अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



खेड ( प्रतिनिधी संतोष गाडेकर ) : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने आयोजित भव्य वधुवर पालक परिचय मेळावा गणेश कला क्रीडा मंच नेहरू स्टेडियम स्वारगेट पुणे येथे दिनांक १६ जानेवारी  २०२४

वार मंगळवार रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत होत असून हे वर्षे १९ वे आहे. अशी माहिती मिळाली. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाची स्थापना संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव यांनी केली असुन गेली १९ वर्षे अविरत पणे सामाजिक कार्य करत असुन याही वर्षी  प्रदेशध्याक्ष हनुमंतराव पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे औचित्य साधून समाज एकत्रीत यावं हेच ध्येय ठेवून सामाजिक, मेडिकल, शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच समाज उपयोगी असे अनेक उपक्रम होत असतात.  ह्या वर्षी  ४०००-४५०० हजार मेळाव्यास समाज बांधव उपस्थित रहाणार आहेत. आपण  सह परिवार या राज्य स्तरीय वधु वर पालक परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे.  पुणे शहर महिला अध्यक्ष सौ. रेश्माताई नितीन केदारी यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी संपर्क प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ मो नं ९८२२३५५६८२, प्र. कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड मो. ९९२१६०३१०४, पुणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र किसन रायकर मो. ९८९०६७१९३८, महिला अध्यक्ष पुणे जिल्हा सौ. गायत्रीताई क्षिरसागर मो. ९८८१३२५७७१, कार्यालय संपर्क प्रमुख भरत भालेराव

मो. ९८२२६११५६५, सोशल मीडिया संपर्क प्रमुख  विरेंद्र बाळासाहेब भालेराव मो. ८८३०१२०२९८, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गाडेकर सर (पत्रकार) मो नं ९२७३४९११५३

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात