‘माझी माती माझा देश’ विभागीय माहिती कार्यालयात पंचप्रण शपथ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

 



            पुणे, दि.०९: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित 'माझी माती माझा देश' (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत  विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली.


*पंचप्रण शपथ*


            'आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.'                 


            या उपक्रमात सहायक संचालक (माहिती) जयंत कर्पे तसेच विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद