इस्लामपूरमधे दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास अखेर इस्लामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / अमोल जाधव



इस्लामपूर : शहरात दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस इस्लामपूर पोलिसांनी सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या.लोटस सोनोग्राफी सेंटर या ठिकाणहून दुचाकी चोरीस गेली होती, पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून आरोपी वैजनाथ बसवंत चव्हाण वय 30 रा.बन्की ता. खानापूर जि. बेळगाव यास पोलिसांनी अटक केली, त्याचाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने इस्लामपूर पोलीस हद्दीतून एक दुचाकी व बेळगांव बस स्टॅन्ड मधून एक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.त्याच्याकडून दोन दुचाकी असे एकूण 60000रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाचे पोलीस कोठडी रिमांड मिळाले आहे.


दीक्षित गेडाम पोलीस अधीक्षक सांगली,मनीषा दुबले अपर पोलीस अधीक्षक यांनी वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहून कारवाई करण्याचे आदेश इस्लामपूर पोलिसांना दिले होते.

या कारवाई मधे पद्मा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी विटा चार्ज इस्लामपूर,शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक इस्लामपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील शाखेतील सपोनी प्रवीण साळुंखे, सपोफो जयपाल कांबळे, उत्तम माळी, गणेश शेळके,सुरज जगदाळे, उमेश शेटे या पथकाने कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात