दावडी विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / विजय कानवडे



खेड: रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी या ठिकाणी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य  अंकुश केंगारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक महादेव आगम उपस्थित होते .विद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीम. आशा बेडेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन  केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झालं तद नंतर विद्यालयातील विद्यार्थिनी कु. दीक्षा शिंदे हिने डॉ. कलामांच्या जीवनकार्याची माहिती दिली. सर्वात शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश केंगारे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत पुस्तक वाचनाची प्रेरणा घेण्याचं आवाहन केले. कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा संकल्प केला सूत्रसंचालन सौ वंदना गावडे यांनी केले तर आभार विलास बरबटे यांनी मानले कार्यक्रमानिमित्त सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात