शिरूर तालुक्यात फटाक्याच्या दुकानाच्या परिसरात फटाके उडविण्यावर बंदी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पुणे दि. १९:  उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांनी शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे व  कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्याचे आदेशीत केले आहे. 


शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी (पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीसाठी लागू राहतील.


प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा  १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात