राजगुरुनगर शहरांमध्ये निरामय नेत्रालय तृतीय वर्धापन दिन उत्साही वातावरणात संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी दत्ता भगत 

खेड दि.११, राजगुरूनगर येथे सर्वोत्तम नेत्रसेवा पुरवित असतानाच समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण आरोग्याकरिता आत्मियतेने झटणाऱ्या निरामय नेत्रालयाचा तृतीय वर्धापन दिवस नुकताच साजरा केला गेला. त्या निमित्ताने गिर्यारोहण विषयक दोन व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं.



शिवछत्रपती राज्य साहसी हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्राप्तएव्हरेस्टवीर  जितेंद्र गवारे Maha Adventure Council (MAC) ह्या साहसी क्रीडाप्रकारांशी संलग्न असणाऱ्या राज्यपातळीवरील संस्थेचे डायरेक्टर

श्री ओंकार ओक या व्याख्यात्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दि. ७ जानेवारी २०२४ रोजी

ओकेजन बॅंक्वेट येथे साजरा झालेल्या या कार्यक्रमास गिर्यारोहणप्रेमी व निरामयच्या रूग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. किल्ले कसे पाहावेत या विषयावर मार्गदर्शन करताना  ओंकार ओक यांनी किल्ल्यांच्या विविधतेचे अनेक पैलू श्रोत्यांना उलगडून दाखविले.  जितेंद्र गवारे आपल्या एव्हरेस्ट मोहिमेचा अनुभव विषद करताना श्रोते भारावून गेले होते.

निरामय नेत्रालयाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बोलताना नेत्रालयाच्या संचालिका डॉ. शीतल ढवळे खिसमतराव यांनी राजगुरूनगर येथे नेत्रसेवेतील उत्तमोत्तम तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध करून देण्याचा मानस बोलून दाखविला. दर वर्षी एक नवीन आधुनिक उपकरण निरामययेथे उपलब्ध करून देण्याच्या प्रथेप्रमाणे या वर्षी देखील नेत्रपटलाच्या अभ्यासाकरिता लागणारे ‘फंडस कॅमेरा’ हे उपकरण रुग्णांकरिता उपलब्ध करून घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या नविन तंत्रज्ञानामुळे रूग्णांना पुण्यासारख्या मोठ्या शहरात जावे न लागता इथेच बसून नेत्रपटल तज्ञांकडून निदान करून घेता येणार असल्याचे डॉ. शीतल यांनी नमूद केले.

या प्रसंगी ‘निरामय’च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर दिनदर्शिकेत योगासनांचे महत्व विषद करण्यामध्ये मोलाची मदत करणाऱ्या  विवेक पाटील यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या समयी खेड तालुक्यातील अनेक मान्यवर डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आभा खिसमतराव व कु. पूर्वा चव्हाण यांनी केले. नेत्रालयाचे संचालक प्रतीक खिसमतराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात