वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार - मंत्री उदय सामंत

पुणे (प्रतिनिधी), दि. १९ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अश्विनी जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारसदस्य जयकुमार गोरेभीमराव तापकीर यांनी भाग घेतला.

मंत्री सामंत म्हणालेवाल्हेकरवाडी येथे ७९२ सदनिकांचा गृह प्रकल्प करण्यात येत आहे. यामध्ये वन रूम किचन सदनिका ३७८, 'वन बीएचके सदनिका ४१४ आहेत. गृह प्रकल्पात पाणीवीजेची व्यवस्था करण्यात आली आहे. या गृह प्रकल्पात दुसरी लॉटरी २४ जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. हे काम २०१९ अखेरीस पूर्ण करणे आवश्यक होते. याबाबत कंपनीला १ कोटी ६० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये कंपनीला ५८ लाख रुपये सूट देण्यात येवून १ कोटी १० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई शासन नियमानुसार करण्यात आली. या प्रकल्पात नियमबाह्य काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरुवातीलाच ८ ते १० महिने उशिरा सुरू झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात