दावडी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; आदर्श सरपंच संभाजी घारे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी -उत्तम खेसे
दावडी खेड : दावडी बागायतदार, ऐतिहासिक, आरोग्य सुविधा युक्त गाव आहे. सामाजिक, शैक्षणिक दृष्टया पुढारलेले गाव असल्यामुळे दावडी गावाची खेड तालुक्यात वेगळी ओळख आहे. ५५०० ते ६००० हजार मतदार असलेले दावडी गाव. दावडी गावामध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत संभाजी घारे निर्विवाद सरपंच झाले. त्यांनी शासकीय सार्वजनिक कामाची, कार्याची ग्रामपंचायत दावडी मार्फत अनेक कामे पुर्ण करून अनेक कामे मंजूर करून आणली. कोरोना काळात कोव्हीड होऊ नये म्हणून मार्गदर्शन आरोग्य कँम्प, प्रतिबंधक लस कँम्प घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून दावडी तसेच पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेऊन जनतेची सेवा केली आणि करतात. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा गावातील विजेचा प्रश्न असो त्यांनी कधीही या कामात दिरंगाई केली नाही. पाणीपुरवठा सुरळीत केला . सार्वजनिक रस्त्याची दुरुस्ती करताना गटार लाईन मजबुत केली. शेतकरी , कष्टकरी सामान्य माणसाची किरकोळ कामे देखील त्यांनी केली. सर्वांसाठी मदतीला धावून जाणारे हे सरपंच आहे. अशी गावात व तालुक्यात त्यांची ख्याती आहे. सरकारी दरबारी त्यांच्या कार्याची दखल घेऊन संजय भोराडे पुणे एसीपी आणि ज्ञानेश्वरी पाटील पीएसआय पुणे यांच्या शुभहस्ते आदर्श सरपंच दावडी संभाजी रामराव घारे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला. या वेळेस विद्यमान सरपंच राणीताई सुरेश डुंबरे, उपसरपंच अनिल नेटके, ग्रा.पं. सदस्य माधुरीताई हिरामण खेसे, पुष्पाताई रमेश होरे, धनश्रीताई कान्हूरकर व दावडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा