पोस्ट्स

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २५ ऑगस्टपासून वरंधा घाट खुला

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. 23:  स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच उप विभागीय अधिकारी भोर यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहे. भारतीय हवामान खाते यांनी अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या लाल आणि नारंगी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने भोर-महाड  मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत  बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. आता भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आले नसल्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निसर्ग सेवा फाउंडेशन तर्फे अक्कलकोट शहरात स्वच्छता मोहीम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  अक्कलकोट दि .२१, अक्कलकोट येथे निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आला. बस डेपो परिसरा लगत असलेल्या फुटपाथ वरील संपूर्ण काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली. यामुळे फुटपाथ मोकळी होऊन श्री तिर्थ क्षेत्र नगरीचे झालेले विद्रोपीकरण दूर करण्यात आले . तसेच मादचारी मार्गावर अस्वच्छता, सर्वत्र दुर्गंधी यामुळे नागरिकांना व स्वामी भक्तांना येता जाता त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेऊन सदर परिसर स्वच्छ करण्यात आले. यामुळे फुटपाथ वर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बालकांना चालत जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. या प्रसंगी सर्व स्वयंसेवक मोठ्ठ्या प्रमाणात उपस्थित होते.                           यानंतर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले. सद्या हिंदूंचा पवित्र समजला जाणारा श्रावण महिना असल्याने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. भाविकांना स्वच्छ,सुंदर व प्रसन्न वातावरण राहावे त्या दृष्टीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले होते. निसर्ग सेवा फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमचे  भाविकांनी समाधान व्यक्त करून कौतुक करुन शुभेच्

पुणे शहरात रविवारी 'माझी माती माझा देश' उपक्रमाची सांगता

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.  केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' हे अभियान पुणे शहरात मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने  हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

चिंचवड येथे 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमाचे २२ ऑगस्ट रोजी आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी'  या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अभियानाचे अध्यक्ष आणि राज्यस्तरीय समितीचे मुख्य मार्गदर्शक   ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंगळवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी विविध विभागांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगाची नाव नोंदणी, मार्गदर्शन, योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आदीबाबत संवादही साधण्यात येणार आहे. पुणे  व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

सहा महिन्यात ईरशाळवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १५ : इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी  डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला...  दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे  सायंकाळी चारच्या सुमारास इर्शाळवाडीवासियांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केलेल्या ठिकाणी आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.  गेल्या महिन्यात २० जुलैला इर्शाळवाडी दुर्घटना झाली होती. त्यातून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण ; आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य  आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.             भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.             ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आं

बाप रे....! सिध्देश्वर एक्स्प्रेस मध्ये महिलेच्या पर्समधून तब्बल इतक्या किंमतीचे दागिने चोरट्यांनी केला लंपास

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई दि. १५, सिध्देश्वर एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. दि.९  ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. याबाबत संगीता राजाराम ठाकूर (रा. सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसह दि. ९ आॅगस्ट रोजी कल्याण ते मुंबई बोगी नं. ए ०३ सीट क्र १९, २१ वरुन प्रवास करत हाेते. फिर्यादीस मोहोळ येथे जाग आली असता, फिर्यादीने डोक्याखाली घेतलेली पर्स दिसून आली नाही. त्यांनी लागलीच पतीला उठवून पर्सचा शोध घेत पर्समध्ये ठेवलेल्या मोबाइलवर फोन केला असता मोबाइलचा आवाज आला. त्यानुसार शोध घेतला असता बर्थखाली पर्स सापडली. पर्समधील मोबाइल मिळाला. मात्र त्यामध्ये ठेवलेले १ लाख ६४ हजार ४९९ रुपयांचे २५.६६० ग्रॅम मंगळसूत्र, ३१ हजार ४८५ रुपयांची ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ३७ हजार ६५४ रुपयांची ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकूण २ लाख ३३ हजार ५३८ रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता.

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा ; देशातील सर्व नागरिकांच्या एकजुटीतून स्वातंत्र्य आणि लोकशाही भक्कम करुया --उपमुख्यमंत्री अजित पवार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. 14 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय सेवेबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला  राष्ट्रपती पदक, सेवापदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाच्या अधिकारी व जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, देशाला मिळालेले स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या 76 वर्षात भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी बलिदान दिले. या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्

महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ ; पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय  कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या  कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.             ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट  सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023 साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.             शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’  आणि एका  जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.             उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय  सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिर

महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर ; 3 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 14 : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात.  राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली.  यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.  ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 76 पोलिसांना समावेश आहे. 

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते वन देवी उद्यान कोथरुड येथे वृक्षारोपण ; युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करावी-श्रीकांत देशपांडे

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १४: युवकांनी वृक्षारोपण करून वनसंपदा जतन करण्यासोबतच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा,  असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, विल्लो पूनावाला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ममोज पांडा यांच्या सहकार्याने वन देवी उद्यान कोथरूड येथे आयोजित वृक्षारोपण मोहिमेत श्री. देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, २१० कोथरूड विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी अंजली कुलकर्णी, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे, ममोज पांडाचे संचालक यश पावले, निवडणूक साक्षरता क्लब पुणे विभागाचे समन्वयक सूरज शिराळे, नेहा गवळी, आशिष जगनाडे, राज चव्हाण आदी उपस्थित होते.  श्री. देशपांडे म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. देशाचे भवितव्य हे युवांच्या हाती आहे. पुण्यात युवा मतदारांची संख्या कमी आहे. युवा पिढीने वृक्षारोपण, नदी सवर्धन यासारख्या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्या

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीची नोटीस ; कारण अस्पष्ट

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. १३, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे. जयसिंगराव पाटील हे मुंबईतील मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत. दरम्यान जयंत पाटील यांच्या आणखी काही निकटवर्तीयांना देखील ईडीकडून नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांना देखील एका प्रकरणात ईडीकडून नोटीस आली होती. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कारण अस्पष्ट - जयसिंग पाटीलांचा मुंबईमध्ये हॉटेलचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही नोटीस नेमकी कोणत्या प्रकरणात पाठवण्यात आली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.

शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह,महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, टाटा प्रोजेक्ट्स कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती द

एनडीए चौकातील रस्ते विकास प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण ; पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार-नितीन गडकरी

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१२: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी  पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले,  येणाऱ्या काळात पुणे हे देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे, पुणे अनेकांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक वेगाने विकसित होणारं शहरही पुणेच आहे. चोवीस तास पाणी आणि उत्तम रस्ते पुण्यासाठी आवश्यक आहेत. भारत सरकारच्यावतीने नि

सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीना १३ लाख ५० हजारांचा दंड ; बीडीओंना नोटीसा जारी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीना १३ लाख ५० हजारांचा विभागीय आयूक्त कार्यालयाकडून दंड ठोठविण्यात आला आहे. दंडवसूली संदर्भात ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चीत करण्यात आली असून बीडीओंना कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.  याबाबत मिळालेल्या माहीती नुसार स्थानिक लेख परिक्षण विधीत कालावधी मध्ये पूर्ण केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चपळगाववाडी ,भोगाव ,गुळसडी ,देलवडी ,बोळकवठा ,पिंपळगाव (धस) पिंपळगाव पान , उपळाई खुर्द, टाकळी टेंभूर्णी ,कोळेगाव ,मेथवडे , घुंगरेगाव ,मलवंडी ,शिरापूर मोहोळ , हातीज , पाडळी , तिन्हे ,मुंगशी आर , निमगाव (ह) रामवाडी ,मांगी, धोत्री , कुडल , कोर्सेगाव, रामपूर (इ ) ,आष्टी , घारी ,सांगवी , चुंगी, लव्हे , धर्मगाव, बोरेगाव , वाघोली, चळे, रानमसले , बुरंगेवाडी , दिंडूर , टेंभूर्णी , वरवडे , वाफळे , मालेगाव (आर ), वटवटे , हिसरे, अळसुंदे , रुई ,कळंबवाडी , रास्तापूर ,मालेगाव ,श्रीपतपिंपरी शेंडगेवाडी, रेवेवाडी , कासेगाव, सूपली ,आशी प्रत्येकी २५ हजार रूपयांचा दंड ठोठविण्यात आल्याची माहीती ग्रामपंचायात विभागाने दिली आहे. वेळेत दंड नाही भरल

जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 10: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.   या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे, नोकरीविषयक वेतन, भत्ते, निवृत्तीबाबतचे लाभ तसेच जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली महसूलविषयक प्रकरणे, तसेच अन्य दिवाणी प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व महानगरपालिका, नगरपरिषदा यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत.             लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना नि

स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ ; १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    पुणे दि.१०: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवार १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी ८ वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम  यांनी कळविले आहे.

महाज्योती तर्फे पीएचडी संशोधकांना २४ कोटी रुपयांची अधिछात्रवृत्ती वितरीत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    पुणे, दि. १० :  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी  सन २०२१ मध्ये निवड झालेल्या ६४८ विद्यार्थ्यांना आणि सन २०२२ मध्ये निवड झालेल्या १ हजार २३६ विद्यार्थ्यांना एकूण २४ कोटी १७ लाख ८७ हजार ७४९ रुपये इतकी इतकी अधिछात्रवृत्ती वितरित करण्यात आल्याची माहिती महाज्योतीने दिली आहे.  लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे, त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा विकास व्हावा या हेतूने महाज्योतीतर्फे पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती सोबत  घारभाडे व आकस्मिक निधी देखील देण्यात येतो. अधिछात्रवृत्तीमुळे निश्चिंत होऊन संशोधनाचे  कार्य करता येत असून संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ खरेदी, अहवाल तयार करण्यासाठी प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात.  मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांन

‘माझी माती माझा देश’ विभागीय माहिती कार्यालयात पंचप्रण शपथ

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                पुणे, दि.०९: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित 'माझी माती माझा देश' (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत  विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली. *पंचप्रण शपथ*             'आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.'                              या उपक्रमात सहायक संचालक (माहिती) जयंत कर्पे तसेच विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले.

‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. 9 : “देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या 'आझादी का अमृत महोत्सव' सांगतेच्या निमित्ताने 'मेरी माटी-मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, आमदार मनीषा कायंदे, आमदार

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. ९ : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली वाहिली.   यावेळी आमदार कपिल पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार उल्हास पवार,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.   श्री. भुजबळ म्हणाले, हरी नरके हे समाजासाठी वैचारिक आधारस्तंभ होते.  त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, इतिहास अतिशय बारकाईने अभ्यास करुन समाजासमोर आणले.  सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले नायगाव येथे त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनुसार तत्कालिन दिसणाऱ्या घराची राज्य शासनाने बांधणी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथाचे आज हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. देश विदेशात त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी भाषणे केली. त्यांच्या  निधनाने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दा

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने ७ ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ५:  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री. ९ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.  *जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक:* सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिवसृष्टीला भेट ;विद्यार्थ्यांचे संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिवसृष्टीला भेट द्या-सांस्कृतिक कार्य मंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.५: छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेऊन त्याचे संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आणावे आणि या शिवकार्यात आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  मुनगंटीवार यांनी आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट दिली. यावेळी शिक्षण संस्था व शिक्षण मंडळ प्रमुखांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अनिल पवार उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले, एकविसाव्या शतकात वैचारिक प्रदूषणाचा धोका वाढला असताना आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन करणारा शिवरायांचा विचार समाजासमोर मांडणे गरजेचे आहे. हे कार्य शिवसृष्टीच्या माध्यमातून होत आहे. उत्तम समाज घडविण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करीत असताना त्याला संस्काराचा विचार देणे तेवढेच महत्वाचे आहे. शिवरायांच्या विचारावर आधारित समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिवस

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.५: महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य संग्रहालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  नऱ्हे येथील शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. श्री.मुनगंटीवार म्हणाले, शिवसंग्रहालय भव्यदिव्य आणि अत्याधुनिक संकल्पनेवर आधारित व्हावे, त्यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपर्यंतही महाराजांचे कार्य यानिमित्ताने पोहोचेल. महाराजांच्या जीवनाशी निगडित ८८ हजार वस्तू राज्यात विविध ठिकाणी आहेत, त्या एकाच ठिकाणी आणण्याचाही प्रयत्न संग्रहालयाच्या निमित्ताने होणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराज प्रतिबिंबित व्हावे आणि त्यांच्या विचारावर आधारित कृती करण्याची ऊर्जा नागरिकांना मिळावी यासाठ

राज्यात २१ हजार बोगस सीमकार्ड ; पोलिसांच्या कारवाईत समोर आली धक्कादायक आकडेवारी, एका व्यक्तीच्या नावावर इतकेच सीम कार्ड वापरता येते

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ४,  मोबाईलसाठी कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड घेताना दूरसंचार विभागाने काही मर्यादा घातली आहे. यानुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्ड घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास अशा ग्राहकांची सेवा खंडित करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. मात्र असे असतानाही एका व्यक्तीच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल 21 हजार बोगस सिमकार्ड वितरित झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीला आपल्या आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात. पण, हे सर्व सिम फक्त एक व्यक्ती वापरू शकत नाही. त्यामुळे काही जणांनी अनधिकृतपणे अनेक सिमकार्डही घेतली आहेत. मात्र, याबाबत मुख्य आधारकार्ड धारकाला याची माहिती नसते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी चिंचवड च्या वाहतूकीत बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  निगडी दि .४,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि.६) पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ते एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी चिंचवड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत. हे बदल रविवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील तसेच कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत. बदल करण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती खालील प्रमाणे: महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने महावीर चौकातून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील. दर्शन हॉल लिंकरोड येथून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकातून इच्छित स्थळी जातील. रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर चौक अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास बंदी आहे. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ४: गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या कामगारांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नेमणुकीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले. महसूल सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह शाखेचे तहसीलदार धनंजय जाधव, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण आदी उपस्थित होते. देशाच्या, राज्याच्या जडणघडणीमध्ये अर्थव्यवस्थेच्या रुपाने उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्याच्या सकल राज्य उत्पादनामध्ये पुणे जिल्ह्याचा सुमारे १४ ते १५ टक्के वाटा असून यात वाहन उद्योग, उत्पादन उद्योग आदींचे मोठे योगदान आहे. उद्योगांच्या वाढीसाठी पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी गुणवंत कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी काढले. आपल्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे गुणवंत कामगार प

म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 4 :- मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.             सदस्य प्रवीण दरेकर यांनी म्हाडाच्या इमारतींच्या होणाऱ्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्याबाबत तसेच संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने त्यांची घरे मिळण्याकरिता कार्यवाही करण्यासंदर्भातील लक्षवेधी मांडली.             याबाबत अधिक माहिती देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले की, दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) येथील एकूण 44 भाडेकरू / रहिवाशांपैकी 35 भाडेकरूंनी मंडळाकडे कागदपत्रे जमा केली. यापैकी 34 भाडेकरू यांना देकारपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित एक भाडेकरू यांचे नाव सोडतीमध्ये नसल्यामुळे त्यांना देकारपत्र देण्यात आले नाही. 34

पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवण्याची मुदत 96 तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- मंत्री धनंजय मुंडे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई,दि. 4 :  शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली.             राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री श्री. मुंडे बोलत होते.             कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे, इंटरनेटची सुविधा बंद असणे, मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागतो. त्यामुळे 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देण्यास बहुतांश शेतकरी असमर्थ ठरतात. अशावेळी या कालावधीत आणखी काही तासांची वाढ करून  हा कालावधी किमान 96 तास केला जावा, म्हणून केंद्र सरक

ओबीसी शिष्यवृत्तीसह शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनियमितेची तपासणी करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि.4 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या  अनुषंगाने  आढळलेली अनियमितता तपासण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधान परिषदेत सांगितले.             लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रादेशिक उपसंचालक या पदावरील नियुक्ती रद्द करण्याबाबत सदस्य आमश्या पाडवी व सचिन अहीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.             उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या  अनुषंगाने  31 डिसेंबर 2023 पर्यंत याबाबत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.             इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे म्हणाले की, या विभागातील रिक्त पदे भरण्याच्या पार्श्वभूमीवर 19 एप्रिल 2022 रोजी बैठक झाली होती. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच

राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. उद्योग क्षेत्रात मागील एका वर्षात 109 देकार पत्र (ऑफर लेटर) दिले असून एक लाख चार हजार 825 कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर आल्याचे त्यांनी सांगितले.             विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 259 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर तसेच सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर एकत्रित उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.  कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य             कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सुरक्षेबाबतचा दृष्टीकोन हा अधिक महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला सुरक्षित वाटणे महत्त

सशस्त्र पोलीस भरतीसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.४ : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०२१ अंतर्गत तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे समादेशक विनीता साहू यांनी कळविले आहे. उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची २ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी पडताळणी करण्यात आली.  गैरहजर राहिलेल्या ३२ उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येणार असून त्यांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता सर्व मूळ कागदपत्र, सत्यप्रत असलेले छायांकित प्रतीचे दोन संच व छायाचित्रासह उपस्थित रहावे. नियोजित दिवशी वेळेत उपस्थित न राहिल्यास उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई पदाची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन निवड रद्द करण्यात येईल. तसेच या पदाबाबत उमेदवाराचा कोणताही आक्षेप विचारात घेतला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियानांतर्गत ३३ हजार अर्ज प्राप्त

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.४: जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे आयोजित ‘गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियाना’अंतर्गत जिल्ह्यात २० हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. इतर १३ हजार मतदारांकडून नाव वगळणे, तपशीलात दुरुस्ती, मतदार केंद्रातील बदलासाठी अर्ज भरून घेण्यात आले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत हिंजवडी येथे २२ जुलै रोजी या अभियानाचा शुभारंभ  करण्यात आला. २२, २३, २९ आणि ३० जुलै रोजी जिल्ह्यातील एकूण १ हजार १३८ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांना भेट देऊन मतदार नोंदणी केली व नोंदणी प्रक्रियेची माहिती नागरिकांना दिली. जिल्ह्यातील २१ विधासभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १३ हजार ५२६ आणि दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ७६३ असे एकूण २० हजार २८९ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक १ हजार ४९६ मतदारांची नोंदणी करण्यात आल

पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन ; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे गरजू रुग्णांवर उपचार होणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.३: जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यासाठी आणि त्यांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मैदानावर ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिराचे समन्वयक रामेश्वर नाईक, मनपा उपायुक्त महेश पाटील,  विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदी उपस्थित होते. श्रीमती कदम म्हणाल्या, रुग्णसेवेसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने  अधिकाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याची सुविधा करण्यात यावी. लोकसहभागातून शिबिराचे आयोजन होत असल्याने सर्व यंत्रणांनी आयोजनात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. नाईक यांनी महाआरोग्य शिबिराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे अत्याधुनिक आरोग्य सुवि

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली ;मराठी मातीतला 'रानकवी' हरपला

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. ३ :- मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. 'मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,' असेह

महाविद्यालयांनी १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३:जिल्ह्यात १८ ते २९ वर्षे वयोगटातील मतदारांची नोंदणी १२  ते १५ लाखाने कमी असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के मतदार नोंदणीकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंचाच्या (ईएलसी) महाविद्यालय समन्वयक अधिकाऱ्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख पुढे म्हणाले, युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गतवर्षी ३८ महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना करुन चांगले काम करण्यात आले. यावर्षीही विशेष संक्षीप्त पुनरीक्षण मोहीम राबवताना विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांचा चांगला सहभाग अपेक्षित आहे. युवकांची मतदार नोंदणीती

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १: अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात २५ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिमंडळ अधिकारी ब, क, फ, ग, ह, ल, म यांच्या कार्यक्षेत्रातील  २५ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा १ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व  पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी १ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी सिमा होळकर यांनी कळविले आहे.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य अधिकारी आर.विमला यांची हातकागद संस्थेला भेट

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.३: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी  मंडळाच्या पुणे येथील  हातकागद संस्थेला भेट दिली. आर. विमला यांनी हातकागद संस्थेच्या कागद निर्मिती, प्रक्रिया तसेच तयार होणाऱ्या विविध वस्तू, वह्या, पुस्तके, रोजनिशी, फाईल्स, विविध प्रकारचे कागद आदींची पाहणी केली. संस्थेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी काही सुधारणांबाबत मार्गदर्शन केले. मंडळाच्या महाखादी  व मध विक्री केंद्रास भेट देऊन विक्रीबाबत काही सूचनाही दिल्या. संस्थेत हातकागदापासून बनविलेल्या आकर्षक व सुबक अशा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे कौतुक करून गणेश भक्तांनी या मूर्ती विकत घ्याव्यात व पर्यावरण संतुलनास हातभार लावावा, असे अवाहन त्यांनी केले.  महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) तेजस्विनी उत्पादनेअंतर्गत तेजस्विनी कला दालन आणि खाद्य पदार्थाचे विक्री केंद्र बालगंधर्व रंगमंदिराजवळ सुरू केलेले आहे. याठिकाणी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट हस्तकला वस्तू, बॅगा, वस्त्रप्रावरणे, खेळणी, अलंकार, ग्रेटर्स, गृहउपयोगी वस्तु, बांबुच्य

हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.  पुणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात येऊन  हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.       पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे महापारेषण कंपनीने बांधलेले ४०० केव्हीचे सबस्टेशन बंद असल्याबाबतचा प्रश्न सदस्य राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.       उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हे उपकेंद्र बंद नाही. ४०० के. व्ही. सह आणखी सहा अतिउच्चदाब उपकेंद्र बँक चार्ज करण्यात आली आहेत.  यापैकी बहुतांश उपकेंद्र त्यांच्या संलग्न वाहिन्या वनविभागाच्या मंजुरी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. तसेच 66 के.व्ही पेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याच्या व्याप्त जागेचा तसेच अतिउच्च दाब  पारेषण वाहिन्याच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित केले आहे. या सुधारित धोरणानुसार बाधित शेतकरी, जमीनधारकांना वाढीव मोबदला देण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दावडी ग्रामपंचायतच्या वतीने प्राचार्य अंकुश केंगारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क खेड दि. २, ( प्रतिनिधी - उत्तम खेसे) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश केंगारे हे आपल्या नियत वयोमानानुसार 31 जुलै 2023 रोजी सेवानिवृत्त झाले .त्यानिमित्त दावडी ग्रामपंचायत वतीने श्री अंकुश केंगारे यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य अंकुश केंगारे यांनी 34 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा केली. तसेच गेले तीन वर्ष दावडी विद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवा काळामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी बोर्ड निकाल यामध्ये  गुणवत्ता दाखवत उत्तुंग भरारी घेतली. त्यांच्या या कार्यकर्तुत्वाबद्दल दावडी ग्रामपंचायत, पीडीसीसी बँक दावडी, स्कूल कमिटी व सर्व सेवक वृंद दावडी विद्यालय यांच्या वतीने प्राचार्य अंकुश केंगारे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्त दावडी गावच्या  सरपंच माधुरीताई खेसे ,स्कूल कमिटी सदस्य सुरेश डुंबरे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राणीताई डुंबरे, माजी उपसरपंच अनिल नेटके,मा. उपसरपंच राहुल कदम, ग्रा. प. सदस्या  पुष्पा