नेपाळ काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार अध्यापक अशोक ठाणगे यांना जाहीर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / लतिफ शेख

 खेड : नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक  अशोक ठाणगे  यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



यापूर्वी त्यांना गोवा  येथे भाषारत्न पुरस्कार व खेड तालुका मुख्याधापाक संघ यांच्या  वतीने ही आदर्श हिंदी शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यासाठी खराबवाडी शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष  प्रकाश खराबी सचिव गोरक्षनाथ कड  सर्व विश्वस्त संचालक मुख्याध्यापक अविनाश कड  व सर्व अध्यापक बंधू भगिनींनी व कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा, भारत सरकार व नेपाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू (नेपाळ) येथे 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणा-या हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलन 2022 च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक  अशोक ठाणगे   यांची केंद्रीय समितीने निवड केली असून त्यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात