शिराळा नगरपंचायत मार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


प्रतिनिधी - विशाल खुर्द



शिराळा दि.९, केंद्र व राज्य शासानाच्या महत्वकांक्षी योजना नागरीकांपर्यंत पोहोचाव्यात आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरीकांना या योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनामार्फत विकसित “ भारत संकल्प यात्रा ” ही देशव्यापी मोहिम राबविण्यात येत असून शिराळा शहरामध्ये दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री शिव छत्रपती विद्यालय, शिराळा  येथे संकल्प यात्रेचा रथाचे स्वागत व  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत), प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार अपडेट, आरोग्य शिबीर ,प्रधानमंत्री उज्वला योजना यांचे अनावरण मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.नितीन गाढवे, माजी नगरसेवक अभिजीत नाईक, उत्तम डांगे, श्रेयस महाजन , शालेय मुख्याध्यापक व  शिक्षक, नगरपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते करणेत आले. तदनंतर मान्यवरांचा सत्कार करणेत येवून सदगुरु आश्रम शाळा व कन्या शाळा शिराळा च्या विद्यार्थींनी “ धरती कहे पुकार के ” या गाण्यावर नृत्य सादर केले करुन शिराळा नगरपंचायत मार्फत महिला व बालकल्याण निधीतून प्रशिक्षण देणेत आलेल्या विद्यार्थ्यींनीचे कराटे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. श्रेयस महाजन यांनी त्यांचा मनोगतामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती नागरीकांना सांगितली. शिराळा नगरपंचायत मार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे काम नगरपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत करुन जास्तीत जास्त नागरीकांना लाभ देण्याचे आश्वासन   मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये दिले.  यावेळी अभिजीत नाईक , पृथ्वीसिंग नाईक  ,सुनिता निकम, प्रतिभा पवार, उत्तम डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजमाने, राजसिंह पाटील, एस.एम.पाटील, संतोष गायकवाड, आकाशवाणी सांगली प्रसारण अधिकारी डॉ.दिपक ठमके, डॉ.अनिकेत झाडे,पत्रकार सुभाष कदम, सर्व शालेय मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, शहरातील प्रतिशिष्ठ नागरीक, नगरपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अधिक्षक सुविधा पाटील यांनी केले. आभार प्रकाश शिंदे यांनी करुन कार्यक्रम संपन्न झाल्याचे घोषित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात