान यश मिळाल्याबद्दल पुरस्कार दिला जातो. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  काळे विष्णू ज्ञानू यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब चौधरी पाटील व त्याचे सर्व पदाधिकारी मा.निलेश सुपेकर,  मा. मनोहर खंडागळे. साने गुरुजी विद्यालयातील सर्व स्टाफ यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात