'देश के सच्चे हिरो' संस्थेच्या वतीने पिंपरीत स्वच्छता विषयी जनजागृती अभियान

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


निगडी, दि. ०९, (प्रतिनिधी) :  'देश के सच्चे हिरो' संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिंपरीच्या आंबेडकर चौकात स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान राबविण्यात आले.



शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध योजना राबविल्या जात आहेत. तरीदेखील काही भागात घाणीचे साम्राज्य अजूनही दिसून येत आहे. मागील दोनच दिवसांपूर्वी पवना नदी पात्रात रसायनयुक्त पाण्याने नदी फेसाळल्याचे वृत्त जनलोक वार्ता  ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपण याबाबत जनजागृती करून आपण संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे जनलोक वार्ताच्या प्रतिनीधींना कळविले.

त्या अनुषंगाने आज पिंपरी जनजागृती मोहीम राबविण्यात आले. यावेळी परिसरात घाण , कचरा टाकणाऱ्यांना 'दणाका द्या दंडाचा' असा नारा देण्यात आला. याशिवाय 'स्वच्छ भारत सुंदर भारत' , 'प्लास्टिक हटाव देश बचाव ',  'कचरा फेंकनेवालों पर दंड लागाओ' अशा घोषणा देण्यात आल्या.

या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता संदेश देत संपूर्ण भारत प्रवास केलेले आहेत. त्यांना मिळत असलेल्या पेन्शन मधील एक तृतीयांश भाग हे स्वच्छता मोहीमेसाठी खर्च करत असतात. वयाच्या ७३ व्या वर्षी देखील ते न थकता देश हिताचं काम करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कित्येक वेळा त्यांच्या भाषणात चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करताना पहायला मिळाले आहे.

दरम्यान यावेळी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले,  "शहरात जलप्रदूषण, वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदी नाल्यात कचरा आणि रसायनयुक्त पदार्थ टाकणाऱ्यांमुळे आज जलप्रदूषण वाढत आहे. नद्यांमधील जलचर प्राण्यांची संख्या फारच कमी होत आहे. त्यामुळे या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने वेळीच सावध होऊन कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे."

दरम्यान या कार्यक्रमाच्या वेळी या संस्थेचे चंद्रप्रकाश शर्मा, सिकंदर घोडके, विजय पाटील, दिनेश अगरवाल, भरत राठोड, दत्ता अवसरकर , मुरली चारी , गोपाल बेगल यांच्या समावेत संस्थेचे आदी सभासद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात